1000 X 1000

श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

‘कारण त्याला 1000 X  1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला  बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’

मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा  का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!...........
हल्ली झाडांवरील आंबेही स्वतःच खाली पडू लागले आहेत...

कारण त्या आंब्यांनाही माहित आहे...

भर उन्हात ते चोरून तोडणारं...
बरोबर नेम धरून दगड मारणारं...
तेच ते जिद्दीला पेटणार बालपण...

आता

मोबाईल फोन मध्ये हरवलंय...

भयानक दरोडा

हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.

‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा.

लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’

दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.

याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’
( Mind Changing Concept ) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची
किमया.

त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला,

‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’

याला म्हणतात व्यावसायिक रहाणे
( Being professional ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.

दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले.
त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो एम.बी.ए. होता 
 तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील.
जरा धीर धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’

याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’
   ( Experience ) असे म्हणतात.

हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.

दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’

सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’

याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’
( Swim with the tide ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.

सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर काय मजा येईल!’

याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’
( Changing priority).

कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.

दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला.

पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.

कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?

खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.

 तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले.

पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80
लाख डॉलर्स लाटले.

खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’

याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच ‘नॉलेज’
( Knowledge) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते.

तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.     
संशयाची हद्द झाली राव.....
.
.
.
नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... .
.
.
.
यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!! 😜😜😜😜😜😜

डॉक्टरसुद्धा अत्रंगी पोहोचलेला (पुण्याचा).....

म्हणाला.... "तीलाच तर बायपास केली आहे आता !!"
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी
.
गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात.
.
दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
.
वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का ?
.
”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना..
.
ओळखते कि...
.
तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस,
.
पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..
.
थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘
.
खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिकल्या..
.
सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं,
.
गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..
.
माहितीये मला सगळं..”
.
वकील सुन्न…. काय बोलणार..??
.
चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू...
.
असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले,
.
"ताई तू यांना पण ओळखत असशील?"
.
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “
.
अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ?
.
बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता,
.
कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ?
.
आन चार वर्षाचं कालेज सातवर्ष करीत होता...
.
म्हणले, लई नाद याला पोरींचा,
.
तुह्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..?
.
”सगळ्या कोर्टात हशा माजला…
.
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
.
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले..
.
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले...
.
कि,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ?
.
तर मी दोघांना बुटानं मारीन...
1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४

1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४

1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४

1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४

'चार'ची गाथा… 
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !

' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.

' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !

यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !

चारचे सामर्थ्य  देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.

' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते.  यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील  ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते ! 

' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

वर्ण देखील ' चार ' आहेत.  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !

जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.

' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही ! 

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!
पेशंट -   डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर -    वयानुसार असं होणारच

पेशंट -    पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे

स्थळ- अर्थात पुणे.