😀  मालवणी तडका 😀


बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?


पक्या : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना ! म्हणून मी इलय नाय शाळेत.


बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?


पक्या : गे तु कधी माका माणसात मोजलस ? बगुचा तेव्हा माका कोंबडो  बनवुन बाहेर उभी करतस.. 


🐔🐔

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.


घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."ब्राह्मण "हो" म्हणाला.ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.


*भोजनांते तक्रं पिबेत*  

*अस म्हणतात.नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."तिने शेजारणीला ताक मागीतले ,शेजारणीने भांडभर ताक दिलेआजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.ब्राह्मण तडकाफडकी मेला.*

    *चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.*

*म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.*

*शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.*

      *यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.*

     *प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?*

     *चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.*

 *हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"*

       *तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."*

            *चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.*

        *थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.*

       *म्हणून आजचा सुबोध दिला आहे.प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.*


 *तात्पर्य - जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*

♦️ मनाची अवस्था ♦️

एकदा  धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना  निमंत्रित केले परंतु एकादशीचा उपवास होता म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्ती कडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले.


परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता.


गुरुजींना त्यांना बघून  आश्चर्य वाटले म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले,"बाळा दुःखी का आहेस. मालकाने भोजनात काही फरक केला का ?"


"नाही गुरुजी"


मालकाने बसण्यात फरक केला का ?


"नाही गुरुजी"


मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का ?


"नाही गुरुजी, दक्षिणा बरोबर २ रुपये मला व  आणि २ रुपये दुसऱ्याला " दिली


आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य झाले आणि विचारले मग कारण काय आहे ? जो तू दुःखी आहेस ?


तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल  परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे.


गुरुजींनी  दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस ?


तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहित होते की ती धनाढ्य व्यक्ती खुप कंजूष  आहे. आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी प्रसन्न आहे.


हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी घडतात परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात तर कोणी दुःखी होते. परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे!

 एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात.

.

ते सर्वजण आपल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसे कमावत असतात.

.

एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात.

.

प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात.

.

हळुहळूगप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात.

.

सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की,जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.

.

ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात...

.

आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की,

.

मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...

.

सर्वजण किचनमध्ये जातात.तिथे अनेक प्रकारचे कप असतात.

.

आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात.

.

मग ते प्रोफेसर कॉफी येतात आणि म्हणतात की,

.

"तुम्ही सर्वांनी  जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे  म्हणून निवडला.... आणि.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षच दिले नाही.

.

जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते.

.

हे तर निश्चित आहे की,

कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाही.हा तर एक प्रकार आहे की,ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो.

.

तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती,

कपाची नाही.

तरीपण सर्वांनी महागातले महागच कप निवडले.

आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही

दुसऱ्‍यांच्या कपाकडेच लक्ष दिले.

.

सर्वांनी जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती ,ती एकच रहाते !

.

तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.

....आपली नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.

.

म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा...भारी कपाची नाही.

.

जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं ......तर...... ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व आहे त्यामध्ये आनंदी रहातात...!

.

म्हणून साधेपणाने जगा.

सर्वांशी प्रेमाने वागा.

सर्वांची काळजी घ्या.

सर्वांशी नेहमी संपर्कात रहा व शक्य असल्यास प्रत्येक्ष भेटा

शासन निर्णय

शासन :- मांजराला तिखट खायला लावायचे आहे.....
तत्काळ प्रस्ताव सादर करावा.

तहसील :- मांजराची मानगूट पकडून त्याचे तोंड उघडून त्यात तिखट कोंबायचे, की झाले.😀..

शासन :- याला म्हणतात "जबरदस्ती"

उपविभाग :- माशाच्या पोटात तिखट घालून तो मासा मांजराला खायला लावायचा, हे उचित होईल असे वाटते. 😀

शासन :- याला म्हणतात "फसवणूक"

सर्कल :- प्रथम विहित निविदा प्रक्रियेद्वारे उत्तम गुणवत्तेचे तिखट उपलब्ध करून घ्यावे. नंतर ते भरपूर प्रमाणात मांजराच्या शेपटीला चोळावे. काही कालावधी नंतर त्याच्या शेपटीची आग होऊ लागेल व मांजर स्वेच्छेने शेपटी चाटण्याचा विकल्प सादर करील......

शासन :- याला म्हणतात " शासन निर्णय".

ClBIL SCORE काय असतो

*सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?*

बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .


1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 


2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit) 


या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .


पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .


जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .


आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 


या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .


*Credit Information Bureau Ltd.*


 या कंपनीची  स्थापना झाली.


आज या कंपनीचे नाव *TransUnion CIBIL Ltd* असे आहे.


ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.


आणि यावर *RBI* ची मॉनीटरींग आहे.


समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.


तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या ! 


आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 


तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा *CIBIL* रिपोर्ट मागावते.


आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा *CIBIL* स्कोर चेक करते ? 


जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़. 


CIBIL स्कोर हा 


300- - - -- - - ते -- -- -- --900 


मध्ये मोजला जातो.


जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.


पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 


कर्ज मिळतच नाही.


म्हणजे समजलं ! 


कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ? 


तर CIBIL Score नीट नसतो.


*CIBIL Score कमी का होतो ?*


1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.


2) कर्जाची परतफेडच न करणे.


3) चेक बाऊन्स होणे 


4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 


5) स्वतःवर असणारे कर्ज *NPA* मध्ये जाऊ देणे 


6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.


यामुळे *CIBIL score* वर वाईट परिणाम होतात.


बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.


याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना मूर्ख बनवू शकत नाही


बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.


तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?


1) *EMI* वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.


2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) 


3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा.


4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.


5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.


6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.


CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.


या मध्ये 


NA - No Activity.


NH - No History. 


असे पर्याय दिसू शकतात .

*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल 

इतकं जवळ जाऊ नये


चांगुलपणाचे ओझे वाटेल

इतके चांगले वागू नये


कुणाला गरज नसेल आपली

तिथे रेंगाळत राहू नये


नशीबाने जुळलेली नाती जपावी 

पण स्वतःहून तोडू नये


गोड बोलणे गोड वागणे

कुणास अवघड वाटू नये


जवळपणाचे बंधन होईल

इतके जवळचे होऊच नये


सहजच विसरून जावे सारे

सल मनात जपू नये


नकोसे होऊ आपण

इतके आयुष्य जगूच नये


हवे हवेसे असतो तेव्हाच

पटकन दूर निघून जावे

आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी

राहील इतकेच करून जावे.


*कारण*

जीवनाच्या वाटेवर 

साथ देतात,

मात करतात,

हात देतात,

घात करतात,

ती ही असतात..... *माणसं !*


संधी देतात,

संधी साधतात,

आदर करतात,

भाव खातात

ती ही असतात..... *माणसं !*


वेडं लावतात, 

वेडं ही करतात,

घास भरवतात,

घास हिरावतात

ती ही असतात..... *माणसं !*


पाठीशी असतात, 

पाठ फिरवतात,

वाट दाखवतात , 

वाट लावतात

ती ही असतात..... *माणसं !*


शब्द पाळतात, 

शब्द फिरवतात,

गळ्यात पडतात, 

गळा कापतात

ती ही असतात ...... *माणसं !*


दूर राहतात, 

तरी जवळचीच वाटतात,

जवळ राहून देखील, 

परक्यासारखी वागतात

ती ही असतात ...... *माणसं !*


नाना प्रकारची अशी 

नाना माणसं,

ओळखायची कशी 

*सारी असतात आपलीच माणसं !*🙏