विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी
पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान
झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी
कवी - ना. धों. महानोर
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी
पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान
झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी
कवी - ना. धों. महानोर
हे गाणं mp3 मधे उपलब्ध असेल तर कृपया शेयर करा
उत्तर द्याहटवागाणं नाही हे , कविता आहे.
हटवा