२०७०- एपीजे अब्दुल कलाम

२०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र

मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...

लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...

लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..

आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..

उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी

पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...

कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...

पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित

आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात

जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय

माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो

आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही

कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं

मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आई-भाऊसाठी परी मन खंतावत,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||१||

विसरली का ग? भादव्यात वरस झाल
माहेरीच्या सुखाला ग मन आसावल,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||२||

थांब जरासा

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा ! ॥धृ.॥

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥

गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले

चेहर्‍यावर चेहरे

चेहर्‍यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कॉपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

एका वर्षात अनेक वॆळा
इथे वाढदिवस साजरे होतात.
शुभेच्छा लाटणारांच्यासमोर
इथे शुभेच्छुकच लाजरे होतात.

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

याल्गार

नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो

केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो

खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो

रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो

कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो

रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन्‌ ’याल्गार’ म्हणालो

-गुरु ठाकूर
ओलेता गंधीत वारा
आला घेऊन सांगावा
पाझरला आतुर मेघ
त्या दूर अनामिक गावा

मन चातक व्याकुळ वेडा
इतुकेच म्हणे हरखून
येईल मेघ माझाही
जाईल मला भिजवुन

व्याकुळ अशी नक्षत्रे
कोरडीच केवळ जाती
भिजण्याच्या आशेवरती
कोमेजुन गेल्या राती

मिटल्यावर डोळे अजुनी
ऐकते सरींचे साद
त्या तेव्हाच्या भिजण्याचे
अंतरी अजुन पडसाद

- गुरु ठाकूर

सात


वेडात मराठे वीर दौडले सात

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

७ मराठे वीर



कुडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कुडतोजी गुजर.
यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.
पुढे कुडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कुडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
प्रतापराव आणि त्यांच्या त्या सहा वीरांना मानाचा मुजरा :

१) फर्जद, विसाजी बल्लाळ
२) फर्जद, दिपाजी राउतराव
३) फर्जद, विठ्ठल पिलाजी अत्रे
४) फर्जद, कृष्णाजी भास्कर
५)फर्जद, सिद्धी हिलाल
६) फर्जद, विठोटजी
७)आणि खुद्द फर्जद, कुडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर .

शंभुराजे


१४ मे १६५७ रोजी 'पुंरदरावर' धुंरधराच्या पोटी जन्माला आलेले युंगधर म्हणजे 'शंभुराजे' 
वयाच्या 2 ऱ्‍या वर्षी आईविना पोरका झालेले पोरके ' शंभुराजे'
वयाच्या नऊव्या वर्षी चार हजाराची मनसबदारी स्वीकारणारे ' शंभुराजे' 
वयाच्या दहाव्या वर्षी आग्राच्या भेटीला जाणारे 'शिवपुञ म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या अकराव्या वर्षी पाच हजाराची मनसबदारी स्वीकारणारे म्हणजे 'शंभुराजे' 
वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महारांचा भर दरबारात सत्कार करणारे 'सच्चे मिञ म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या चौदाव्या वर्षी 'बुधभुषण' नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहणारे 'महान संस्कृत पंडित म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या पंधराव्या वर्षी 'नाईकाभेद', 'सातसतक' सारखे ग्रंथ 'हिंदी' 'ब्रिज' भाषेतील 'भोजपुरी' भाषेतील महान ग्रंथ लिहणारे महान हिंदी पंडित म्हणजे 'शंभुराजे' 
वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार फौजचे कुशल नेतृत्व करणारे 'कुशल सैनानी म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या सतराव्या वर्षी फौंडा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजाना सहकार्य करणारे' शिवपुञ म्हणजे शंभुराजे'
वयाच्या अठराव्या वर्षी 'छञपतींच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या ऐकोणीसाव्या वर्षी 'संत तुकाराम' महाराज याची देहू ते पंढरपुर ही जगातील पहिली वारी सुरु करणारे ''शिवबा चे धारकरी तुकोबाचे वारकरी" वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभुराजे'' 
वयाच्या तेवीसाव्या वर्षी छञपतीँच्या गादीवर बसलेले 'छञतपीँचा वारसवयाचे म्हणजे शंभुराजे' 
वयाच्या तेहवीसव्या वर्षापासून वयाच्या बत्तीसाव्या वयापर्यत इंग्रज, डच, पोतुगीज ,फ्रेँच आणि मोगल या पाच सत्ताधाशी बरोबर प्राणपणाने लढणारे 'सह्याद्रीच्या वनामध्ये वनराजासारखे फिरणारे' 'वादळामध्ये सुद्धा दिवा होऊन जगणारे' ''वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राष्ट्रासाठी या महाराष्ट्रासाठी या भारतभुमीसाठी छञपतीच्या स्वराज्यासाठी स्वतःदेहाचे बलिदान करणारे बलिदानी राजा म्हणजे शंभुराजे''..

दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्विनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ||

दुर्गतोद्धारिणी दुर्गानिहन्त्री दुर्गमापहा ।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ॥

दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरुपिणी ।
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ॥

दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी ।
दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थंस्वरुपिणी ॥

दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी ।
दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्र्वरी ॥

दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ।
नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः ॥

पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः s॥

॥ इति दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला संपूर्णा ॥

खूब लड़ी मर्दानी वह ........

