स्त्री

प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते

बैलगाडी

एकदा एका सरदारजीचा इंटरव्हू होता. इंटरव्हू घेणाऱ्याने सरदारजीला प्रश्न विचारला

इंटरव्हूअर - सरदारजी हे फोर्ड काय आहे?

सरदारजी - फोर्ड ही गाडी आहे.

इंटरव्हूअर - बरं सरदारजी हे ऑक्सफोर्ड काय आहे?

सरदारजी - ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. म्हणजे ऑक्सफोर्डचा अर्थ होतो बैलगाडी.

च्यायला परत हिचा फोन

च्यायला परत हिचा फोन
आणि पुन्हा तेच प्रश्न
कुठे आहेस? कसा आहेस?
काय करतोऽऽऽऽऽय?
झाली का कामं?
कप्पाळ माझं!
हिला समजत नाही का? मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजतो हिच्या प्रष्णांचा रिंगटोन.
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.
कुठे पळून नाही जाणार, सायंकाळी येइल ना घरी,
तेव्हा विचारनं जे विचारायचं ते.
सारं काही सांगेन.
झालंऽऽऽऽऽ, रडा-रडी सुरु
तू खुप बदललाय.
लग्नाअगोदर असा नव्हतास.
माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकणार कोण?
च्यायला परत हिचा फोन.
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, यू यू आणि काय काय,
SMS पाठवला, भावना पोचल्या, मग फोन चे काय काम?
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन.

च्यायला परत हिचा फोन.

अकबरचा मोबाइल नंबर

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५

.
.
.
.
.

बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

अलाण्याच्या ब्रशावरती

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा, वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटणघाटण
पिझ्झाहटचा पिझ्झा खा मेपलज्यूस ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अ ब क ड ई फ ग ... तयार घरे सात टाईप्स
रेडिमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स
होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रुचि एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश! गजब तऱ्हा! व्यक्तिवरती सक्तीनाही
सहस्रशीर्ष पुरुषा!! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!


कवी - वसंत बापट

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...


कवी - वसंत बापट

विजयाचे रहस्य

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.