*प्रगल्भता म्हणजे काय ?*

(MATURITY)


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.   


आणि शेवटी अती महत्वाचे 


*प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.*


🌸 ( संग्रहालयातील)

 काय चूक काय बरोबर......?

=================

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. 

एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची.

पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात.

लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,.


एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही......

दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची

मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....!


गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत.

तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस काय प्रिफर करता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-


त्या म्हणाल्या, 

समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद.......!

नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.

पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते


मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशा प्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या हिंदू  धर्मात भगवत गीतेत  आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी......!


एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते. 

एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात. 

एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.


माननीय श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत

कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ....


आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीच्या स्त्रियांना वाचून मन विचारात पडलं..........!!

क्षणभर काय चूक काय बरोबर हा प्रश्न पडला........!

मग एकच मनात आलं की

माझं उर्वरित आयुष्य श्रीमती सुधा मूर्ती यांच्या सारख जगण्याची बुद्धि दे.

त्यांचे जीवन हे "चरित्र" आहे. ते पाठ्यपुस्तकात "धडा" रुपाने पुढील पिढीला "ज्ञात" होवो हिच अपेक्षा.

*🔥!!भेटी लागे जिवा!!🔥*

    *आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*

     *या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*

     *"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*

     *मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*

*त्यावर मुक्तानं विचारलं,*

     *"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"*
*तुम्ही म्हणता,*

     *"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*

*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*

     *"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*

      *अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*

     *तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*

      *हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,* 
 *"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*

     *हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
     *तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*

      *नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,"*

*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*

       *संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*

*संत सेना महाराज म्हणतात,*

     *"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*

     *आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*

     *असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*

     *"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
    *संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*

    *म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*

      *🌸रामकृष्णहरी🌸*

*रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला*

 ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला


त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे.

रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा http://ift.tt/2xchNIX


सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.


झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.


रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.


मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."


आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?

अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.


ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."


ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.


रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."


आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!


विद्यमाने : The Awakening Times

स्त्रोत: Veda Vyasa Ramayana 

 *भारताचे संविधान कुणी लिहिले ???* 


या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच आहे ते म्हणजे... *भारताचे संविधान आंबेडकरांनी लिहिले*

परंतु सहज माझ्या मनात आलं "एकाच व्यक्तिनी" इतकं मोठं, तर्कसंगत, सुटसुटित, कायदेशीर लिखाण केले आहे काय?... ते पण केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ..... म्हणजेच संवैधानिक सभेच्या स्थापने पासून (९ डिसेम्बर १९४६) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (२६नोहेम्बर १९४९).

मला हे पूर्णपणे पटत नव्हतं की केवळ आंबेडकरांनीच संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...

*१९४७ ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी* यासाठी ब्रिटिशांनी *द इंडिपेंडेंस एक्ट 1947* भारत व पाकिस्तानला दिली, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवन्यासाठी स्वतंत्र संवैधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.

यानुसार भारताने आपली संवैधानिक सभा ९ डिसेम्बर १९४६ ला बनवून पहिली बैठक घेतली.

या संवैधानिक सभेत असं ठरवण्यात आलं की संविधान *"लिहण्याच काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचं आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...* 

१) *संघ शक्ति समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू* ... मेंबर संख्या-९


२) *मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल.* .. मेंबर संख्या-५४

३) *कार्य संचालन समिती-* चेअरमन- *डॉ के. एम. मुंशी...* मेंबर संख्या-३

४) *प्रांतीय संविधान समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल ...* मेंबर संख्या-२५

५) *संघ संविधान समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू...* मेंबर संख्या-१५

".... म्हणजे पाच समित्या मिळून १०६ मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्येक कलमं लिहिली..."

पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त *आंबेडकरांना 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??* 

पुढे अभ्यास केला तर कळाले की...