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी,
बरछी ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।
वीर शिवाजी की गाथायें उसकी याद ज़बानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवार।
महाराष्टर-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में,
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में,
राजमहल में बजी बधाई खुशियाँ छाई झाँसी में,
चित्रा ने अर्जुन को पाया, शिव से मिली भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई,
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई,
तीर चलाने वाले कर में उसे चूड़ियाँ कब भाई,
रानी विधवा हुई, हाय! विधि को भी नहीं दया आई।
निसंतान मरे राजाजी रानी शोक-समानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया,
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया,
फ़ौरन फौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया,
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया।
अश्रुपूर्णा रानी ने देखा झाँसी हुई बिरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया,
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया,
डलहौज़ी ने पैर पसारे, अब तो पलट गई काया,
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया।
रानी दासी बनी, बनी यह दासी अब महरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात,
कैद पेशवा था बिठुर में, हुआ नागपुर का भी घात,
उदैपुर, तंजौर, सतारा, करनाटक की कौन बिसात?
जबकि सिंध, पंजाब ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात।
बंगाले, मद्रास आदि की भी तो वही कहानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी रोयीं रिनवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार,
उनके गहने कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार,
सरे आम नीलाम छापते थे अंग्रेज़ों के अखबार,
'नागपूर के ज़ेवर ले लो लखनऊ के लो नौलख हार'।
यों परदे की इज़्ज़त परदेशी के हाथ बिकानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान,
वीर सैनिकों के मन में था अपने पुरखों का अभिमान,
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान,
बहिन छबीली ने रण-चण्डी का कर दिया प्रकट आहवान।
हुआ यज्ञ प्रारम्भ उन्हें तो सोई ज्योति जगानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी,
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी,
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थी,
मेरठ, कानपूर, पटना ने भारी धूम मचाई थी,
जबलपूर, कोल्हापूर में भी कुछ हलचल उकसानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम,
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अज़ीमुल्ला सरनाम,
अहमदशाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम,
भारत के इतिहास गगन में अमर रहेंगे जिनके नाम।
लेकिन आज जुर्म कहलाती उनकी जो कुरबानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में,
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में,
लेफ्टिनेंट वाकर आ पहुँचा, आगे बड़ा जवानों में,
रानी ने तलवार खींच ली, हुया द्वन्द्ध असमानों में।
ज़ख्मी होकर वाकर भागा, उसे अजब हैरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार,
घोड़ा थक कर गिरा भूमि पर गया स्वर्ग तत्काल सिधार,
यमुना तट पर अंग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार,
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार।
अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी रजधानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी,
अबके जनरल स्मिथ सम्मुख था, उसने मुहँ की खाई थी,
काना और मंदरा सखियाँ रानी के संग आई थी,
युद्ध श्रेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी।
पर पीछे ह्यूरोज़ आ गया, हाय! घिरी अब रानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार,
किन्तु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार,
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गये अवार,
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार।
घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी,
मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी,
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी,
हमको जीवित करने आयी बन स्वतंत्रता-नारी थी,
दिखा गई पथ, सिखा गई हमको जो सीख सिखानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी।
तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)
चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!
आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते
लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते
गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना
एकदा एक जोडपे २५ वर्ष न भांडता संसार करत असते,

नवर्याचा मित्र विचारतो कि याचे रहस्य काय ?

नवरा :- आम्ही दोघे हनिमून ला शिमल्याला गेलो होतो. दोघे घोड्यावर बसलो . घोडा खडत्यातून जाताना सौ खाली पडल्या
...
उठताना सौ म्हणाल्या काही हरकत नाही घोड्या हि तुझी १ लीच वेळ आहे. परत तसाच प्रकार घडला. परत सौ म्हणाल्या , हरकत नाही २ रिच वेळ आहे .

3rya वेळी मात्र सौंनी बंदूक काढली आणि घोड्याला गोळी घातली. मी म्हणालो आग काय सायकिक आहेस का काय ? त्या बिचर्या घोड्याच काय दोष

तुला नित बसता आले नाही तर ? या वर आमच्या सौ म्हणाल्या काही हरकत नाही तुझी पहिलीच वेळ आहे .

हे ऐकल्यावर मी आजपर्यंत दुसरी वेळ येऊनच दिली नाहीये.
चम्प्या - चिंगे !! आज मी तुझ्याकडून I LOVE YOU वदवून घेणारच...

चिंगी - शक्यच नाही...

चम्प्या - लागली शर्यत?

चिंगी - ओके...

चम्प्या - काजू म्हण...

चिंगी - काजू..

चम्प्या - आता हेलीकॉप्टर म्हण...

चिंगी - हेलीकॉप्टर...

चम्प्या - तुझं वय काय?

चिंगी - २१ वर्ष..

चम्प्या - हुर्रे !! मी जिंकलो...शेवटी तू मला तुझं वय सांगितलस..

चिंगी - तू हरलास...तू म्हणाला होतास कि माझ्या तोंडून I LOVE YOU वदवून घेशील...

चम्प्या - बरं...मी आता खरच जिंकलो
चम्प्या कोका कोलाचा ग्लास टेबल वर ठेऊन उदास
बसला होता...
झंप्या आला आणि त्याने तो ग्लास पिऊन टाकला...
आणि बोलला - अरे चम्प्या !! इतका उदास का रे तू?
...
चम्प्या - अरे यार...आजचा दिवसच बेकार आहे यार...
सकाळी सकाळी बायकोशी भांडण झालं..
ऑफिस ला जाताना गाडी खराब झाली..
रिक्शा ने जात होतो तर रिक्शा चा एक्सिडेंट झालं..
ऑफिस मध्ये उशिरा पोहोचलोम्हणून बॉस ने नौकरी वरून
काढून टाकलं..
आणि विष टाकलेलं कोका कोला प्यावं म्हटलं तर..
तो तू पिऊन टाकलास..

ईश्वरस्तुती

II ॐ नमो भगवते वासुदेवाय II

गोविंदं गोकुलानंदम
गोपालं गोपीवल्लभम
गोवर्धनधरं वीरं
तं वंदे गोमतीप्रियम II धृ II

नारायणं निराकारम
नरवीरम नरोत्तमम
नृसिंहं नागनाथंच
तं वंदे नरकांतकम II धृ II

पितांबरं पद्मनाभम
पद्माक्षं पुरूषोत्तमम
पवित्रं परमानंदम
तं वंदे परमेश्वरम II धृ II

राघवं रामचंद्रंच
रावणारिं रमापतीम
राजीवलोचनं रामम
तं वंदे रघुनंदनम II धृ II

वामनं विश्वरूपंच
वासुदेवंच विठ्ठलम
विश्वेश्वरं विभुम व्यासम
तम वंदे वेदवल्लभम II धृ II

दामोदरं दिव्यसिंहम
दयालुं दीननायकम
दैत्यारिं देवदेवेशम
तं वंदे देवकीसुतम II धृ II

मुरारिं माधवं मत्स्यम
मुकुन्दं मुष्टीमर्दनम
मुंजकेशं महाबाहुम
तं वंदे मधुसूदनम II धृ II

केशवं कमलाक्षंच
कामेशं कौस्तुभप्रियम
कौमुदेतीधरं कृष्णम
तं वंदे कौरवांतकम II धृ II

भुधरं भुवनानंदम
भूतेशं भूतनायकम
भावनैकं भुजंगेशम
तं वंदे भवनाशनम II धृ II

जनार्दनं जगन्नाथम
जगच्चैकं विनाशकम
जामदग्न्यवरं जोगीम
तं वंदे जलशायिनम II धृ II

चतुर्भुजं चिदानंदम
चाणूरमल्लमर्दनम
चराचरगतं देवम
तं वंदे चक्रपाणिनम II धृ II

श्रियःकरं श्रीयोनाथम
श्रीधरं श्रीवरप्रदम
श्रीवत्सलधरं श्यामम
तं वंदे श्रीसुरेश्वरम II धृ II

योगीश्वरं यज्ञपतिम
यशोदानंददायकम
यमुनाजळकल्लोळम
तं वंदे यदुनायकम II धृ II

शालीग्रामं शिलासूक्तम
शंखचक्रोपशोभितम
सुरासुरसदासेव्यम
तं वंदे साधुवल्लभम II धृ II

त्रिविक्रमम तपोमूर्तिम
त्रिविधाभोगनाशनम
त्रिस्थलं तीर्थराजेंद्रम
तं वंदे तुलसीप्रियम II धृ II

अनंतं आदिपुरूषम
अच्युतंच वरप्रदम
आनंदंच सदानंदम
तं वंदे अघनाशनम II धृ II

लीलयाकृतभूभारम
लोकस्त्वैकवंदितम
लोकेश्वरम च श्रीकांतम
तं वंदे लक्ष्मणप्रियम II धृ II

हरींच हरिणाक्षींच
हरिनाथं हरीप्रियम
हलायुधसहायंच
तं वंदे हनुमत्पतिम II धृ II
गुलाबी पहाट सोनेरी प्रकाश
नव्या स्वप्नांची नवी लाट !!!
"नवे प्रयत्न ,नवा विश्वास ,
नव्या यशासाठी नवी सुरवात" ........

येणारे नवीन "मराठी "वर्ष आपल्याला यशाचे ,सुखाचे ,समृद्धीचे जाओ.....
ह्याच गुडी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा

गुढीपाडव्याचे महत्त्व

विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :
१. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.
दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते 'शक' असा दोघांचाही अंतर्भाव 'शालिवाहन शक' यामध्ये करण्यात येतो.


२. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.


३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.


गुढीपाडवा असा साजरा करावा!

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.


अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने 'नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.

निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।
ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।
कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।
भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.


पंचांगाचे महत्त्व

गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्ाावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.
कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वषेर् आहेत. त्यापैकी पाच हजार १०९ वषेर् झाली. येत्या रविवारी गुढीपाडव्याला ५११० वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. 'योग' हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग 'करवा' हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.
- दा. कृ. सोमण / Maharashtra Times


इतिहास

आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.

जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
स्वागत नवं वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धीचे,
पडता द्वारी पाउल गुढीचे,
शांत निवांत शिशिर सरला.
सळसळता हिरवा वसंत आला.
कोकिळेच्या सुरवाती सोबत,
चैत्र "पाडवा" दारी आला.

"नूतन वर्षाभिनंदन "
श्रीखंड पुरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नवं वर्ष जावो छान.
सोनपिवळ्या किरणांनी,
आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे,
नवं वर्षाचा हर्ष.

हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गुडी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
नवं वर्षाच्या शुभेच्छा !
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नवं वर्षाच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग -गंधाच्या उत्सवात,
सामील होऊ या सारेजण,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन,
साजरा करूया नववर्षाचा सण,
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा!

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.

नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

गुढी उभारण्याची पद्धत:

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.



गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.

आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.

इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.


आंब्याच्या पानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व


गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.


खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी


अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !
आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्‍ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्याचरणी प्रार्थना !

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

असं प्रेम करावं ...

थोडं सांगावं थोडं लपवावं,

असं प्रेम करावं

थोडं रुसावं थोडं हसावं,

असं प्रेम करावं

गुपचुप फोन वर बोलावं,

कोणाची नाज़र पडताच पटकन ""अरे चा "अगं" करावं

असं प्रेम करावं


जग पुढे चाललं असलं

तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,

फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,

आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,

असं प्रेम करावं




कुठे भेटायला बोलवावं,

पण आपण मात्र उशिरा जावं

मग आपणच जाऊन sorry म्हणावं,

असं प्रेम करावं


वर वर तिच्या भोळसट पनाची,

खूप चेष्टा करावी,

पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,

असं प्रेम करावं


प्रेम ही एक सुंदर भावना,

हे ज़रूर जाणावं,

पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं

असं प्रेम करावं



विरह येतील, संकट ओढवतील,

प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,

पण आपण मात्र खंबीर रहावं,

असं प्रेम करावं



एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

म्हणूनच जीवापाड जपावं,

असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ...

मनी माऊ

मनी माऊ मनी माऊ.....
मनी माऊ मनी माऊ येतेस का ग भूर?
नको रडू इतकी
आता येईल ना ग पूर

दिवसभर हिंडू
सगळीकड़े भटकू
आईला ही न सांगता
जाऊ आपण भूर
मनी माऊ मनी माऊ
आता येईल ना ग पूर
नको रडू इतकी
चल जाऊ आपण भूर

रागवत असते आई तुझ्यावर सारखी
त्तिला वाटतं तू आहेस अजुन ही बारकी
थांब......आज जाउच आपण भूर
आपली येऊ दे मग तिला आठवण
आठवणींची आपल्या मग करत बसू दे तिला साठवण

आठवत आठवत
बसेल मग रडत
रडत रडत म्हणेल मग
"कुठे गेला ग चिऊ-माऊ तुम्ही?
अस मला एकटीला सोडून?"

कपाटा मागुन बघू आपण हे सगळ
आणि मग हळूच जाऊ
आणि करू तिला "भू"...!!!!

मनी माऊ मनी माऊ
हस ना ग आता तरी
मनी माऊ मनी माऊ
आता येईल ना ग पूर
नको रडू इतकी
चल जाऊ आपण भूर

सचिन इफेक्ट

अबीर गुलाल

अबीर गुलाल उधळीत रंग |
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥


  -  संत चोखामेळा

जीवन

अस का बर हे जीवन असत
जे आपल असत ते आपल कधीच नसत
आणि जे आपल नसत तेच गळ्यात पडत
कितीही रडलो तरीही जीवन मात्र पुढेच सरत.

