चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.
बायको : आज मला कसंतरी होतय
नवरा : अग आजच्या दिवस  सहन कर
संक्रांतिचं गोड गोड बोलण्यामुळे होत असेल.

उद्यापासून वाटेल बरं
पप्पु - उद्या पासनं मी शालेत  जाणार नाई .।।

मम्मी - कावून ?

पप्पु - ती बाई स्वतः ले का समजुन राईली का
           माईत नाई  ??

मम्मी - काय झालं ??

पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिव्हल
          " महाभारत " .

आणि मले विचारले सांग म्हने महाभारत कोणी लिहिले ??

मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिव्हल .।।

तिने मले लई मारल...खरं बोलाचा जमानाच नाई रायला आता तर........ ।।
अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!

तर त्याचे झाले काय…

आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा!! "आमच्या इथे नवरा विकत मिळेल" अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...

पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... "इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे."
चिंगी खुश झाली.!!
पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…

दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: "येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!" चिंगी जाम खुश झाली. "च्यामारी लैइ भारी" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?

आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!"
आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.

आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात."

"अहाहा कित्ती मस्त.!!" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!

पाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…
"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!
कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! "

=================

आणखी वाचा…

आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते "आमच्या येथे बायको विकत मिळेल"!!
सेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!

चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : "येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!"

चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून  घेऊन येतो!!
=================
जाता जाता...

आत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!! !