जीवनकथा

चुकीच ही झाली
नको पण रागवू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा

नको दोष लावू:
मनोदौर्बल्यच हे माझे
नको अंत पाहू :
माझे झाक दैन्य जे जे

उप-या जगताला
करु दे विचार समतेचा
विकलित ह्र्दयाला
भरवसा तुझ्याच ममतेचा

खडतर वाट अती:
काटे फार दाटले, रे!
जागोजाग किती
माझे वस्त्र फाटले, रे!

हताश हाताने
कसे या छिद्रांना लपवू?
उघड्या लाजेने
कसे या जगामधे मिरवू?

चुकी जरी झाली
नको पण रागावू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"तो काळा मेघ...."

डोळ्यांच्या कक्षात मावेना
आकाशीचा हा मेघ सावळा
मिठी मारुनी चढवुनी गेला
निळ्या आभाळा रंग काळा !

पिउनी निळाई आकाशाची
भरून घेई गाठोडी थेंबांची
क्षितिजावरती करून जाई
क्षणात उधळण सप्तरंगांची !

एका गावाहून दुसऱ्या गावा
सैरसपाटा करी मंद गतीने
पाहता सरस कुणा त्याहुनी
धुवूनी टाकतसे रूप तयाचे !

व्यापून उरला नभास साऱ्या
परि म्हणवितसे प्रत्येकाचा
उरी मेघाच्या असे दडलेला
पाऊस कैकांना सुखावणारा !

घडली क्षणाची भेट तयाची
ओघळला बनुनी पुसट रेघ
इवल्याश्या थेंबांत समेटला
विशालकाय तो काळा मेघ !


कवियत्री - प्रीत

"बहर पावसाचा...."

हा बहार पावसाचा यंदा काय सोबत घेऊन आला
जे नव्हते कधी माझे त्याची आठव बनुनी आला !

धुक्यात होते माखले जे स्वप्न होते मी पहिले
सरताच धुके ते स्वप्न होते नयनांतुनी वाहिले !

सुसाट वाऱ्यासंगे होते मी सैरभैर बेभान धावले
फेऱ्यात वादळवाऱ्याच्या नामोनिशाण न उरले !

नकोच भिजणे आताशा कोरडेपणाच वाटे माझा
बरसले अश्रू इतके की भासती डोळे दोन खाचा !

आपुलकीचे शब्द सारे होते त्या थेंबापरी क्षणिक
सरता बहर पावसाचा, होती काही क्षणांतच लुप्त !


कवियत्री - प्रीत

दैवाने दिले आणि कर्माने नेले

मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला

तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..

आजोबांची शिंक !

नातू : आजोबा तुम्ही कित्ती जोरात शिंकता. पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले.

आजोबा : काय करु बेटा. तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातुन बाहेर पडते ना !!!