वाटल न्हवत

वाटल न्हवत तू इतकी बदलशील
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!
आयुष्यात तू नाही आता
भासात तुला शोधतो आहे
तू जवळ नसलीस तरी
विरहावर तुझ्या मी प्रेम करतो आहे !!
का शोधू मी तुला, हरवलेली नसताना,
भरून येते मन तुला शब्दात पाहताना,
दूर गेल्याचा त्रास आहेच खर जास्त,
पण या वरही विरजण पडते तुझे हास्य स्मरताना!!

क्षणिक मैत्री

कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...

आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
पळून जाण्यासाठी
कधीच नसत हे आयुष
कितीही रडवल नियतीने
आपण मात्र तिला हसून फसवायचं

पूल शब्दांचे

भावनाच असते पुरेशी
समजण्या गुज मनीचे
काहींसाठी मात्र,
बांधावे लागतात पूल या शब्दांचे !!

नियति

कोणासाठी थांबवावं
इतक आयुष्य स्वस्त नसत
झोडपल जरी नियतीने
उठून तिच्यावर धावून जायचं असत !!
स्वप्नांच्या 'त्या' राज्यात
स्वर्गाचेही आपण राजे
भानावर येता उमगे
काही चौकोनातच आयुष फसे
तुझ माझ नात
नेहमी अनोळखीच राहिलं
जखम नसलेल्या हृदयाला
या पापण्यांनी रडताना पाहिलं.

खपल्या

ओल्या त्या जखमांवरून
पुन्हा कोणीतरी फुंकर घालेल
मायेने कुरवाळून त्यांना
पुन्हा त्यांवरच्या खपल्या काढेल !

प्रेम

प्रत्येक वेळेस का आवरायचं मनाला
का घाबरायचं दरवेळेस प्रेमाला
प्रेमात माणूस आंधळा होतो हे खरय
पण प्रेमच शिकवत विरहात जगायला !!

बावळ मन

अस कस हे बावळ मन
कितीही मिळाल तरी याच भागात नाही
शोधात बसत प्रेम इकडे तिकडे
सोबतच्या मायेच्या माणसांकडे मात्र हे पाहतच नाही !!

प्रीत

प्रीत हि असली नको मजला
विरह देऊनी ना तू थकला
बघ एकदा त्या तुझ्या वहीमध्ये
गुलाब हि तो आता पुरा कोमेजला !!

इतकेही प्रेम करू नये.....

इतकेही प्रेम करू नये कि ,
प्रेम हेच जीवन होईल ,
कारण प्रेम भंग झाल्यावर ,
जिवंतपनीच मरण येईल


सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी ,
अखेर साक्षीला उरते ,
केवळ , डोळ्यात पाणी

जीवनाच्या या वाटेवर ,
खूप वाटसरू भेटतात ,
भेटणारे भेटतात पण ,
फक्त काहीच जण साथ देतात


डोळ्यातून अश्रू ओघळला कि ,
तो हि आपला राहत नाही ,
वाईट याचंच वाटत कि ,
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही

मैत्री म्हणजे.....

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...

क्रिकेटाभिषेक

आज क्रिकेट धन्य झाला
क्रिकेटच्या देवाचा आज क्रिकेटाभिषेक झाला
१०० वी सेन्चुरी ही या देवाचा मुकुट आहे
गेली दोन दशक गाजवली सार्या
जगावर सचिनची हुकुमत आहे........

क्रिकेट म्हणजे सचिन...
हेच या देवाचे धन आहे
फक्त आनंद वाटायचा हे
सचिनच्या फलंदाजीचे ब्रीद आहे,,,,,,

चौकार, षटकारांच्या राशी जयापाशी
धावा लोळण घेती तयाच्या चरणाशी
एकदिवशीय सामन्यातले पहिले द्विशतक तयापाशी
शतकांच शतक त्याच्या शोभे मुकुटाशी

धन्य झालो आम्ही लाभले आम्हास भाग्य
जो खेळ त्याचा या डोळ्यांनी पाहीला
भारतपुत्र सचिन भारतरत्न होवू दे
क्रिकेटसाठी तयाने जन्म सारा वाहिला........

अजूनही खेळतोय........ अजूनही खेळू दे
देशाबरोबर मराठ्यांचेही नाव असेच
असंच जगभर गाजु दे.........
क्रिकेटचा चा हा देव
असाच खेळत राहूदे......
असाच खेळत राहूदे.....

कवी - गणेश पावले

शतकांच शतक लावल्याबद्दल भारतपुत्राचे अभिनंदन...!!!

Iजय शिवराय

अंधार झाला तर रात म्हणतात,

तांदूळ शिजला तर भात म्हणतात,

महाराष्ट्र राज्यात राहून ज्याला

शिवराय माहित नाहीत

त्याला हिजड्याची जात म्हणतात.....



II जय शिवराय II
आयुष्य आपल्याला खूप काही शिकवते

एका प्रसिद्ध चायनीज कवीने लिहिलेच आहे

“शिंगुया ची चोन्गो इतिमा शिन शून् उना पिन पिंगो चिंग चुआ”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मनाला लागले नं अगदी...???

वाचून तर डोळ्यात अगदी पाणी आले...!!!

झुरळ व पाल

डॉक्टर - जेंव्हा तुम्हाला माहित होतं कि तुमच्या तोंडात पाल जात आहे..तेव्हाच तुम्ही तिला काढायचा प्रयत्न का नाही केला?
.
.
चम्प्या - अहो डॉक्टर !! माझ्या तोंडात तिच्या आधी एक झुरळ घुसलं होतं..
मला वाटलं ती पाल त्या झुरळाला पकडायला चाललीये...

राजे

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे ...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!...

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !...
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !...

झुकवून तुतारी माना, शंख नाद हा वाजे....
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!...

उत्तुंग हिमालय, शान हिंदवी
जगदंबेचा टिळा !...
सुराज्य थाटले, मेढ रोवली
स्वातंत्र्याची शीळा !...

ही तलवार भवानी पाहून, तोफ फिरंगी लाजे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!...

