आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनी त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी निखळ चर्चा, आणि कधीतरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .

रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?

संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे.

हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

भष्टाचाराचे घड्याळ

एकदा राबडीदेवी ( लालू यादवची पत्नी ) स्वर्गात गेली. तिथे तिला अनेक घड्याळे दिसली. तिने कुतूहलाने यमाला विचारलं, "ही एवढी घड्याळं इथे का लावली आहेत?"

यम म्हणाला, "त्याचं काय आहे, हे प्रत्येक घड्याळ पृथ्वीवरील एकेका माणसासाठी आहे. जेव्हा पृथ्वीवर एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्याचं घड्याळ एका मिनिटाने पुढे जातं"

राबडीने विचारलं, "मग यातलं लालूंचं घड्याळ कोणतं?"

यम म्हणाला, "ते घड्याळ इथे नाही. ते वर आमच्या ऑफिसमध्ये आहे." राबडीचा ऊर अभिमानाने भरून आला. तिने विचारलं, "का?"

यम म्हणाला, "त्याचा आम्ही पंखा म्हणून वापर करतो !!!!!"

प्रेमपत्र !!

प्रिय झंप्या,
          जेव्हा पासून तुझ्याशी नाते तोडले आहे....
तेव्हापासून एक दिवसही सुखाने गेला नाही,
रात्रभर तळमळत असते, 
माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे, 
तू खरच चांगला मित्र आहे,
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे,
अणि हो जाता जाता,
तुला १ कोटीची लॉटरी लागल्याबद्दल अभिनन्दन.

पालक सभा

झंप्या : बाबा उद्या शाळेत छोटीशी पालक सभा आहे.
बाबा : छोटीशी म्हणजे कशी ?
.
.
....
.
.
.
.
.
.
.
झंप्या : म्हणजे फक्त "मी, प्रिन्सिपल आणि तुम्ही....!

मराठी मुली


*मुलीच्या गालावर गुलाबाचे फुल मारल्यावर ,,,,,,*
*इंग्लिश मुलगी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, डार्लिंग u r so noughty *
**
**
*उर्दू मुलगी ................................नही करो जानू*
... **
**
*सिख मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,तुस्सी बडे रोम्यांटिक हो *
**
**
*मराठी मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,डोळ्यात गेला असता ना *
**
**
**
*किती प्रेम करतात मराठी मुली,,,,,,,,,

संताची लॉटरी

एकदा सन्ता देवकडे जातो आणि बोलतो......
देवा मला लॉटरी लागून दे तुज़े खूप उपकार होतील.
पण त्याला लॉटरी लागत नाही.

परत देवकडे जातो आणि म्हणतो देवा ह्यवेळी तरी लागू दे ......नाहीतर माझा बिझनेस बुडेल......
पण त्याला लॉटरी लागत नाही...........

परत तिस~या वेळी पण तेच होत...........
मग तो देवकडे जाऊन रागाने विचारतो की मी येवढ सांगून सुधा तू मझ का ऐकल नाहीस?

तर देव म्हणतो........... अरे बाबा आधी तिकीट तर काढ.........

मरणाची जागा

चिंटू: बंटू, किती छान हॊईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते.

बंटू : तुला असे का वाटते ?

चिंटू: मला जर असे कळले तर मी त्या जागी कधिच जाणार नाही.   

माँडर्न धमकी :-

माँडर्न धमकी :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊनये नाही तर,

तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन तुला आणि तुझ्या आई- बाबांना पण Tag करेल....!

फक्त पाच मिनिटे अजून...!!!

जगातील सर्व शास्त्रज्ञांनी खूप वर्षांच्या गहन संशोधनानंतर एक महत्वपूर्ण शोध लावला आहे...!!
सर्वसामान्य माणसाला किती तास झोप आवश्यक आहे....???
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अलार्म वाजल्यावर तो बंद करून फक्त पाच मिनिटे अजून...!!!

तपासणी

एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्‍याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.

शेतकर्‍याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.

मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.


शेतकर्‍याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्‍याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.

थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.

त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात

दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात

तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..

 

आश्चर्यच आहे एकही अक्षर
नाही माझ्या वहीवर
कुठे गेले ते शब्द सगळे
जे मी लिहिले होते वहीवर
 हे कुठले काळे ढग
आले माझ्या समोर
छोटी छोटी निरपराध मुले
झोपळी आहेत रस्त्यावर
चुक नसूनही अपघातात
एक निशप्राणझालेआहे कलेवर
असह्य आजाराने त्रस्त असे
कितीतरी आहेत सभोवार
एक वेळच्या अन्नासाठी
विकण्याची पाळी आली एका युवतीवर
सांगा ना हे लिहिताना
यातना होत नसतील; माझ्या शब्दाना
का राहतील मग ते  माझ्या  वहीवर
बघून सगळे येई त्यानाही  अन्धारुन

कविता बोडस
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

Taken From मनोगत

उगाचच...

