पति तर केवळ शुद्ध दांडगे घागरगडचे हंस जसे । पाणी वाहतां खटी पडल्या खांदी कावड डुल्लतसे ॥ध्रु०॥
चवला पुरती करी मजूरी कंबर बांधुनि हजीर जसे । अक्षरशत्रू 'ओनामासी' हें तव ठाउक स्वप्निं नसे ।
तंबाखूचा मोठा चाळा नाहिं मुखावर तेजकळा । दोटक्यांनीं भले दांडगे पाझर येइना खडकाला ।
परि निवळ फतर । पति तर केवळ० ॥१॥
तूं तर केवळ देवाघरची मुखरणी मध्यें श्रेष्ठपणीं । नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।
राजस गोंडस स्वहस्तकमळीं गौरवर्ण तनु देखणी । विशाळ डोळे बुबुळ कुळकुळित नाहिं कुठे तिळतुल्य उणी ।
शांत प्रकृती हास्यमुखी सुंदराकृती हो सदा सुखी । रंभा पाहुनि लज्जित होउनि तव गुणश्रवणीं पडति गळां ।
पति तर केवळ ॥२॥
कवी - अनंत फंदी