ते रक्तं सांडले, प्राण वेचले
नसे उगाच बाता !...
जगणे त्यांचे, जगणे होते
त्या वेगळ्याच वाटा !...

ही आहुती त्या वीरांची, काय तुझे नि माझे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!...

- सुधीर मुळीक
रात्री चम्या फ़ुल टाईट होऊन शनिवारवाड्यापाशी एका रिक्षावाल्याला :
"चल, मला शनिवार वाड्याला घेऊन चल".
रिक्षावाला : अहो. हाच तर शनिवार वाडा आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
चम्या : हे घे १०० रुपये. इथुन पुढं एवढि जोरात रिक्षा चालवु नकोस.!!
चम्प्या :- ए झंप्या चल आपण दुकान-दुकान खेळू ".
झंप्या :- ठीक आहे चल खेळू, पण मी दुकानदार बनील तू ग्राहक बन.
चम्प्या :- ठीक आहे..

थोड्या वेळात चम्प्या येतो आणि म्हणतो :- काका या बॉटल मध्ये १ किलो तांदूळ द्या.

झंप्या :- ए पागल बॉटल मध्ये कधी तांदूळ मागतो का ?? जा परत जा..
...

चम्प्या थोड्या वेळात येतो :- काका या बॉटल मध्ये १ किलो गहू द्या..
...
झंप्या :- ए पागल बॉटल मध्ये गहू पण नाही मिळत..जा परत जा मूर्ख.

चम्प्या थोड्या वेळात परत :- काका काका या बॉटल मध्ये १ किलो ज्वारी द्या.

झंप्या :- अरे किती मूर्ख आहेस तू..काही अक्कल नाही तुला.ठीक आहे तू
दुकानदार बन.मी ग्राहक बनून येतो...

थोड्या वेळात झंप्या ग्राहक बनून येतो :- काका काका मला जरा ५ किलो तांदूळ, १ किलो गहू द्या बर..
.
.
.
.
चम्प्या :- बॉटल नाही आणली का सोबत ??

स्पर्धा परीक्षा

एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला..

ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..

चम्प्याने एक नाण काढल आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली..

हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’

आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..
सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..

शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन नाण फ्लिप करतच होता.

सर- हे काय करतोय?

चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.

वेडा न्हावी

मुलगी:- मी जेव्हापण फोन करते तेव्हा तु शेव्हींग करत असतोस,

दिवसातुन कितीवेळा शेव्हींग करतोस...?

मुलगा:- ३०-४० वेळेस,

मुलगी:- वेडा आहेस का?

मुलगा:- नाही न्हावी आहे....!

अजुन एक चटई

एकदा गणेश एका मठावर गेला सात साधू सात चटई टाकून त्यावर बसले होते...
गणेशने सगळ्यात मोठ्या साधूला विचारले
"बाबा आजकालच्या मुली लवकर पटत नाहीत हो, जरा काहीतरी उपाय सांगा ?"
बाबा हसले आणि ७ व्या साधूला म्हणाले . .
गणेशपंत , अजुन एक चटई टाक रे..!!!

प्राजक्ताची फुले

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भीर भीर भीर भीर तया तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डु ले !

दूर दूर हे सूर वाहती
उनहात पिवाल्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !


गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातून फुले !


फुलांसारखे सवर फु ला रे
सुरातसूर, मिसलुनी चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

कवी-मंगेश पाडगावकर

याचंच नाव 'आयुष्य'

जे आपल्याला हवं असतं,

ते आपल्याला कधी मिळत नसतं,

कारण जे आपल्याला मिळतं,

ते आपल्याला नको असतं,

आपल्याला जे आवडतं,

ते आपल्याकडे नसतं,

कारण जे आपल्याकडे असतं,

ते आपल्याला आवडत नसतं,


तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो,

याचंच नाव 'आयुष्य' असतं !

पाऊस व ती

एकटीच मला ती दिसली होती
उनाड पावसात भिजली होती
मी हि भिजत होतो
ती बघेल म्हणून बघत होतो
तिने पहिले अन विचारले
कारण मला भिजण्याचं
मी हि विचारलं कारण तिचं
एकटी बाहेर पडण्याचं
असंच भिजावं वाटतंय
आभाळ फुटावं असं वाटतंय
मला म्हणाली, चल भिजूया
बघ, पावसाची सर आली
तिच्या बरोबर भिजण्याची
खरच इच्च्या झाली
तिचं अल्लड धावणं
पावसासारखं
मातीत खेळणाऱ्या
पोरानं सारखं
वाकलेल्या झाडाची फांदी
तिने हळूच धरली
शुभ्र मोगर्यांच्या फुलांनी ओंजळ
भरली
किती छान फुले आहेत या
झाडाला
मी चरकलो,
कशी येतील मोगऱ्याची फुले
कडू निम्बाला
तिला समजले हा प्रयत्न
माझाच होता
पुढच्याच क्षणी तीचा
हात माझ्या हातात होता
म्हणाली,
मनात होतं, मग एवढा उशीर का?
मला कधीच कळलंय अन तू एवढा बधीर का?
वेड्या, खूप प्रेम आहे माझे तुझ्या वर
♥ ♥ ♥, तुझ्या वेडेपणावर!

वास्तववादी प्रेम

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करतनाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं....

तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं...

काचेचं शामदान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं....

नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला, खूप झालं....

मला नाही जमणार तुला न्यायला लँाग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं....

तुला नाही समजली माझी कविता चालेल..
हिशोब समजतोय ना? खूप झालं....

नसू आपण रोमियो-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण..
खूप झालं......

शहाणा झालेला राजपुत्र

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगीतला.

"आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर !" ती रडत म्हणाली.

"तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला.

राणी काय करणार काय बोलणार ? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये !"

"तुमची आज्ञा प्रमाण " असे म्हणून पित्याच्या पाय पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.

"हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू. " ती म्हणाली.

आईचां आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.

लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली.

"कोण तुम्ही कुठल्या ? या रानावनातून एकटया कुठे जाता ? "

"मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली.

"ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला.

दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडुक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची ? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उडया मारीत गेला. सापाची भूक शमली ; बेडकाचेही प्राण वाचले.

भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरूण येत होता.

