काही शाहीर एकदा उतरले साहित्यरनाकरी
काढाया तळिंची वरी उपसुनी अज्ञात वाक्संपदा;
आले उत्सुक होउनी रसिकही सारे किनार्यावरी,
ऐशी वाङ्मयपर्वणी उगवते जन्मांतुनी एकदा !
रत्ने आतुनि फेकुनी दिलि कुणी, कोणी समुक्तावली,
कोणी रंगित पोवळी; कुणि तशा धातु सुरम्याकृती.
दैवे लाभत 'वैजयंति' हि कुणा, कोणा परी शिंपली,
टाळ्या-हर्षनिनाद थोर घुमुनी सर्वत्र राहे तटी?
तो गर्दीतुनि दंड ठोकित पुढे आला कुणी शाहिर,
बोले गर्जुनि 'पोरखेळ कसले हे बैसला पाहत?
माझे थक्कच व्हाल पाहुनि तुम्ही चातुर्य लोकोत्तर!
ऐसे बोलुनि घेइ सागरि उडी तो देखता देखत !
संमदी उठला गभीर ध्वनि तो निःस्तब्ध झाले पुन्हा,
डोळे फाडुनि त्याकडे टकमका जो तो बघू लागला;
झाला वेळ बरच; वीर तरिही बाहेर का येइना?
येती तर्ककुतर्क! धीर अगदी कोणा नसे राहिला !
कोणा आणिल वाटले फिरुनि हा चौदाहि रत्ने वरी,
किंवा ओढुनि आणणार वरती वाग्देवता शारदा !
वाटे सागर कोरडा करिल हा कोणा अगस्तीपरी,
'गेला कायमचा तळी!' भय असे वाटे कुणा एकदा!
आले बुद्धुद तो तरंग उठले, डोकेहि आले वरी,
झाले लोक अधीर! प्राण बसले डोळ्यांमधे येउनी!
तेजस्वी मुखचंद्रमा मग हळू ये पूर्ण पृष्ठावरी
फाके काहितरी अपूर्व भवती कांती मनोमोहिनी!
आनंदातिशये पटापट उड्या मारून तो ओरडे,
'या रे या, मज नाचवा रसिक हो, डोक्यावरी घेउनी!
फुंका दुंदुभि वाजवा चहुंकडे मत्कीर्तिचे चौघडे,
की पृथ्वीवर आज ये मजमुळे सत्काव्यसंजीवनी!'
ऐसे बोलूनि हात तो वर करी सर्वांपुढे जो कुठे,
आले तेहतिस कोटि देव गगनी ते पाहण्या अद्भुत,
संपे संशयकाल, मूठ उघडे, भांडार सारे फुटे !
हाती एक दिसे 'सुनीत' तुटके!!! झाली मती कुंठित!
हास्याचा उठला तदा खदखदा कल्लोळ विश्वातुनी,
आकाशी सुर लागले गडबडा हासून लोळावया!
मेलेले मुडदेहि ताठ उठले तात्काळ गर्तेतुनी,
दातांच्या कवट्या 'सुनीत' वदुनी हासावया लागल्या !
कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें