आपण ह्यातून कोणाला निवडाल?……

मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"

शिक्षक एका विध्यार्थ्याला
मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक
स्त्री पुढे येते. .

शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात
महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची
आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून
टाकण्यास सांगितली कि जी तिच्या
दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत.
संगीताने
आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने
तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि
ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे
चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें
पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची
ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण
त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ
संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता
सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे.

शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें
पुसण्यास सांगितली.

मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने
आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक
नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.

 संगीता आता
पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले
आणि
ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले.

थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख
आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा
मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती
म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती

कारण त्यांनी तिला जन्म देऊन
लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म
दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू
शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील
सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली?


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान
शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता
संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत
होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली
आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून
जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर
राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे
उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून
टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते
आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर
काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले
आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा
समजले पाहिजे.....    
एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन कब्रीस्तान मधी घूसला
.
अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰
.
.
च्यामायला कोनता रोड होता
काय माहीत…
येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय…
एक माणूस रात्री 2:00 ला डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो...

"डॉक्टर साहेब, घरी यायची तुम्ही किती फी घेता..? "

डॉक्टर : फक्त 250 रुपये..!
   
माणुस : तर चला मग.

डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात.

माणूस: डॉक्टर साहेब..... इथे थांबा. माझे घर आले...!
             
डॉक्टर : OK, चला लवकर, मला पेशंट दाखवा..!

माणूस : हे घ्या 250 रूपये. रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते  म्हणून तुम्हाला विचारले. ...!!
.
.
.



कोण म्हणतं दारू घेतल्यावर डोकं चालत नाही....!!

"पोटात दुखते"

एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते.

त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते "मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली,तिला कसला कंटाला येतो बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ?"

आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो ,"पोट दुखल्याने माणूस मरत नाही".

त्याची आई आऩंदी असते,"याला म्हणतात खरा पुरूष".
राधिका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते ७-८ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवन न करता,पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ,ती हुंदके देऊन रडत असतेआणि

पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो ,"काय सारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून "

राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते ," बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल.
सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही ऊठत नाही पार्थ रूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते,पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो ,"अग आई तिला खरच बर नसेल,रोज सगळ करून जाते ना ती."

"शेवटी बायकोचाच झालास ना आiता आमच कशाला ऐकशील," आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मधे जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो ३-४ दा पण ती काही ऊठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला response देत नाहीये.

तो लगेच तिला दवाखान्यात नेतो,डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो.
reports आल्यावर डॉक्टर सांगतात की ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती ,body मध्ये poision पसरल्यामुळे रात्री ११.३० ला तिचा मृत्यु झाला.

पार्थला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो.

" राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो,माझ्यामुळे ती गेली" पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा.

मित्रहो:-
व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या ,त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात.

आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा...
आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील..
राग आल्यास शांततेने समाजवा..प्रेमात

आज ती सुन आहे..तुमची

उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे...हे विसरु नका....

सुखी व्हायचय ?

एका शहरातला एक तरुण मुलगा खूप मेहनती खूप विचारी खूप अभ्यासू त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. नवीन नवीन संसार. सुरुवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू घरात बारीक सारीक कुरबुर सुरू झाली. जेवणावरून बाहेर फिरायला जाण्यावरून. काहीवेळा कारणे खूप क्षुल्लक असायची पण वाद पेटायचा. मग घरात अबोला. एकूण वातावरण बिनसू लागलेले..
असाच एकदा तो वैतागून घरून ऑफिसात निघालेला होता. तर गाडी काढताना पार्किंग मध्ये एक तेजस्वी पुरुष समोर उभा दिसला. त्या पुरुषाने स्वतःहून या तरुणाला विचारले बेटा दुःखी दिसतोय. काय झालं ? मी काही मदत करू का ?
हळव्या स्वभावाच्या त्या तरुणाला एकदम गहिवरून आलं  त्याने कबुली दिली की होय महाराज मी दुःखी आहे. पण मला सुखी व्हायचं आहे. एक तरी क्षण एक तरी मिनिट मला सुख पाहायचे आहे काय करू?
तो तेजस्वी पुरुष म्हणाला नक्की सुखी होशील. मात्र त्यासाठी माझ्यासोबत आत्ता अर्धा  तास यावं लागेल जमेल का ?
तरुण म्हणाला हो चालेल
मग ते दोघे एकत्र पायी पायी निघाले जवळच एक बाग होती तिथे तेजस्वी पुरुष आत गेला मागोमाग तो तरुणही गेला गेट जवळच एक जडसा  दगड पडला होता तेजस्वी पुरुषाने तो दगड उचलून तरुणाच्या हाती देऊन मागोमाग चालत यायला सांगितले तरुण तो दगड हातात घेऊन निघाला. पाच मिनिटांनी त्याच्या हाताला रग लागली म्हणून त्याने दगड दुसऱ्या हातात घेतला अशीच पंधरा मिनिटे गेली आता तरुणाचे दोन्ही हात दुखू लागले तरी चालणे सुरू होतेच. शेवटी अर्ध्या तासाने तरुणाची सहन शक्ती संपली दगड दोन्ही हातानी पकडून  तो त्या तेजस्वी पुरुषाला म्हणाला आता सहन होत नाहीये.
यावर तो पुरुष म्हणाला आता तो दगड खाली ठेव..
त्याबरोबर तरुणाने दगड लगेच टाकला. हुश्श केले. घामाघूम झालेला चेहरा पुसला.ओझे कमी झाल्याने तो थोडा ताजातवाना झाला त्याच क्षणी तेजस्वी पुरुष म्हणाला हाच तो सुखाचा क्षण आहे. ओझे कमी झाल्याने तू आत्ता स्वःताला खूप सुखी समजतोय ना ?
तरुण म्हणाला होय महाराज
मग तो पुरुष म्हणाला जीवनाचे देखील असेच आहे तो दगड म्हणजे दुःख / निराशा आहे तो दगड एक मिनिट हातात ठेवला थोडे दुखले पाच मिनिटे अजून ठेवला अजून जास्त दुखले. अर्धा तास ठेवल्यावर सहन करण्या पलीकडचे दुखले.आता हे आपल्यावर आहे की आपण तो दगड कितीवेळ हातात ठेवणार ? तुम्ही तो दगड जितक्या लवकर खाली ठेवाल तितक्या लवकर सुखी व्हाल  आणि जमलेच तर असले दगड उचलूच नको आयुष्यात कधीच तू दुःखी होणार नाहीस..
जगात आपल्याला दुखवू शकेल अशी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः  दुसरे कुणीही कितीही ठरवले तरी दुःखी करू शकत नाही..

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.