चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.
जेवण झाल्यावर बिल द्यायला भांडण करू लागले.
सगळे म्हणत होते, मी बिल देणार.
कोणी ऐकायला तयार होईना.
शेवटी त्यांच्यात ठरलं.
हाॅटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं.
त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.
मॅननेजरने शिट्टी मारली.....
ते सगळे चक्कर मारायला पळाले...

ते अजून नाही आले...
मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय...
याला म्हणतात दोस्ती

मेडिटेशन का महत्वाचे ? 😌😌

बायका आपल्या नव-याच्या
छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे ?         

.
.
.
.
तुमचे ऊत्तर इथे महत्वाचे नसते

तर महत्वाचे असते, तुमच्या  हृदयाचे वाढणारे ठोके.
😳😳
.
.
.
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. मेडिटेशन करा. 😜

👍फक्त तू खचू नकोस 👍

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड,
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस..
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सूर्य रोजच उगवतो,
 त्याच  नव्या तेजाने
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने
येणे जाणे रितच् इथली
 हे तू विसरु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

प्रेम तुझ्यावर करणारे
 कितीतरी लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे
खुप सारे हात आहेत,
अरे अशाच आपल्यांसाठी
तू ही थोड हसुन बघ
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

वाट तुझी बघत असतं
रोजच  कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं
आस लावून प्रत्येक क्षणी,
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

उठ आणि उघडून डोळे
पहा जरा  जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात
काहीतरी असतेच् थोडे,
नाही नाही म्हणून
उगाच कुढत तू बसु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सामर्थ्य आहे हातात जर, 
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल
 तेव्हा मागे वळून बघु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

👉 फुल्ल पुणेरी : - 😳

५00 ची  नोट दुकानदार वेगवेगळ्या अँगलमधुन  पाहात चेकिंग करत होता *
.
.
.
.
जोशी :  तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला गांधीजीच्या जागेवर कॅटरीना नाही दिसणार.चला, राहिलेले पैसे द्या लवकर
बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.
तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला.
तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

" सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!"

बंड्याची बदली पुण्याला झाली.
त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं.
आता पोपट म्हणतो,

" बाजीराव, उठा आता... लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!"

👉 बापाचं मन 👈

घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |

त्रासाचे झाड

दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद? दादांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.
‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’