साठीचा गजल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!


कवि - विंदा करंदीकर

दरवाजा आणि किल्ली.

एकदा एका मनोरुग्णालयात डॉक्टर आठ रुग्णांची परिक्षा घेणार होते. ज्यामुळे त्यांना तेथुन सुटका होणार होती.
डॉक्टरांनी त्या खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढला व त्या आठ जणांना सांगितले ते दार उघडा व खोलीच्या बाहेर पडा.
सात जणांनी उठुन त्या दाराने बाहेर जायचा खुप प्रयत्न केला पण एक जण आपल्या जागेवरच बसुन राहिला.
डॉक्टरांनी त्याला न उठण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, " मी त्या दाराच्या कुलूपाची किल्ली घेउन बसलो आहे."

फुला रे

उघड उघड पाकळी, फुला रे
उघड उघड पाकळी

आंतल्या आंत कोवळे
मधुजीवन कां कोंडले?
बाहेर हवा मोकळी, फुला रे

तमसंकुल सरली निशा
नीलारुण हंसली उषा:
चौफेर विभा फांकली, फुला रे

मलयानिल उदयांतला
बघ शोधत फिरतो तुला
कां मृदुल तनू झांकली, फुला रे

कीं रहस्य हृदयांतले
आंतल्या आंत ठेवले?
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर राजाकडे जाते.
कबुतराकडे काही नाही हे पाहून राजा चिडतो आणि राणीला तडक फोन लावतो आणि विचारतो हे काय ?
:
:
:
:
:
:
राणी म्हणते," हा मिस्सड कॉल होता !"

कदाचित

फिरेल चंचलतेने जेव्हा
ती सगळे विस्मरुन चिंतन,
स्वैरपणाच्या सुखांत माझी
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
पटपट त्याचा फुलेल सुमगुण
माझ्या अंतर्गत प्रेमाची
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
दवबिंदूचे घडेल सिंचन
माझ्या अविरत अश्रुजलाची
नाही सय व्हायची तिला पण

बघेल ती मुख इंद्रधनुचे
सुरेल ऐकत कोकिलकूजन
त्या माझ्या गत मधुगीताची
नाही सय व्हायची तिला पण

विशाल विस्मित नयनांनी ती
बघेल आकाशाचे अंगण
असीम माझ्या गत आशेची
नाही सय व्हायची तिला पण

अमेल ती घनतमांत एकटी
स्वैरपणाने फिरत वनोवन
तिच्या नि माझ्या एकांताची
नाही सय व्हायची तिला पण

तमांतल्या तरुशाखांमध्ये
ती असतांना उभी न्यहाळत
तिला, उसाशागत वा-याने
सय माझी होईल कदाचित


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
सांताला एका पॅकिंग कंपनीत नोकरी लागली.
सांताने लौकरच एक चांगला कर्मचारी म्हणुन नाव कमावलं. त्यामुळे सांता व त्याचे वरिष्ठ अधिकारी फार खूष होते.
एकदा एक कर्मचारी ज्याच्याकडे ड्ब्यांवर वरची बाजू लक्षात येण्या साठी "This side UP" चा शिक्का लावायचे काम होते तो रजेवर होता, त्यामुळे सांताला ते काम देण्यात आले.
सांता फार मन लावून काम करित होता. पण बराच वेळ लागल्यामुळे त्याचा बॉस बघायला गेला.
सांताला त्याने वेळ लागल्याबद्दल विचारले.
सांता म्हणाल," सर, मी डब्याच्या वरच्याच नाही तर खालच्या बाजूला पण तो शिक्का लावला आहे त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही."

झोप !

प्राध्यापक वर्गात: मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परिक्षा जवळ य़ेत आहेत. पण तुम्ही रोज कमितकमी ७ तास झोप घेतलीच पाहिजे.
बाळू: सर हे कसं शक्य आहे ? कॉलेज तर फक्त सहाच तास असते नां ?