पदन्यास लावण्यप्रान्ती ही करिते रमणी;
तारामंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी !
शुभ्र कृष्ण वर्णातिल सारी मोहकता आली
नेत्री, गात्री, एके पात्री, ह्रदयंगम मेळी.
सम्मीलित ती कान्ति दिसे अति शान्त सरस नयना,
शशिकरंजित रजनीसम, जी प्रखर दिना ये ना.
उषा किरण, की अधिक झाक, जर या रूपी पडती
अनिर्वाच्य ती संगमशोभा अर्धी तरि जाती !
कृष्णकेशपाशावरी येती श्याम श्याम लहरी,
शुभ्र तेज मुखसरसिरुहावरि सुरुचिर लास्य करी.
मृदुमंगल मधुभाव आननी जे मुद्रित होती-
किती शुद्ध, किती रुचिर, उगम निज ते प्रस्फुट करिती
मृदुल कपोली हास्य मनोहर जे क्रीडा करिते,
भास्वत् भाली शान्त तेज जे संतत लखलखते.
मूकचि त्यांच्या वक्तृत्वाने हिजविषयी पटते
साक्ष मनोमय पवित्र चारित्र्याची ह्रदयाते.
निर्वैर भूतमात्राच्या ठायी हिची चित्तवृत्ति
निर्व्याज प्रेमलभावाची ही रमणी मूर्ति.
कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