"कोण रे तू ? कुठला ? रानावनात एकटा का ?" राजपुत्राने विचारले.

"मला तुमचा भाऊ होऊ दे. " तो म्हणाला.

"ठीक हरकत नाही. " राजपुत्र म्हणाला.

तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला.

"मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका. " तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू; त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने ?

जवळच एक शहर दिसत होते. प्रसादांचे; मंदिराचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला "त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती; घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाचे मिरवत नेण्यासाठी या !"

दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला; नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते; ठायी ठायी आसने; फुलांचे गुच्छ होते; पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह; त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले.

आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोडयांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाडयात उतरला. तेथील जीवन सुरू झाले.

"तू रे कोण ?" राजपुत्राने विचारले.

राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्कर्‍या होता. राजाने त्याला विचारले.

"कोण आला आहे राजपुत्र ?"

"मी बातमी काढून आणतो." तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजपुत्राकडे गेला. पहारेकर्‍यांनी त्याला हटकले. तो म्हणाला;

"मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे."

नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.

"पाठवा त्याला." राजपुत्र म्हणाला. खुशमस्कर्‍या आला. राजपुत्राची तो करमणुक करू लागला. तो तेथील हास्यविनोद एकून त्याची बहीणही आली. थोडया वेळाने खुशमस्कर्‍या जायला निघाला.

"येत जा !" राजपुत्र म्हणाला.

"राजाने येऊ दिले तर !" तो म्हणाला.

खुशमस्कर्‍या राजाकडे गेला व म्हणाला;

"राजा; राजा; त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा !"

"ठीक आहे." राजा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला; आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला;

"तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो."

"ती माझी बहीण !"

"ती माझी राणी होऊ दे !"

"मी तिला विचारीन !"

"कळवा मला काय ते !"

राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली.

"राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही !"

राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कर्‍या आला.

" काय उपाय ? " राजाने विचारले.

" त्याला म्हणावे; तुझी बहीण तरी दे; नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधार्‍या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो; नाहीतर डोके उडवण्यात येईल ! "

राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली;

" दादा का रडतोस ? "

त्याने तो वृतांत सांगितला.

ती म्हणाली; " गावाबाहेर जाऊन दो कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस ! "

राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावर ती हरिणी बनली. वार्‍याप्रमाणे ती पळत सुटली. अंधार्‍या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले येऊन ती म्हणाली;

" जा; राजाला ही नेऊन दे ! "

राजपुत्राने तार्‍याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्कर्‍याला म्हणाला; " आता कोणता उपाय ? "

" त्याला सांगा की; बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे; नाही तर डोके उडवीन ! '' खुशमस्कर्‍याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला;

" दादा का रडतोस ? "

राजपुत्राने वृज्ञल्तलृांत निवेदिला.

" रडू नकोस; दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस !"

राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डरांव; डरांव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडुक जमा झाले. तो त्यांना म्हणाला; " त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन: पुन्हा बुडया मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू; राजाच्या अंगणात ढीग घालू ! "

सार्‍या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणार्‍या मोत्यांचे ढीग पडले.

भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला " राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीची मोती निवडुन घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून ! "

राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाडयात परत आला. राजाने खुशमस्कर्‍याला विचारले " आता काय ? "

" त्या राजपुत्राला म्हणावे; बहीण दे; नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून येते." खुशमस्कर्‍याने सुचविले.

" तो स्वर्गात कसा जाणार ? "

" तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू ! "

राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला " दादा; का दु:खी ? " राजपुत्राने सारी कथा सांगितली.

" रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा; की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा ! " राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला.

" महाराज; या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या." सर्प म्हणाला.

" हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल." शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले ने तो निघुन गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला; " दादा जा व राजाला सांगा की; त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्कर्‍याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या !"

राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाडयासमोर ही गर्दी ! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्कर्‍यास बोलावले व सांगितले;

"अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे ! "

"मी कसा जाऊ ?"

"या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा !"

लोकांनी टाळया पिटल्या. " दुष्टाची बरी जिरली!" कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाडयात आला व भावंडांना म्हणाला; "हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो. येथे राहण्यात अर्थ नाही. चला आपण जाऊ."

रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फारळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला;

"दादा; मला निरोप दे! मी जातो!"

"मला कंटाळलास?"

"दादा; मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा; सुखी व्हा!"

असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोडया अंतरावर फण फण करीत निघून गेला. थोडया अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला; "दादा; मलाही निरोप दे!"

"का रे जातोस ?"

"दादा; मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!" असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुन उडया मारीत निघून गेला.

पुन्हा थोडया अंतरावर बहीण म्हणाली;

"दादा; मलाही निरोप दे!"

"तूही चाललीस ?"

"होय दादा. पादसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मयाळू हो!"

बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वार्‍याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली.

राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी ! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे;

असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थीत होती.

"कोण आहे ? " पहारेकर्‍यांनी दरडावले.

"मी राजपुत्र."

" माझा बाळ ! माझा बाळ ! " म्हणत राणी घावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला.

" शहाणा होऊन आलास ? " राजाने विचारले.

" होय तात ! " तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊ या. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.

सोनसाखळी

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.

सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई. आपल्या जवळ निजायला घेई. तिच्या जवळ कितीतरी खेळ किती बाहुल्या किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी. छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.

सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे "बाबा मला भरवा. मी मोठी झाले, म्हणून काय झाले ?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.

सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला "हे बघ मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको मारू नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."

सावत्र आई म्हणाली "हे मला सांगायला हवे ? तुम्ही काळजी नका करू. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुटया भात जेवायला वाढीन कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन वणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरूप परत या."

सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.

एक दिवशी तर तिच्या कोवळया हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईनं डाळिंबाचे झाड लावले.

काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळयांत पाणी आणून म्हणाली "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा तेथे कोणाचे काय चालणार ?"

बाप दु:खी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना झोपताना डाळयांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे.

त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले ! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी.

शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळिंब. कलिंगडाएवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणार तोच आतून गोडसा आवाज आला "हळूच चिरा मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले.

बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा बाबा पुन्हा मला साडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीकत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही असत्य छपत नाही मला कळले. मी नीट वागेन." पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीनं वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.

