(ली हंटूच्या “Genny kiss’d me” या चुटक्याच्या आधारें )
“असे कान्ता रोगार्त – या घराला”
असा विद्युत्सन्देश मला आला;
चित्त चिन्ताकुलत होउनी, त्वरेनें
घरीं गेलों मी ग्रस्त संशयानें. १
मला बघतां, विसरुनी व्यथा गेली,
शेज सोडुनि ती त्वरित पुढे झाली,
मला आलिंगुनि चुम्बिलें तियेंने,
आणि पडली मृत हाय पलार्धानें ! २
मधुर-हरण-व्रत काळ जो तयानें
अहह ! नेली सुन्दरी प्रिया ! तेणें;
शक्ति गेली, मम मति भ्रान्त झाली,
टिके मग का सम्पत्ति ? तीहि गेली ! ३
हीन म्हण तूं मज दीन तसा, काळा !
आणि म्हण कीं त्रासला हा जिवाला;
तरी म्हटलें पाहिजे हेंहि तूतें –
“तिनें जातां चुम्बिलें असे यातें !” ४
कवी - केशवसुत
जाति - दिंडी
- २५ डिसेंबर १८९६
“असे कान्ता रोगार्त – या घराला”
असा विद्युत्सन्देश मला आला;
चित्त चिन्ताकुलत होउनी, त्वरेनें
घरीं गेलों मी ग्रस्त संशयानें. १
मला बघतां, विसरुनी व्यथा गेली,
शेज सोडुनि ती त्वरित पुढे झाली,
मला आलिंगुनि चुम्बिलें तियेंने,
आणि पडली मृत हाय पलार्धानें ! २
मधुर-हरण-व्रत काळ जो तयानें
अहह ! नेली सुन्दरी प्रिया ! तेणें;
शक्ति गेली, मम मति भ्रान्त झाली,
टिके मग का सम्पत्ति ? तीहि गेली ! ३
हीन म्हण तूं मज दीन तसा, काळा !
आणि म्हण कीं त्रासला हा जिवाला;
तरी म्हटलें पाहिजे हेंहि तूतें –
“तिनें जातां चुम्बिलें असे यातें !” ४
कवी - केशवसुत
जाति - दिंडी
- २५ डिसेंबर १८९६