एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.
पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतकरी होता.

त्याला पाहून पुढारी निराशेनं म्हणाला, "तू एकटाच तळमळीचा माणूस निघालास, पण आता मी भाषण करू की नको ?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, माझ्या गोठ्यात वीस बैल आहेत.त्याना मी चारा दयायला गेलो आणि तिथं एकच बैल असला, तर बाकीचे एकोणीस बैल नाहीत म्हणून मी त्याला उपाशी ठेवायचं का ?"

त्याच्या या मार्मिक उत्तरावर पुढारी महाशय खुश झाले. त्यानी चांगले दीड तास भाषण ठोकून त्या एकुलत्या एक श्रोत्याला हैराण केलं. भाषण संपल्यावर पुढारी म्हणाले,

"तुझी बैलाची उपमा मला फार आवडली. माझं भाषण कसं झालं?"

शेतकरी म्हणाला,  "साहेब, एकोणीस बैल गैरहजर असले, म्हणून वीस बैलांचा चारा एका बैलाला घालु नये, एवढी अक्कल मला आहे, पण ती तुम्हाला नाही...!"

तात्पर्य :- शेतक-यांना मुर्ख समजू नये. शेवटी तो या जगाचा 'बाप' आहे.

स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या

कंडक्टर - ते कसे?

स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे

कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील

स्त्री प्रवासी - ते कसे?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल...

तात्पर्य - जगात कुठेही डोकं लावा पण S.T महामंडळ च्या कंडक्टर सोबत डोकं लावु नका.

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा


मकरसंक्रातीच्या शुभेच्छा


नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
बायको:- अहो ऐकले का ?
नवरा   :- काय ?
बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?
नवरा    :-माझा नंबर दे.