सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!
झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....

शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?

चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला
...उशीर झाला ..

शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??

झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ..

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !

अवतीभवती नव्हते कोणी
नाचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी, ग

दुसरे तिसरे नव्हते कोणी;
तुझेच हसले डोळे दोन्ही:
अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी, ग !

जरा निळ्या अन्‌ जरा काजळी
ढगात होती सांज पांगली:
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी, ग !

सळसळली ग, हिरवी साडी;
तिनेच केली तुझी चहाडी:
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, ग !

वहात होते पिसाट वारे;
तशात मी उडविले फवारे:
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, ग !

कुजबुजली भवताली राने;
रात्र म्हणाली चंचल गाणे:
गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, ग !

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

।। संकटनाशनगणेशस्तोत्रम् ।।

श्रीगणेशाय नम: । नारद उवाच ।

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिङ्ाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

आज जाऊ दूर रानी

प्रीत ही आली भराला : वेळ ही सौंदर्यशाली
आज जाऊ दूर रांनी : साजणा रे, सांज झाली!

आजपावेतो जगाचे पाश होते प्राक्तनी हे :
स्वैरता घेतील आता अंतरे संकोचलेली

मी अशी माळीन भोळी : सारखी घालीन माळा :
लाघवाने पुष्पमाळा गुंफणारा तूच माळी

ये, उभ्या विश्वास निंदू : प्रीतितालानेच हिंडू
ही निशा गुंफिल आता चांदण्यांची शुभ्र जाळी

गालिचे आहेत जेथे कोवळ्या दुर्वांकुरांचे ,
ये तिथे, लाजून वाचू अंतरांचे लेख गाली

वित्त, विद्या, मान सारे तुच्छतेने, ये, झुगारु :
व्यवहारी या जगाचा कायदा हा जीव जाळी.

कायदा येथील : ये, करू वेडाच सौदा :
प्रेम दे, अन प्रेम घे अन यौवनाची ही नव्हाळी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

एक वेळी

एकटा मी, अन होती एकली तू
का गळ्याची आण होती घेतली तू
फार वर्षांनी तुझ्या भेटीस आलो
का कपाळाला अढी ही घातली तू?

कालमानानेच आता लोपले का
मागचे सारे जुने आतुर हेतू
संपला सारा जरी आता जिव्हाळा
यापुढे साधेसुधे सौजन्य दे तू

एक वेळी वाटली होती जिवाला
चांदणी विस्तीर्ण अंधारातली तू


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