आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे


कवी     - अनिल
संगीत  - पं. कुमार गंधर्व
स्वर     - पं. कुमार गंधर्व
राग      - भीमपलास

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय 
 उभ्या पीकातलं ढोर 
 किती हाकला हाकला 
 फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट 
 त्याले ठायी ठायी वाटा 
 जशा वार्यानं चालल्या 
 पानावर्हल्यारे लाटा 

 मन लहरी लहरी 
 त्याले हाती धरे कोन? 
 उंडारलं उंडारलं 
 जसं वारा वाहादन 

 मन जह्यरी जह्यरी 
 याचं न्यारं रे तंतर 
 आरे, इचू, साप बरा 
 त्याले उतारे मंतर! 

 मन पाखरू पाखरू 
 त्याची काय सांगू मात? 
 आता व्हतं भुईवर 
 गेलं गेलं आभायात 

 मन चप्पय चप्पय 
त्याले नही जरा धीर 
तठे व्हयीसनी ईज 
 आलं आलं धर्तीवर 

 मन एवढं एवढं 
 जसा खाकसचा दाना 
 मन केवढं केवढं? 
आभायात बी मायेना देवा, 

कसं देलं मन आसं नही दुनियात! 
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत! 
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं 
 कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!

देश विदेश

चंप्या : अबे झंप्या मला सांग या जगात किती देश आहेत..?

झंप्या : (क्षणाचाही विलंब न करता) अबे चंप्या या जगात एकच देश आहे आणि तो म्हणजे आपला "भारत"
बाकीचे तर विदेश आहेत.

बहुमत

एक नेता आपल्या मुलाचा दहावीचा निकाल लागल्यावर त्याला घेऊन शाळेत गेला.

निकाल हातात येताच त्याचा मुलगा नापास झाल्याचे त्याला कळले.
तरीपण तो मिठाईच्या दुकानात गेला, पेढे आणले आणि सर्व शिक्षकांना पेढे वाटले.

मुख्याध्यापक : अहो, तुमचा मुलगा तर नापास झालाय ना? मग पेढे कसले वाटता?

पुढारी : हो. पण वर्गातील ६० मुलांपैकी ५० मुले नापास झाली म्हणजे बहुमत तर माझ्या मुलाच्या बाजूने आहे ना.

बाप

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी…

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो…

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो…

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो…

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो…
एका कोंबडीचे कावळ्या बरोबर प्रेम जमते

हि गोष्ट एका कोंबड्याला कळते

आणि तो कोंबडी जवळ येवून विचारतो ,
... ...
काय कमी आहे माझ्यात , मी ताकतवान

... ... आहे ,कावळ्या पेक्षा सुंदर आहे,

आणि महत्वाचे म्हणजे तुझ्या बिरादरीत ला आहे

कोंबडी : होय रे मी तुझ्या भावनांचा आदर

करते .......पण तो

Air-Force मध्ये आहे .
एका कार्यालयातील बॉस आपल्या हाताखालच्या कर्मचार्‍यांना प्रचंड छळत असे. त्यामुळे कर्मचारीवर्ग फार कंटाळला होता.

एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला. तो शिष्टाचार म्हणून बॉसचा निरोप घ्यायला गेला.

बॉस : मी मेल्याची बातमी जर तुला कळली, तर तू माझ्या प्रेतावर नक्कीच थुंकशील.

कर्मचारी : माझ्याकडे रांगेत उभे राहायला वेळ नाहीये.