जगातील काही नमुने असलेली लोकं

१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.

२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक करतात.

३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल आयडिवर स्वत:च मेल पाठवतात. आणि

४. मराठी जे महाराष्ट्रात राहुन मराठी लोकांशी हिंदीत बोलतात.
भारताचा असा कोणता क्रिकेटर आहे की, जो इंग्लंडविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात कर्णधार होता तसेच त्याने त्याच मॅचमध्ये शंभर धावा केल्या व शेवटच्या बॉलवर षटकार लावला...?
.
.
.
.
.
.
.
.
खाजवा डोकं!
.
.
.
.
.
येते का?
.
.
.
.
.
अरे किती सोप्प आहे..
.
.
.
.
लगानमधील आमिर खान

बायको हरवली

चंप्या एकदा पोस्टात जातो....
चंप्या : माझी बायको हरवली आहे ....
पोस्टमन : मग पोलीस स्टेशनला जा ना इथे काय करताय ???
.
.
.
.
.
.
चंप्या : साला इतकी खुशी झालीये की कुठं जाऊ ते पण कॆळत नाहीये....
 

मोटकरी

ही मोठ भरे भरभरा ;
चढे करकरा जी !
विहिरीत बघा वाकुनी
जरा धाकूनी जी !
पाण्यात लई भोवरे
फेस गरगरे जी !

अजून काम राहिलंऽ – करा !
कसून कंबर कसा जरा
थुइथुइ फिरे हा झरा
लावणी करा जी !

चौफेर बहरला मळा
खुले नवकळा, जी !
काळीत दिसे हिवरा
गहू हरबरा, जी !
लवलवति कसे नाचरे,
ओंबिचे तुरे, जी !

वरून सांजकाळ साजरा
हसे: आता चला चला घरा ;
पन धनीन है माहिरा ;
जीव घाबरा, जी !

कुठवरी धरू तर असा
तुझा भरवसा, जी !
कोवळा चढे मोकळा
राघूचा गळा, जी !
राहिला कुठे तर दूर
सखूचा नूर, जी !

सदाकदा मनास लागणी,
–हसे, बघा, वरून चांदणी,
बांधून बैल लावणी
म्हणा लावणी, जी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

उन्मनी

बाहेर गहन अंधार फार दाटला ;
पण घरात ही पुनवेची शशिकलाच तू हासली ;
बाहेर माघमासात वाळला मळा;
पण घरात हसते माझ्या तू सुंदर चाफेकळी

बाहेर मुकी झालीत रानपाखरे
पण आत म्हणत आहे हे कोवळे प्रीतीगीत तू ;
मिटवून नयन तिमिरातच निजली घरे
पण घरात हारोंहारी लावियलेस हे दीप तू

नाहीच जरी ही मूळी ढगाळी निशा
सदनात तुझ्या भुवयांचे हे इंद्रधनू नाचते
का उगाच माझ्या नुरांत चढते नशा?
तू तुझ्या मदिर नयनांनी नुसतेच जरी पाहते.

भलतीच, गडे, भरविलीस तू उन्मनी
हे अनंत जीवनधागे गुंतले तुझ्या लोचनी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मी आले लडिवाळ

“नांव सांग तव काय आणखी अंतरातला भाव,
वनांतरी शिरकांव कशाला? दूर राहिला गांव”

“मी नारीची जात आणखी धनवंताची नात:
कुळशील अन जात सोडली, जाऊ कशी नगरांत?”

“उबाळ वाटे बात : घालशी अस्मानाला हात
मिळेल का रानांत, साजणी, जिवाजिवाची जात!”

“नागिण मी बेभान : चालले कुठे तरी हे गांन?
उतावीळ हैराण धावते, कुठे केतकीपान?”

“कुणीकडे फिरणार : अशी तू कोमल आहे नार;
मंजुळवाणी फार बोलशी वीणेवरची तार!”

“वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!

करू नको नाराज, उदारा, कळे न का आवाज?
भूल पडे का आज जीवाला; जुनाच आहे साज”

“अधीर उडतो ऊर सारखा, मनी उठे काहूर :
हा मैनेचा सूर वाटतो अन चंद्राचा नूर”

“उदास कासावीस हिंडते – उदास कासावीस :
ओळखले नाहीस काय रे, अरे तीच मी – तीच!

वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!”


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