या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर *२९ ऑगस्ट १९४७* ला *७ सदस्यीय* *"ड्राफ्टिंग समिती"* बनवली, या समितीचे कार्य होते... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करणे व गरज असल्यास नवीन कलम 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तैयार करुन प्रस्तुत करने.

या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन *सर अल्लादि कृष्णास्वामी* होते, ड्राफ्ट तैयार केला होता तो *सर बी. एन. राव* यांनी.... आणि हा सम्पूर्ण तैयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) " *प्रस्तुत* " करण्याच् काम *डॉ आंबेडकरांना* सोपवण्यात आले, कारण १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्या सम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम *कायदेमंत्र्यांचे* होते.

भारताचे संविधान  लिहिण्यासाठी २ वर्ष,११ महिने,१८ दिवस लागले आणि ते " संविधान " २६ नोव्हेंबर १९४९ ला *संविधान मसुदा समितीला* बाबासाहेबांनी दिले.

 🙏🌹🙏🌹🙏


*काट्याच्या अणीवर वसले तीन गाव*


🕉🕉🕉🕉🕉🕉


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥२॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥


जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या।

दोन हुकल्या एक लागेचिना ॥६॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्‌गुरूवाचुनि कळेचिना ॥७॥


ज्ञानदेवांचे हे भारुढ [बहुरुढ] आध्यात्मिक छटा असलेले आहे.


काळ नावाच्या काट्यावर स्थूल , सूक्ष्म व लिंगदेह ही तीन गावे वसवली. 

स्थूल व सूक्ष्म हे देह नाशवंत म्हणून ओसाड.

लिंगदेह हा अदृष्य 

अनाकलनीय म्हणून वसेचिना..


तीन कुंभार म्हणजे 

*ब्रह्मा विष्णू महेश्वर*

पण... विष्णू आणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ. 


एक कुंभार ब्रह्मा याचे कडे निर्मिती,  पण तो वसवतो ते आत्मतत्व.  याच आधारावर जो त्याचाच आधार आहे .


त्याने घडवलेली तीन मडकी. म्हणजे स्थूल सूक्ष्म देह नाश पावणारी कच्ची मडकी.


या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व.  यावर अग्नीचा परिणाम नाही म्हणून भाजण्याचा प्रश्नच नाही.

 

त्यात सत्व रज तम हे तीन मूग रांधण्याचा प्रयत्न.  


रज तम हे हिरवे कधीच पक्व न होणारे. पण सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच नव्हता.


तीन काळ हे तेथील पाहुणे. 


भूतकाळ रुसून बाजूला झाला. वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून मागे जात आहे. भविष्य अजून नंबर न लागल्यामूळे जेवत नाही म्हणून कर्म अद्याप उदित व्हायचे आहे.


न जेवणारा भविष्य काळ याला क्रियमाण , संचित, व प्रारब्ध या तीन म्हशी.  या पैकी संचित व प्रारब्ध यांचा नवनिर्मितीचा काळ संपलेला व क्रियमाणाचा  कर्म झाल्या शिवाय कसा फळणार.


गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते ?


संत म्हणतात : 

प्रारब्ध, संचित क्रियमाण l

भक्तालागी नाहीत जाण I


या संचित क्रियमाणाला गुरु हे  'प्रत्येकी एक' म्हणजे 'तीन बुक्या' मारतात. पण ते आधीच नष्ट झाल्यामुळे हुकणे न लागणे हे घडणारच. 


हा अनुभव गुरु वाचून येणार नाही याचा अर्थ गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देवभावनेत जाता येणार नाही व त्या शिवाय त्रिगुणातीत होता येणार नाही. 

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - 

मी कसा दिसतो ते सांग 


बायको म्हणाली — 


मेघनादरिपु तात वधी ज्या नराला । 

ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 

त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 

तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 


🤔🤔🤔


नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना म्हणून त्यांने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.


मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? 

तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.

दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ? 

तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? 

तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात ) 

त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.


😂😂😂

*(नवरा मानसिक धक्क्यातून अद्यापही सावरलेला नाही)*