फास्ट-फुड

दोन वाघ झाडाखाली आरामात बसलेले.
समोरून एक ससा जोरात पळून गेला..
.
.
.
.
.

पहिला वाघ (दचकून):,काय गेलं रे..?
दुसरा वाघ: काही नाही, फास्ट-फुड होतं..!
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .

एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.

प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना
तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

तात्पर्य :-

एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. 
पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा.
ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

👦बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती😃😃

💉डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?

👦बंड्या : तेच तर केले साहेब!
नवरा बायकोच भांडण होत

बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा

नवरा : मी चाललो देवळात

बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी

नवरा  : अग वेडे मी नवस फेडायला चाललो
कंडक्टर : सुट्टे पैसे नसणार्‍यांनी खाली उतरा....
.
गण्या  : १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतो "डेक्क्न पर्यंत एक फुल द्या".
.
कंडक्टर (वैतागून) : अरे  तिकट ६ रूपये आहे. तुम्हाला परत द्यायला ९४ रूपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.
.
गण्या : मग  उतर खाली ...
बाळू मांजराला जंगलात सोडून आला.

संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.

त्यानंतर पुन्हा बाळूने  त्याला जंगलात आणखी लांब सोडले.

तरी ते पुन्हा घरी हजर.


पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं

आणि घरी फोन करून आईला विचारलं," मांजर घरी आलं का?"


आई: हो आलं.



बाळू: त्याला आधी जंगलात पाठव.मी घरचा  रस्ता विसरलोय!

माणसांची पारख

थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,

"माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."

*

जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!

राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."

तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे."

आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"

*

राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे"

*

सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?

यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही"

*

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!

**

Moral-- : जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!