गिरीशिखरे चढणार

गिरीशिखरे चढणार
जगाच्या माथ्यावर जाणार ||

काळा कातळ सह्याद्रीचा
कणा आमुच्या महाराष्ट्राचा
यशवंती मी बनुनी मानवी
सर सर सर चढणार ||

बर्फ कडा वा हिमालयाचा
वास तिथे शैलजाशिवांचा
चढुनी तेथे मी या नयनी
कैलासा बघणार ||

शिखरी चढुनी निरखीन सृष्टी
वार्‍यासंगे सांगीन गोष्टी
हात उभवुनी टाचा उचलुनी
आकाश धरणार ||

मनीची बाळे


आमच्या मनीला
पिले झालीत छान
एक आहे काळे
एक गोरेपान

गोर्‍यापान बाळाचे
डोळे आहेत निळे
काळे काळे पिल्लू
फार करते चाळे


मनीच्या बाळांचं
करायचं बारसं
पाहुण्या माऊंना
दूध देऊ गारसं

गोर्‍या बाळाचं नाव
ठेवायचं नीलम.
काळयाचं सांगू?
त्याचं नाव द्वाडम

बडबड-गीत


ससोबा साजरे
खातात गाजरे
या की जवळ
भारी तुम्ही लाजरे



कावळोबा काळे
फिरवता डोळे
लावा बुवा तुमच्या
तोंडाला टाळे






चिमुताई चळवळे
इथे पळे तिथे पळे
बसा एका जागी
पायात आले गोळे
मिठूमिया मिरवे
अंग कसे हिरवे
सारखे काय तेच
बोला की नवे


गाडी

घडाडधड खड खड खड
झुक झुक गाडी चालली
दोहीकडे झाडं पहा
कशी पळू लागली

खडाडखड धड धड धड
किती हिची गडबड
गप्प बसणं माहीत नाही
सारखी हिची धडपड

सों सों सों सों वारा येतो
डोळयात जाते धूळ
वेडयासारखी पळत सुटते
लागलंय हिला खूळ

दंगा करीत शिट्टया फुंकीत
गाडी सुटते पळत
तरी हिला मुळीच कसा
मार नाही मिळत?

साबणाचे फुगे



जादूची बाटली
त्याच्यात पाणी
फुगे आत
ठेवले कोणी?

काडीवर बसून
बाहेर येतात
रंगीत झगे
बघा घालता

वार्‍यावरती
होतात स्वार
किती मजेचे
रंगतदार

हात लावता
फट्ट फुटले
बघता बघता
कुठे पळाले?

जिराफदादा जिराफदादा
खरंच का रे
उंच मान करून
मोजतोस तारे?

द्वाडपणा केलास
बाप्पानं धरला कान
म्हणून का उंटदादा
वाकडी झाली मान?

चित्तेदादा चित्तेदादा
काळे डाग कसे
शाईने अंगावर
पाडलेस का ठसे?

चिऊताई

चिऊताई चिऊताई
चिंव चिंव चिंव

मी पुढे पळते
तू मला शिव

टुण टुण टुण
चल मार उडी

चल आपण खेळू
दोघी फुगडी

भुर्र भुर्र भुर्र
उडून नको जाऊ

चल ये खेळू
देते तुला खाऊ

लवकर उठ
बघ आली माऊ

पटकन पळ
तुझाच होईल खाऊ


माकडदादा माकडदादा
हूप हूप हूप
उडया चला मारुया
खूप खूप खूप
ससेभाऊ ससेभाऊ
पैज लावू चला
पहा कसा धावतो
हरवा पाहू मला!

बेडूकराव बेडूकराव
नका मारू बुडी
तुमच्याहून बघा
लांब मारीन उडी
हसता काय सारे
मारीत नाही गप्पा
दुध पितो म्हणून
जोर देतो बाप्पा

कवियत्री: माधुरी भिडे

रिस्क

एक आंधळा माणूस बारमध्ये पिऊन टून्न झाल्यानंतर टेबलवर थाप देवून जोरात ओरडला, '' सरदारजीचा जोक कुणाला ऐकायचा आहे?''

त्याच्याजवळ आठ दहा जण जमा झाले.

त्याच्या कानाशी कुणीतरी जावून हळू आवाजात म्हणालं, '' जोक सांगण्याच्या आधी तूला काही गोष्टी माहित असायला हव्यात''

'' कोणत्या?''

'' की या बारचा मालक आणि बारचे दोन नोकर सरदारजी आहेत, मीही सरदारजी आहे, एवढच नाही तर माझ्या उजव्या बाजुला उभा असलेला पावने सहा फुट उंच दिडशे किलो वजन असलेला ग्राहक सरदारजी आहे, आणि माझ्या डाव्या बाजूला उभा असलेला ग्राहक सहा फुट उंच, दोनशे किलो वजन असलेला बॉडीबिल्डर पहिलवान ग्राहकही सरदार आहे...म्हणजे आम्ही सहा-सहा जण इथे सरदार आहोत... आता तू ठरव की तरीही तुला जोक सांगायचा आहे का? ''

तो आंधळा मनुष्य म्हणाला, '' मला वाटते तोच तोच जोक सहा-सहा वेळ समजावून सांगण्यापेक्षा न सांगितलेला केव्हाही बरा''

सरदारजीची मदत

एका डॉक्टरला एका सरदारजीचा रात्री बारा वाजता फोन आला,

'' डॉक्टर साहेब .. आता मी घरी परत चाललो होतो तेव्हा मला एक माणूस रस्त्यावर पडलेला आढळला. मी त्याच्याजवळ गेलो पण मी एवढा गोंधळलेलो आहे की मला समजत नाही आहे की मी काय करु?''

डॉक्टरने म्हटले, ""धीराने काम घ्या... जास्त घाबरण्याचे कारण नाही... मी स्टेप बाय स्टेप जे जे सांगतो तसे तसे करत जा बस...''

'' ठिक आहे '' तिकडून सरदारजी म्हणाला.

पुढे डॉक्टर म्हणाले , '' आता सगळ्यात आधी तो मणूष्य जिवंत आहे का मेला आहे याची पुर्णपणे खात्री करा ''

तिकडून फोनवर डॉक्टरला 'धाड' बंदूकीचा आवाज आला.

