मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले.
त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते
आणि
ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते .
तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर
उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते
आणि
शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.
दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते.
असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते
तेंव्हा
इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्यात जाऊन बसते.
यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते.
कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.
अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही.
तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.
मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले
आणि
दुसरे एक नवीन माकड आत टाकले.
या नवीन माकडाने केळी 🍌 नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.
दुसर्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात.
हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.
पण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते.
आता मारणाऱ्याला माहीत नाही
आपण का मारत आहोत?
आणि
मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत?
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात.
आणि
रोज तोच प्रकार घडतो.
नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की,
उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.
मारणार्या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी
त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.
अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात.
प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो .
आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो.
पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.
कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,
आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत !!!
बोध:-
माणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो.
पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते.
कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो.
त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुकरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.
म्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये.
फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा...!!!!!
सर्व सुशिक्षित ज्ञानी लोकांना समर्पित