मनी माऊ मनी माऊ.....
मनी माऊ मनी माऊ येतेस का ग भूर?
नको रडू इतकी
आता येईल ना ग पूर
दिवसभर हिंडू
सगळीकड़े भटकू
आईला ही न सांगता
जाऊ आपण भूर
मनी माऊ मनी माऊ
आता येईल ना ग पूर
नको रडू इतकी
चल जाऊ आपण भूर
रागवत असते आई तुझ्यावर सारखी
त्तिला वाटतं तू आहेस अजुन ही बारकी
थांब......आज जाउच आपण भूर
आपली येऊ दे मग तिला आठवण
आठवणींची आपल्या मग करत बसू दे तिला साठवण
आठवत आठवत
बसेल मग रडत
रडत रडत म्हणेल मग
"कुठे गेला ग चिऊ-माऊ तुम्ही?
अस मला एकटीला सोडून?"
कपाटा मागुन बघू आपण हे सगळ
आणि मग हळूच जाऊ
आणि करू तिला "भू"...!!!!
मनी माऊ मनी माऊ
हस ना ग आता तरी
मनी माऊ मनी माऊ
आता येईल ना ग पूर
नको रडू इतकी
चल जाऊ आपण भूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा