काल कटिंग सलूनच्या  दुकानावर एक पाटी वाचली.. ..


"आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू "..🤣


इलेक्ट्रिकच्या  दुकान वाल्याने फलकावर लिहिलं होतं.....


"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣


चहाच्या टपरीवर असा फलक होता...


"मी  साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो."

🤣


एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..


"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या" 😀


इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..


"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..

😂


पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..


"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा" ..🤣


फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली. ..


"तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ ".. 🤣


घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..?


"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."

🤣


ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं.....😅


"या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."

🤣

 परवा एक बातमी वाचली : 

*एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही खात्यांची माहिती दुसऱ्यांना दिली*


या बाबतीत मी अगदी निश्चिंत आहे. कारण माझे अकाउंट एस बी आय मध्ये आहे. 


ते पन्नास चकरा मारल्याशिवाय  माझ्या अकाउंट ची माहिती मलाच देत नाहीत तर दुसऱ्याला काय देतील.


😂😂😂😂

नवरा

नवरा  म्हणजे समुद्राचा 

भरभक्कम काठ 

संसारात उभा राहतो

पाय रोवून ताठ      


कितीही येवो प्रपंच्यात

दुःखाच्या लाटा

तो मात्र शोधीत राहतो

सुखाच्या वाटा       


सर्वांच्या कल्याणा करता

पोटतिडकीने बोलत राहतो

न पेलणारं ओझं सुद्धा 

डोक्यावर घेऊन चालत राहतो  


कधी कधी बायकोलाही

त्याचं दुःख कळत नसतं

आतल्या आत त्याचं मन 

मशाली सारखं जळत असतं  


नवरा आपल्या दुःखाचं 

कधीच प्रदर्शन मांडत नाही 

खूप काही बोलावसं वाटतं

पण कुणाला सांगत नाही   


बायकोचं मन हळवं आहे

याची नवऱ्याला जाणीव असते 

दुःख समजून न घेण्याची 

अनेक बायकात उणीव असते  


सारं काही कळत असून

नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 

वेदनांना काळजात दाबून

पुन्हा कष्ट उपसावे लागतात    


सगळ्यांच्या आवडी जपता जपता 

मन मारीत जगत असतो 

बायको , पोरं खूष होताच

तो सुखी होत असतो  


इकडे आड तिकडे विहीर 

तशीच बायको आणि आई 

वाट्टेल तसा त्रास देतात 

कुणालाच माया येत नाही 


त्याने थोडी हौसमौज केली तर

धुसफूस धुसफूस करू नका

नवऱ्या विरुद्ध विनाकारण

दारू गोळा भरू नका  


दोस्ता जवळ आपलं मन

त्यालाही मोकळं करावं वाटतं

हातात हात घेऊन कधी

जोर जोरात रडावं वाटतं 


समजू नका नवरा म्हणजे

नर्मदेचा गोटा आहे

पुरुषाला काळीज नसतं

हा सिद्धांत खोटा आहे  


मी म्हणून टिकले इथं

दुसरी पळून गेली असती

बायकोनं विनाकारण

नवऱ्याला धमकी दिलेली असती 


घरात तुमचं लक्षच नाही

हा एक उगीच आरोप असतो

बाहेर डरकाळ्या फोडणारा

घरी म्यांव म्यांव करीत बसतो 


सारख्या सारख्या किरकिरीनं

त्याचं डोकं बधिर होतं

तडका फडकी बाहेर जाण्यास

खूप खूप अधीर होतं  


घरी जायचं असं म्हणताच

त्याच्या पोटात गोळा येतो

घरात जाऊन बसल्या बसल्या

तोंडात आपोआप बोळा येतो 


नवरा म्हणा , वडील म्हणा

कधी कुणाला कळतात का ?

त्यांच्या साठी कधी तरी 

कुणाची आसवं गळतात का ?  


पेला भर पाणी सुद्धा

चटकन कुणी देत नाही 

कितीही पाय दुखले तरी 

मनावर कुणी घेत नाही  


वेदनांना कुशीत घेऊन 

ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 

सर्वांच्या सुखासाठी 

एकतारी भजन गातो  


बायको आणि मुलांनी 

या संताला समजून घ्यावं

फार काही नकोय त्याला 

दोन थेंब सुख द्यावं    


मग बघा लढण्यासाठी

त्याला किती बळ येतं

नवऱ्याचं मोठेपण हे 

किती जणांच्या लक्षात येतं ? 

चुलीवरची स्कॉच

 चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा,

चुलीवरची कोंबडी, चुलीवरचीभाकरी,चुलीवरचं अमुक, चुलीवरचं तमुक वगैरे वगैरे, बरीच क्रेझ आहे हल्ली चुलीवरच्या पदार्थांची... 

असंच पुण्यात एक बोर्ड वाचला.. 

*"चुलीवरची स्कॉच मिळेल"*

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

हौसेने मित्रांसह आत गेलो तर हरामखोर *हातभट्टीची* विकत होता...🥴


😂😂😛😛😂😂

 डॉक्टर मनकवडे: अहो, तुमचा मुलगा माती खातो यात गंभीरपणे विचार करण्यासारखं आणि माझ्यासारख्या मानोचिकित्सकाकडून उपचार करून घेण्यासारखं काहीही नाही. अगदी सर्वसाधारण मुलांसारखा आहे तो असं मला वाटतं.

बाबुराव: पण डॉक्टर, हे नॉर्मल नाही असं मला तरी वाटतं आणि त्याच्या बायकोचंही तेच मत आहे

कविता

 विदर्भ गीत – डा. निलेश हेडा


आलापल्ली एटापल्ली

नाही जंगलाची वाण

शेती पिकवते मोती

आहे समृद्धीची खाण.


काट्याकुट्यातुन वाहे

मायी काटेपुर्णा माय

वरदेच्या या पाण्याला

आहे अमृताची साय.


मेळघाटातुन वाहे

नवी नवरी सीपना

इथे मोरणेच्या काठी

पावा वाजवी किसना.


विपुल दर्भाच्या प्रदेशा

तूच “कठाणीला” पोसं

दुध दुभत्याची गंगा

कोणी राहु नये ओसं.


तुकड्याच्या प्रार्थनेत

वसे गावातली गिता

गाडगेबाबाची कहाणी

सांगे गावो गावी विठा.


ग्रेस, भट, उ.रा. गिरी

ना.घ., वाघ वाचे गाथा

शब्द खेळती अंगणी

इथे टेकवावा माथा.


आमचा “मुसळे” वाहतो

नव्या कथेची “पखाल”

कंचनीच्या महालात 

ना. घ. वसतो सताडं.


सातपुड्याच्या संगती

माहुराचा गड शोभे 

पाड्यापाड्यातुन येथे

कोरकुचा डफ वाजे.   


बाबासाहेबाने दिला 

इथे मानुसकीचा धर्म

दिक्षाभुमीच्या तिर्थाने

शिकवले आम्हा कर्म.


गोंड राजांचे मावळे

आम्ही सुराज्य उभारु

अन विदर्भाचा झेंडा

अटकेच्या पार रोऊ.


निलेश हेडा


नोट

कठाणी – गायीचं एक वाण

ना. घ. – सुप्रसिद्ध कवि ना.घ. देशपांडे

मुसळे – सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे

पखाल - बाबाराव मुसळेंची एक कादंबरी

 *नागरीक मी भारत देशाचा*

*हातात सगळं आयतं पाहिजे !* 


वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे !

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे !


तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे !

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !


कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !


धर्माच्या नावाने भले काहीही करीन

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे ! 

मतदान करताना जात पाहीन

म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !


कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात पाहिजे !

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे !