घरगुती मानापमान

नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको - हो ना. सोळा सोमवार

करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा!
मास्तर-मुलांनो..'she was new Student an looking happy'
या वाक्याच मराठीत रुपांतर कारा..
.
.
.
.
.
.
 पोरगा-
कुन्या गावाच आल पाखरु..
बसलय डोलात आन
खुदू खुदू हसतय गालात!
.
.
मास्तर ढगात...

एकदा गण्याने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐

त्यानी बकरा चोरला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..???

बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे सांगा रात्री

चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???
एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.
पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतकरी होता.

त्याला पाहून पुढारी निराशेनं म्हणाला, "तू एकटाच तळमळीचा माणूस निघालास, पण आता मी भाषण करू की नको ?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, माझ्या गोठ्यात वीस बैल आहेत.त्याना मी चारा दयायला गेलो आणि तिथं एकच बैल असला, तर बाकीचे एकोणीस बैल नाहीत म्हणून मी त्याला उपाशी ठेवायचं का ?"

त्याच्या या मार्मिक उत्तरावर पुढारी महाशय खुश झाले. त्यानी चांगले दीड तास भाषण ठोकून त्या एकुलत्या एक श्रोत्याला हैराण केलं. भाषण संपल्यावर पुढारी म्हणाले,

"तुझी बैलाची उपमा मला फार आवडली. माझं भाषण कसं झालं?"

शेतकरी म्हणाला,  "साहेब, एकोणीस बैल गैरहजर असले, म्हणून वीस बैलांचा चारा एका बैलाला घालु नये, एवढी अक्कल मला आहे, पण ती तुम्हाला नाही...!"

तात्पर्य :- शेतक-यांना मुर्ख समजू नये. शेवटी तो या जगाचा 'बाप' आहे.

स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या

कंडक्टर - ते कसे?

स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे

कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील

स्त्री प्रवासी - ते कसे?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल...

तात्पर्य - जगात कुठेही डोकं लावा पण S.T महामंडळ च्या कंडक्टर सोबत डोकं लावु नका.