घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.

घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.

आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी...! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?



आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.

त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.

औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?

मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?

पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...! हे थांबायला हवे.

मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...

- अतुल कुलकर्णी

हरवलेला आत्मविश्वास

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले.

गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.

लेखक:
कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?

जोशी काका :
नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का ?

जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.
बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई रोज रानात दिवस भर कष्ट करून पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....
आजचा विचार

शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी

पहाटेचे मित्र वाढवा

आणि

रात्रीचे मित्र कमी करा

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची.....


        🌿 दोन पक्ष 🌿
(१) कृष्ण पक्ष ,(२) शुक्लपक्ष
                         
         🌿 ऋण🌿
(१) देव ऋण , (२) पितृ ऋण ,
        (3) ऋषि ऋण .

       🌿चार युग 🌿
(१) सतयुग , (२)त्रेतायुग ,
(३)द्वापरयुग , (४)कलियुग.

       🌿चार धाम🌿
(१)द्वारका , (२)बद्रीनाथ ,
(३)जगन्नाथ पुरी , (४)रामेश्वरम धाम.

       🌿चारपीठ 🌿
(१)शारदा पीठ ( द्वारिका )
(२)ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम )
(३)गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) ,
(४)शृंगेरीपीठ !

       🌿चार वेद🌿
(१)ऋग्वेद , (२)अथर्वेद ,
(३)यजुर्वेद ,
(४)सामवेद.

      🌿चार आश्रम🌿
(१)ब्रह्मचर्य , (२)गृहस्थ ,
(३)वानप्रस्थ , (४)संन्यास.

       🌿चार अंतःकरण🌿
(१)मन , (2)बुद्धि , (३)चित्त ,                (४)अहंकार.

       🌿पचं गव्य🌿
(१)गाईचे तूप(२)दूध , (३)दही ,
(४)गोमूत्र , (५)शेण

       🌿पचं देव🌿
(१)गणेश , (२)विष्णु , (३)शिव ,
      (४)देवी ,(५)सूर्य.

        🌿पंच तत्त्व🌿
(१)पृथ्वी ,(२)जल , (३)अग्नि ,
(४)वायु , (५)आकाश.

       🌿सहा दर्शन🌿
(१)वैशेषिक , (२)न्याय , (३)सांख्य ,
(४)योग , (५)पूर्व मिसांसा , (६)दक्षिण मिसांसा.

        🌿सप्त ऋषि🌿
(१)विश्वामित्र ,(२)जमदाग्नि , (३)भारद्वाज , (४)गौतम ,
(५)अत्री , (६)वशिष्ठ,(७)कश्यप.

       🌿सप्त पुरी🌿
(१)अयोध्यापुरी,(२)मथुरापुरी,
(३)मायापुरी,(४)काशी,(५)कांची,
(६)अवंतिका,(७)द्वारका पुरी.

       🌿आठ योग🌿
(१)यम,(२)नियम,(३)आसन,(४)प्राणायाम,(५)प्रत्याहार,(६)धारणा,(७)ध्यान,(८)समाधी,

        🌿आठ लक्ष्मी🌿
(१)आग्घ,(२)विद्या,(३)सौभाग्य,
(४)अमृत,(५)काम,(७)सत्य,  (८)भोग आणी योग लक्ष्मी.

      🌿नव दुर्गा🌿
(१)शैल पुत्री,(२)ब्रह्मचारिणी,(३)चंद्रघंटा,(४)कुष्मांडा,(५)स्कंदमाता,(६)कात्यायिनी,
(७)कालरात्रि,(८)महागौरी,
(९)सिद्धिदात्री.

      🌿मुख्य दिशा चार🌿
(१)पूर्व,(२)पश्चिम,(३)उत्तर (४)दक्षिण

       🌿उपदिशा सहा🌿
(१)ईशान,(२)नैऋत्य,(३)वायव्य, (४)आग्नेय,(५)आकाश (६)पाताल.

    🌿मुख्य अवतारअकरा🌿
(१)मत्स्य्,(२)कच्छप,(३)वराह,(४)नरसिंह,,(५)वामन,(६)परशुराम,(७)श्रीराम,(८)कृष्ण,(९)बलराम,(१०)बुद्ध,(११)कल्कि.

     🌿मराठी महिने बारा 🌿
(१)चैत्र,(२)वैशाख,(३)ज्येष्ठ,(४)आषाढ,(५)श्रावण,(६)भाद्रपद(७)अश्विन,(८)कार्तिक,(७)मार्गशीर्ष,(८)पौष,(११)माघ,(१२)फाल्गुन

   🌿बारा राशी🌿
(१)मेष,(२)वृषभ,(३)मिथुन,(४)कर्क,(५)सिंह,(६)कन्या(७)तुला,(८)वृश्चिक,(९)धनु,(१०)मकर,(११)कुंभ,(१२)कन्या.

🌿बारा ज्योतिर्लिंग🌿
(१)सोमनाथ ,(2)मल्लिकार्जुन ,(३)महाकाल ,(४)ओंकारेश्वर ,(५)बैजनाथ ,(६)रामेश्वरम ,(७)विश्वनाथ ,(८)त्र्यंबकेश्वर ,(९)केदारनाथ ,(१०)घुष्नेश्वर ,(११)भीमाशंकर ,(१२)नागेश्वर.

   🌿पंधरा तिथि🌿
(१)प्रतिपदा,(२)द्वितीया,(३)तृतीया,(४)चतुर्थी,(५)पंचमी,(६)षष्ठी,(७)सप्तमी,(८)अष्टमी(९)नवमी,(१०)
दशमी,(११)एकादशी,(१२)द्वादशी,(१३)त्रयोदशी,(१४)पोर्णीमा,
(१५), अमावास्या !

        🌿स्मृतिया🌿
(१)मनु,(२)विष्णु,(३)अत्री,(४)हारीत,(५)याज्ञवल्क्य,(६)उशना,(७)अंगीरा,(८)यम,(९)आपस्तम्ब,(१०)सर्वत,(११)कात्यायन,(१२) ब्रहस्पति,(१३)पराशर,(१४)व्यास,(१५)शांख्य,(१६)लिखित,(१७)दक्ष,(१८)शातातप ,(१९)वशिष्ठ.
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो---

"किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!"