शासन निर्णय
ClBIL SCORE काय असतो
*सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?*
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit)
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit)
या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .
पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .
जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .
आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .
*Credit Information Bureau Ltd.*
या कंपनीची स्थापना झाली.
आज या कंपनीचे नाव *TransUnion CIBIL Ltd* असे आहे.
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.
आणि यावर *RBI* ची मॉनीटरींग आहे.
समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.
तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा *CIBIL* रिपोर्ट मागावते.
आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा *CIBIL* स्कोर चेक करते ?
जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़.
CIBIL स्कोर हा
300- - - -- - - ते -- -- -- --900
मध्ये मोजला जातो.
जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.
पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा !
कर्ज मिळतच नाही.
म्हणजे समजलं !
कि बँका कर्ज देणे का नाकारतात ?
तर CIBIL Score नीट नसतो.
*CIBIL Score कमी का होतो ?*
1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.
2) कर्जाची परतफेडच न करणे.
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज *NPA* मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.
यामुळे *CIBIL score* वर वाईट परिणाम होतात.
बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.
याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.
तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?
1) *EMI* वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )
3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा.
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.
5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.
CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.
या मध्ये
NA - No Activity.
NH - No History.
असे पर्याय दिसू शकतात .
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
*सारी असतात आपलीच माणसं !*🙏
उसळ-चपाती: - भीमसेन जोशी
*एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.*
*तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!"*
*रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.*
*अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..!*
*अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते.*
*रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..*
*साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -*
*"इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.*
*स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली".*
*"उसळ-चपाती पाहिजे काय?", असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.*
*रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"*
*"घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"*
*"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.*
*रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?"*
*रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..*
*रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.*
*भाषेची अशीही गंमत*
खूप खटपटी केल्यानंतर बँकेकडून मला एकदाचे लोन मंजूर झालं.
मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला.
मी डीडी घेताना कृतज्ञतेनं आभार मानत त्यांना म्हटलं: "तुमचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही."
झाले, माझ्या हातातला डीडी त्यानं चक्क हिसकावून घेतला !
😂
*" चिटी चावल ले चली,*
*बीच में मिल गई दाल।*
*कहे कबीर दो ना मिले,*
*इक ले , इक डाल॥"* 👌🏻
अर्थात :
"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
ती बघून, 'घेशील किती दोन करांनी' अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो.
*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*
*चला तर मग आनंदी जगुया....*