जात्यावरील ओव्या

न्हाननी माझा घर,
सप्या लोट्यांनी दिसे थोर.
कापसाच्या गादयेवर
पटी वाचिता माझो बाळ.
दारातले केळी,
वाकडा तुझा बौण
नेणता तान्हा बाळ
शिरी कंबाळ त्याचा तौण
जायेच्या झाडाखाली,
कोण निजलो मुशाफिर,
त्याच्या नि मस्तकावर,
जायो गळती थंडगार,

गौरी पुत्र गजानन

गौरी पुत्र गजानन देवात महान हा शिवपुत्र गजानन देवातं महान , मंगल मंगल बोला मंगल मंगल ॥धृ॥
मुगुटाला हिरे शोभे रत्‍नजडितांचे , कानात कुंडल तेज पडे सुर्याचे, हो पडे सुर्याचे, गणपतीच्या गळ्यामध्ये शोभे पुष्पमला ॥१॥
गणपतीच्या भाळी शोभे केशराचा टिळा पिवळा पितांबर कटी शोभुनी दिसला पायात पैंजण आवाज रुणझुण झाला ॥२॥
शमी पत्री दुर्वा हरळी आवड मनाची सर्वांगी उटी शोभे लाल शेंदुराची , हो लाल शेंदुराची,पुढे गुळ खोबर्‍याचा नैवेद्यदाखविला ॥३॥
सोन्याच्या सिंहासनी गणेश विराजला, शारदा सरस्वति दोन्ही बाजुला , शांताने हा गणपति हृदयी ध्यानिला ॥४॥

उषा

होतो पुस्तक घेउनी सहज मी दारात त्यांच्या उभा,

बाला तोंच समोरूनी कुणीतरी आली त्वरेने पुढे

वार्‍याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती

मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,

किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,

किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;

होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;

त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा

त्याची मावळती प्रभा पसरूनी रंगे जशी वारूणी,

गोर्‍या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;

नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव

त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.

मी त्यानंतर पाहिले नच तिला,-वर्षे किती लोटली?

चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.


- ग.त्र्यं.माडखोलकर

बायको आपल्या नव-याला म्हणते....
बायको : खिडकीला पडदे लावा......
नवीन शेजारी मला नेहमी लपून पाहण्याचा प्रयत्न करतो....
नवरा : एकदा त्याला नीट पाहून घेऊ दे....
तो स्वतःच त्याच्या घराच्या खिडकीला पडदा लावेल....

शेणाची चव

एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते....
"अगं ए बाई..हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण?"
.
.
.
.
.
सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते....
ती लगेच म्हणते,
"अरे देवा! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय....!!

तुझे रुप नेत्री पाहता

तुझे रुप नेत्री पाहता ध्यान लागले रे ॥धृ॥

युगे अठ्ठावीस उभा विटेवरी पुंडलिकासाठी बससी अजूनी भीमातीरी ।
भावभक्ति पाहूनी ज्याची त्यासी उद्धरी रे ॥१॥

समचरण सुंदर कासे पिवळा पिंताबर । कर ठेवोनिया करी उभा राहे विश्‍वंभर ।
रुप सावळे ते माझ्या नयनी साठले रे ॥२॥

भाळी कस्तुरीचा टिळा तुळशी हार शोभे गळा तुरा तुळशीचा शोभे बुक्का वाहु घननीळा ।
लिंबलोण उतरु माझ्या सावळा विठ्ठला ॥३॥

जनाबाई सखूबाई उद्धरीली बहिणाबाई ज्ञानदेव चोखामेळा उद्धरीला तुक्याही चरणी ठाव देई तुझीया याच पामरा रे ॥४॥
चौदेहांची घेऊनी दीक्षा ।
आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष ।
प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही ।
कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।
मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख ।
तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग ।
अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