'' हो केली खात्री... तो मेला आहे... आता पुढे काय करु? '' सरदारजीने विचारले.

आता फुलांनी थोडं

आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...

पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...

इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...

कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव.......

करण जाधव

माझी प्रेयसी एम.बी.बी.एस.

माझी प्रेयसी.....

तिला म्हणलो.., मला आज काळ झोप येत नाही..,
काय करू तुझी आठवण मला झोपूच देत नाही...,
क्षणभर विलंब न करता तिने तिची पर्स उघडली..,
झोपेची गोळी काढून ..तिने हातावर ठेवली ...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणालो माझ्या प्रत्येक श्वासात तिचाच गंध आहे...,
रक्ताच्या प्रत्येक ठेम्बास .. तुझाच रंग आहे...,
ती म्हणाली धीर धर..अजून थोडासा उशीर आहे...,
उद्या आमच्या रुग्णालयात ...मोफत रक्त शिबीर आहे...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणलो तुझ्यासाठी काहीही करू शकतो ...,
माझ रुदय काढून..तुझ्या हाती देवू शकतो ..,
त्याक्षणी ती उठली ...आत निघून गेली...,
माघारी येताना ती देसेशन बॉक्स घेऊन आली...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली ...,
तिने तिची ओढणी ...माझ्या पायावर बांधली...,
नजरेस नजर मिळवून ..मला हळूच ती म्हणली...,
पडलास तू पण जख्म माझ्या काळजाला झाली...,
....तर माझी हे केस अशी आहे...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

विवेक राजहंस,पुणे

१००%

झंप्या - चिंगे !! काल चम्प्या मेला..

चिंगी - कसं काय???

झंप्या - मी त्याला म्हणालो होतो कि "जे काम करशील, त्यात १००% देत जा"

चिंगी - मग त्याने काय केलं...

झंप्या - त्याने काल रक्तदान केलं..

पकका मारवाडी

एक मारवाडी शेवटच्या घटका मोजतोय .
तो बायकोला म्हणतो 'अग तू कुठे आहेस ?
बायको म्हणते ,मी तुमच्या पायाशी आहे स्वामी.
आणि मुलं कुठे आहेत ?
ती काय तुमच्या उशाशी बसली आहेत, तो म्हणतो

अरे सगळे इथेच आहात..........
...... तर गल्ल्या वर कोण बसलाय?

ज्वेलर चं दुकान

झंप्याची बायको - कुठे आहेस रे?

झंप्या - अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?
ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..

झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...

झंप्या - बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात...

रव्याचे थालीपीठ

१ कप रवा
एखादी कोवळी काकडी (मोठी असेल तर अर्धी)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ कप ओले खोबरे
मुठभर कोथिंबीर चिरुन
चवीप्रमाणे मीठ
पाणी लागेल तसे



कृती -
पाणी वगळून बाकीचे सगळे एकत्र करायचे. लागेल तसे पाणी घालत साधारण भज्याच्या पिठासारखे भिजवायचे. नेहेमीच्या डोश्याच्या पिठाहून हे पीठ घट्ट असते आणि आपल्या भाजणीच्या थालिपीठाहून बरेच सैल असते.
तवा तापत ठेवायचा. त्यावर हाताने साधारण १/४ कप पीठ घालायचे आणि हातानेच पीठ पसरवत थालिपीठासारखे करायचे. गरज लागेल तसे थोडे थोडे पाणी लावत एकसारखे थालीपीठ पसरायचे.
एक बाजू भाजून घ्यायची. उलटवून दुसरी बाजू भाजायची.
गरम गरम थालिपीठ लोण्याबरोबर आणि चटणीबरोबर खायचे.
निस्त्याच्या चटणीबरोबर हे डोसे एकदम भारी लागले.

टीपा -

गरम तव्यावर थालीपीठे लावणे सुरुवातीला थोडे अवघड गेले तरी सवयीने पटापट जमते.
कलिगडाचा पांढरा भाग खिसुन घालायला हरकत नाही.

बेडरूम

एका रात्री बंड्याची बायको रात्री उशिरा घरी परत
आली बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले कि ब्लांकेट
च्या बाहेर
२ ऐवजी ४ पाय दिसत आहे..ती जाम भडकली तिथे
असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले
… … आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली असता तिथे बंड्या तिचीच वाट बघत पेपर वाचत बसला होता..
तो तिला प्रेमाने म्हणाला
“तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले “
तू त्यांना भेटलीस का..?

दारू व डॉक्टर

डॉक्टर(बेवड्या पेशंटला): तुमच्या आजाराचे नक्की कारण समजत नाहीये…
कदाचित दारू पिल्यामुळे असा होत असेल….
.
.
.
.
.
.
पेशंट: हरकत नाही….काय घाई नाय आपल्याला…तुमची उतरली कि येतो मी….

मेसेज

चिमणरावांचा सासरा त्यांना बेदम मारत होता…..

एक माणूस : अहो का मारताय त्यांना… …….?

.
.
.

… .

.
.
.
.

सासरेबुवा : अहो ह्याच्या बायकोने ह्याला मेसेज पाठवला कि,

“तुम्ही बाप बनला आहात.”

तर ह्याने तो मेसेज ह्याच्या सगळ्या मित्रांना तसाच Forward केला..

गाजर

एक ससा रोज लोहाराच्या दुकानावर
जायचा आणि विचारायचा…
.
.
गाजर आहे का…???
… लोहार रोज नाही म्हणायचा…
.
.
एके दिवशी त्याला राग आला आणि त्याने सश्याचे
दात तोडून टाकले…
.
.
आणि…
.
.
.
आणि काय…
दुसऱ्या दिवशी ससा लोहाराकडे
जातो आणि विचारतो गाजराचा जूस आहे
का …???

”मव्हाचे” झाड

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी
पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक ”मव्हाचे” झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ”दारू” बनवली.
.. आणि म्हणूनच.
ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नही, मीच मोठा मोठा आसे तो करतो.
सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.

जपुन ठेव

जपुन टाक पाऊल...
इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपुन ठेव विश्वास...
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो

जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो

जपुन ठेव आठवण...
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो

जपता जपता एक कर...
जपुन ठेव मन कारण...
ते फक्त आपलं असतं...