ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.

"काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.             

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...               

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

माझी निवड चुकली तर नाही ना ?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे.

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे
सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हलवून टाकणारा प्रसंग

 गुरुजी ओळखलंत का मला  ?

हो ओळखलं ना 1987 ची बॅच ना ?

३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी ..
बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा :- खुप खुप खुप आवडते ग...
बायको :- असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...

बायकोने डोक फुटुुस्तर हाणला..
प्रेरणा कशास म्हणतात ??

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!

बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!

यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!

मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?

तुकोबा ज्ञानोबा तर कधी शाळेतच गेले नव्हते!!

शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती ?

तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या ?

डॉ. आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?

हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते !!

मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!

सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!

आणी आज आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!

आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!

भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!

पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!

पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!

माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?

कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?

वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?

लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?

आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?

निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!

शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!

आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो.
एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल..

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला....

वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..?

मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक...

वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल

वडील: कस...काय !                             

मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...
महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तिला मराठीत ''गारद'' म्हणतात. ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला ''अल्काब'' तर संस्कृतमध्ये ''बिरुद'' किंवा ''बिरुदावली'' म्हणले जाते...
छत्रपती शिवरायांची गारद व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात....

🚩#दुर्गपती → गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य ( राज्य ) आहे असे.

🚩#गज-अश्वपती → असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो.

🚩#भूपती प्रजापती → वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे, म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.

🚩#सुवर्णरत्नश्रीपती → नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे,, शिवरायांच्या बाबतीत ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती.

🚩#अष्टावधानजागृत → आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा ).

🚩#अष्टप्रधानवेष्टीत → ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे.

🚩#न्यायालंकारमंडीत → कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.

🚩#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत → प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत ( निपूण ) असलेले राजे.

🚩#राजनितीधुरंधर → राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे.

🚩#प्रौढप्रतापपुरंधर → पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे.

🚩#क्षत्रियकुलावतंस → क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे.

🚩#सिंहासनाधिश्वर→ जसा देव्हा-यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती.

🚩#महाराजाधिराज→ सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सा-या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजे.

🚩#राजाशिवछत्रपती →ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवराय.