अस्ताव्यस्त इतस्तता पसरली हाडे, युगे लोअली,
होते कोण कसे न आठवण ही कोणा जरा राहिली;
गोळा होउनि ती पुनश्च उठती, शून्ये बसू लागती,
होते कोण, किती असे जगऋणी, प्रत्यक्ष ते सांगती.
हे फुंकीसरसे घडोनि आमुच्या एकाच ये अद्भुत,
सामर्थ्ये पुरवीत आजवरती आलो जगा शाश्वत;
अंगा फासुनि राख खंक बनलो आम्ही फिरस्ते जरी,
आज्ञा केवळ एकटीच अमुची राणीव विश्वी करी.
श्रीरामात पहा प्रताप अमुचा, ऐश्वर्य कृष्णी पहा,
रुद्री उग्र कठोरता, सदयता बुद्धात साक्षात पहा;
ते आम्हीच महंमदास दिधली खैरात पैगंबरी,
ते कारुण्यहि आमुचेच उठवी जे ख्रिस्त मेल्यावरी.
भावी सत्कवि, ते चिकित्सक पटु, प्रख्यात अध्यापक
मंत्री नाविक वीर दार्शनिक ते व्युत्पन्न वैज्ञानिक;
आहे ह्या घडवीत आज अमुची चिच्छक्ति या भारती
मत्तां मर्दुनि द्यावया अभयता संत्रस्त भूताप्रति.
हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका, या कसे,
रोखायास तुम्हांस शक्ति मग या जंजाल काला नसे !
होते सृष्टि नवी, कलेवर जुने टाका, तुम्ही व्हा तसे,
हे ना होय तरी मरा ! न तुमची कोणास पर्वा असे !
कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका,या कसे,रोखायास तुम्हास शक्ती मग या जंजाल काला नसे !
उत्तर द्याहटवा