पुन्हा

नको ह्रदय हासवूं, पुन्हा हे नको ह्रदय हासवूं

उगवताच सुकली मुळी
फुलविताच सुकली कळी
सरकताच जिरली खळी जळावर – कशी पुन्हा नाचवू?

तू दिलीस वचने जरी
ठरविलीस लटकी तरी
जी मुळांत नव्हती खरी प्रीत ती नको पुन्हा भासवू

ही नकोच भलती हमी
पहिलीही नव्हती कमी
भरभरुन पुनरपि सुरंग नंतर नको पुन्हा नासवूं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

विमान

किति मौज दिसे ही पहा तरीहे विमान फिरतें अधांतरीं. ध्रु.

खोल नदींतुन कापित पाणी
मत्स्य धांवतों चहुंबाजूंनी,
घारच अथवा फिरते गगनीं,
हुबेहुब हें त्याच परी. ।।१।।

रविकररंजित मेघांमधुनी,
स्वच्छ चांदण्यामधें पोहुनी,
घुमघुम् नादें दिशा घुमवुनी,
प्रवास करि हें जगावरी. ।।२।।

परंतु केव्हा पाउस गारा
प्रांत वेढुनी टाकिति सारा
त्यांतूनहि हें जाइ भरारा,
नवल नव्हे का खरोखरी? ।।३।।

पहा जाउनी विमानांतुनी,
दिसेल शोभा अपूर्व वरुनी,
डोंगर, रानें,ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी; ।।४।।

ग्रहनक्षत्रें आकाशांतिल
विमान बघुनी मनांत म्हणतिल,
"भेटाया अपणां पृथ्वींतिल
येति माणसें कुणीतरी." ।।५।।

नको सूर्यचंद्रावर जाया;
नको जगाची सफर कराया,
नेइं विमाना, मज त्या ठायां
जेथ माय मम वास करी. ।।६।।


- गोपीनाथ

पुणेरी किस्सा

पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता.

एक माणूस त्याला म्हणतो, “काय कर्वे…??”

तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो, “माझे आडनाव कर्वे नाहीये.”

तो माणूस : “मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस….”

पैज जिंकली

दोघा मित्रांनी एकमेकांशी पैज लावली. एकाचे म्हणणे होते की गावाजवळच्या जंगलात वाघ आहेत, तर दुसर्‍याचे म्हणणे होते की वाघ नाहीत. त्यांनी जंगलाबाहेर तंबू ठोकला. वाघ नाहीत म्हणणार्‍या मित्राने दोन तास जंगलातून फ़ेरफ़टका मारुन यावे व तो सुखरुप परत आला तर त्याने पैज जिंकली असे ठरले. वाघ आहेत म्हणणारा मित्र तंबूतच थांबला.

एक तासांनंतर तंबूत वाघ आला आणि तंबूतल्या मित्राला म्हणाला " अभीनंदन !!, तु पैज जिकंलास !!
गण्या - मैत्री करणार काय ?
.
.
.
चिंगी - माझे पालक परवानगी देणार नाही.
.
.
गण्या - वा लय भारी ... जसे माझ्या बाबाने मला पोरी पटवण्याचा लायसन काढून दिलाय

थापाडे मित्र

पहिला मित्र :- दुसर्या मित्राला माज्या पंजोबाचे घड्याळ या तळ्यात १०० वर्षापूर्वी पडले होते आणि काय आचर्य काल तळ्यातील गाळ काढताना सापडले आणि ते अजून चालू आहे


दुसरा मित्र :- अरे मी पण सागायचे विसरलो माजे पंजोबा याच तळ्यात १०० वर्षापूर्वी पडले होते ते काल सापडले तर ते जिवंत होते

पहिला मित्र :- अरे पण ते इतके वर्षे काय करत होते


दुसरा मित्र :- तुज्या पंजोबच्या घड्याळाला चावी देत होते म्हणूनच अजून ते चालू आहे

प्रिय मैत्रीण

मी तुला फुल मागितले तू मला पुष्पगंध दिला
मी तुला माती मागितली तू सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितले तू मोर दिलास .
.
.
.
.
एक विचारू तू बहिरी आहेस का ?