शतानंद.
एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

अण्णाना काय काम आहे 
धंध्याने तर ते समाज सेवक 
आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

पगार वाढ डोक्यावर टांगली आहे 
टार्गेट्स पूर्ण करायला आमची डोकी बांधली आहेत 
 आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

 घरचे हफ्ते ३ वर्षात उडवायचे आहेत 
चार चाकी घेऊन दारात मिरवायाचे आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सोन्याचे भाव गगनाला पोचले आहेत 
सध्या रेशनाचे भाव बघून डोके उठले आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सगळेच गांधी झालेत तर मग गांधीना महत्व कसे येणार 
 अण्णान सोबत धावलो तर आमची पुढची पिढी श्रीमंत कशी होणार???
 माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी भिकारड आयुष्य जगताय

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे


कवी - ग्रेस

लाव मंदिरी दिवा

या हाताने स्तन गोंदून घे
लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे
गळून पडे काजवा

तू मरणावर मग रेखावे
प्राक्तनगंधी मोती
की डोहावर किणकिणते गे
शतजन्मांची भीती

असुनी तुझा मी तुझी दूरता
तुला झाकितो काल
संग उर्मिले कुणी बांधले
नयनी चंद्रमहाल

रंग उगा की उभा उदासिन
महामेघ क्षितिजात
पायाखाली वाळवंट मग
उगवत ये निमिषात
लाव मंदिरी दिवा..

लाव मंदिरी दिवा परंतु
सोड स्तनांची माया
मरणावाचून आज सजविली
मीच आपुली काया!


कवी - ग्रेस

माझे मन, तुझे मन !

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास !

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी !

तुझी माझी पटे खुण
तुझी  माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन, तुझे मन !
स्वप्नी गाढ निमग्न भोज असता, ये जागृती त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्ज्वळा

जैशी कुंदलता फुलुन खुलते, ते स्थान शोभे तसे
योगी तेथ कुणी लिहीत बसला, भोजास तेव्हा दिसे

सोन्याच्या नवपुस्तकात लिहिता, योगींद्र हे कायसे?
राजा धीर धरून नम्रवचने त्याला विचारी असे

ज्यांचा भाव अखंड ईशचरणी नावे तयांची मुला
प्रेमे सद्वचने प्रसन्नवदने, योगी अशी बोलला

आहे ना मम नाव संतपुरुषा, मालेत त्या गोविले
प्रश्ना उत्त्तर त्या प्रशांत मुनीने राया नकारी दिले

माझे नाव नसो तयांत नसले, जे प्राणिमात्रांवरी
सुप्रेमा करिती तयांतची मला, द्या स्थान कोठेतरी

भोजाचे पुरवून ईप्सित मुनी तो होय अंतर्हित
रात्री तो दुसऱ्या दिनी प्रकटला, भोजा करी जागृत

यादी त्याजवळी कृपा प्रभुवरे केली तयांची असे
तीमध्ये पहिले स्वनाम नवले त्या रेखिलेले दिसे


वृत्त :- शार्दूलविक्रीडित

त्रिधा राधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा


कवी :- पु. शि. रेगे

श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन

स्वच्छ निळे, रिकामे अंबर,
नारद तुंबर, अभ्र विरे

कधी केले होते, गंधर्वांनी खळे,
स्वत:शीच खेळे, चंद्रबिंब

पांगले अवघे, वैष्णवांचे भार,
ओसरला ज्वर, मृदुंगाचा

मंदावली वीणा, विसावले टाळ,
परतुनि गोपाळ, घरी गेले


कवी - अरूण कोलटकर

तू ये

मी निशेने ग्रस्त होता
तू उषा होऊन ये
कोरशी प्राजक्त वेणी
कुंतली खोवून ये

संशयाच्या वायसांनी
टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या
चंदनी नाहून ये


कवी :- बा. भ. बोरकर

दोन कर्मकठीण गोष्टी

दोन कर्मकठीण गोष्टी आहेत ….
१. दुस-याच्या डोक्यात आपले विचार भरणे
२. दुस-याच्या पैशाने आपला खिसा भरणे
ज्याला पहिली गोष्ट जमते तो उत्तम शिक्षक ठरतो
आणि दुसरे काम करू शकणारा व्यवसायात प्रगती करतो.
.
जिला दोन्ही गोष्टी चांगल्या येतात ती असते …..
बायको
.
आणि ज्याला यातले काहीच जमत नाही तो ….
बिच्चारा नवरा. 

कविता

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"


कवी - कुसुमाग्रज

वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण


कवी - अरुण कोलटकर

जीवनाचा प्रवास

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलं कोमेजतात....

पायंजणा

त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा

मौन पडले सगल्या रानां
शिरशिरून थांबलिं पानां
कंवळी जाग आयली तणा झेमता झेमतना

पैसुल्यान वाजलि घांट
दाटलो न्हयेचो कंठकांठ
सांवळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा

फुललो वैर चंद्र ज्योती
रंध्रांनी लागल्यो वाती
नवलांची जावंक लागलीं शकून लक्षणा

गळ्यान सुखां, दोळ्यान दुकां
लकलकली जावन थिकां
नकळटना एक जालीं आमी दोगाय जाणा

वडफळांच्या अक्षतांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगले जिणेक आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजली पांयजणा

कानसुलांनी भोंवता भोंवर
आन्गार दाट फुलंति चंवर
पडटी केन्ना सपनां तींच घडटी जागरणा


गीत : बाकिबाब बोरकार (बा. भ. बोरकर)
संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
स्वर : अजीत कडकडे