आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं.

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी
असते समोर, भिडते नजर थेट,

मैत्रीचा प्रवास असाकाही सुरु
होतो
तिच्यातच स्वप्नं सुंदरी
शोधण्याचा कार्यक्रम चालू
होतो...

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते
आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा
असतो वेगळाच गेम...

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत...

माय

मायसंगं मीबी तवा,
काडक्या येचाया जायचो.....
माय लाकडांकडं आन,
मी धसपाटं घ्यायचो......

माय माझी हुती गोरी,
उन्हात त्वांड जळालेली....
गरीबीच्या लांड्ग्यामागं,
दमस्तवर पळालेली.....

फ़ाट्क्या तिच्या पदराशी,
लेमण गोळीचा तुकडा....
भुक तिची जाळायसाठी,
संगं र्‍हायचा मिश्रीचा पुडा....

माजी साळा बुडाया नगं,
म्हणून रोज लई राबायची......
कंधी दमलो शाळंत जर,
पोट्र्‍या माह्या दाबायची.....

म्या मेट्रिक केली तवा,
मायचं कातडं लोंबलं...
पण तिचं गोधडी घेणं,
माया काळजाला झोंबलं....

शर्ट-चड्डी घालेल पोर्‍या,
तिनं नीट पाह्यला न्हाई......
पण शिकवुन माला लय,
जायाची व्हती तिला घाई....

दाराम्होरं आजबी ढीग,
वाळेल काडक्यांचा हाय.....
पण चुलीजवळ शेकणारी,
गेली सोडुन लाडकी माय....


कवी - संतोष वाटपाडे(नाशिक)

हवामान खाते

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

लांबी ...ऊंची ....

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

हुशार कुत्रा

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.



त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.



"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.



सांता," नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."

बघुन चाला हं.....

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

गळती

रामरावांकडचा नळ अचानक गळायला लागला. त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे रामराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे. तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", रामराव.
बळवंतरावांनी गावाबाहेर जमीन घेऊन एक छान बंगला बांधला व तिथे रहायला गेले. एकदा रात्री बंगल्याच्या आवारात आवाज आल्याने ते उठले व बाहेर बघितल तर काही लोक त्यांच्या आवारात असलेल्या वस्तु नेताना दिसले.
बळवंतरावांनी तडक पोलीस स्टेशनला फोन लावला," अहो, माझ्या आवारात चोर शिरलेत आणि ते माझ्या मालकिच्या वस्तु नेताहेत जरा लौकर याल का. "

पलिकडून : "शक्य नाही, इथे कोणिही नाही. आल्यावर लगेच पाठवतो."

बळवंतराव जरा थांबले व परत पोलीस स्टेशनला फोन लावला. मी थोड्यावेळा पुर्वी फोन केला होता माझ्या आवारात चोर शिरलेत हे सांगायला. आपण नाही आलात तरि चालेल, मी माझ्या बंदूकिने त्या सर्वांना ठार केले."


थोड्यावेळातच पोलीस व्हॅन घेऊन आले.

पोलीस : तुम्ही तर म्हणाला होता तुम्ही सर्वांना ठार केले.

बळवंतराव : तुम्ही म्हणाला होता ना तिथे कुणी नाही.

खोकण्याचा सराव

गंपुनाना हॉस्पीटलच्या बेडवर पडले होते.

नर्स : नाना, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय, सुधारण दिसतेय तब्येतीत.

गंपुनाना : होना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.

बरोबरी


एकवेळ संगणक मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करेल पण मानवाच्या मुर्खपणाची बरोबरी करता येणार नाही !

करार कोवळा

एकदा दिलास तू गळ्यामध्ये गळा
लगेच काळजास लाख लागल्या कळा !

योजना तुझीच का नकारतेस तू ….
सहीविना तुझ्या कसा फुलायचा मळा ?

उगाच संशयासवे युती नको करू ..
तशीच तापतेस तू, वरून ह्या झळा !

गाल हे पुन्हा पुन्हा पुसू तरी नको..
तेवढीच भेट .. तो .. करार कोवळा !


कवी - ज्ञानेश वाकुडकर
नागपूर
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?

बाई -  नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची माळ होती..आणि ... तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!

शेजाऱ्याची बायको

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती
.


.
.
प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

अंगात मस्ती

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ..


का?



.. अंगात मस्ती, दुसरं काय?

सिंधी

२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी

३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!

४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी

५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी

६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी

७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी

८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा

९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी

१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी

११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा

१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी

१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी

१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी

१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी

१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी

१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी!!!!
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?''

त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. ''

कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''

'' आपले बाबा !!!! ''

वर्गाच हसण्यासारखे दुसरे काय?

शिक्षक :- तुम्हि सगळे जण का हसताय?

मुले :- काहि नाहि सर.....

शिक्षक :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना?

मुले :- नाहि सर.....

शिक्षक :- मग दुसरे वर्गात हसण्यासारखे काय आहे

शिंग

कायम शहरातच राहिलेल्या वत्सलाबाई एकदा एका नातेवाईकाकडे खेड्यात गेल्या.

त्यांनी मनोहरपंतांना विचारले," काहो, काही जनावरांना शिंग का नसतात ?"

मनोहरपंत,"त्याच काय आहे वत्सलाताई, कधि आम्ही या जनावरांचे शिंग कापुन काढतो तर कधि ते मोठे होऊ नये म्हणुन शिंगांच्या मुळाशी रसायन टाकून ते जाळून टाकतो."

"तर त्या जनावरांना त्रास होत असेल ना ?", वत्सलाबाई.

मनोहरपंत,"जास्त त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो."

"बर सांगा या गाईला शिंग का नाहित ?

मनोहरपंत," याला शिंग नाहित कारण हा घोडा आहे."

दोन मित्र

दोन मित्र कायम एकमेकावर कुरघोड्या करत आसायचें.

कालांतरांने एका मित्रांची परीस्थिति फ़ार बिघड्ली खायचे वांदे झाले.

पैसे कमी असल्याने तो एका अतिशय थर्ड रेट होटेल मधें जेवयला गेला.

अन समोर पहातो तो काय त्याचा मित्रच वेटर म्हणुन उभा होता.

"मित्रा तु,अन इतक्या थर्ड रेट होटेल मधें काम करतो, अन ते पण वेटरचे?.. अरेरे."

"हो पण मी इतक्या थर्ड रेट होटेल मधें जेवत नाही.." मित्र शांतपणे म्हणाला.

गणिताचा तास

एकदा गणिताच्या सरांनी बंड्याला प्रश्न केला, "बंड्या, सांग पाहू एका तारेवर पाच पक्षी बसले. मी एकाला दगड मारला तर किती उरतील?"

बंड्या म्हणाला, "एकही नाही."

सर दिमाखात म्हणाले, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्षा उत्तर सांगतोय. उत्तर आहे चार. पण जाउदे. पण मला तुझी विचार करायची पदधत आवडली."

ह्यावर बंड्याने गणिताच्या सरांना प्रश्न केला, "सर आता मी एक प्रश्न विचारतो. एका भाजी मंडईत तीन बायका आपल्या नवऱ्यांसहित भाज्या विकत घेतायत. एक तावातावाने भाजीवाल्याशी भांडतेय. दुसरी उदासपणे भाजी विकते घेतेय तर तिसरी लाजत अंग चोरत भय्याच्या दिलेल्या भाज्या पिशवित टाकताना ऒठ चावत नवऱ्याकडे बघत हसतेय. तर ह्या तिघींपैकी नवविवाहित कोण?"

सर थोडे ओशाळले पण उत्तरादाखल म्हणालेच, "जी लाजतेय ती."

बंड्या म्हणाला, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्ष उत्तर सांगतोय. उत्तर आहे जिच्या हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळ्सूत्र आणी हातात मेंदी आहे ती.

पण जाउद्या. मला तुमची विचार करायची पदधत आवडली."

तू-नसशील

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
“आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? “
हे सारे उद्याही तसेच असेल…….
ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल.
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील………तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.



- अनुराधा पोतदार
- सकाळ दिवाळी अंक २०००
गांधीजी एकदा चित्रगुप्ताला विचारतात, " माझी ३ माकडं कशी आहेत?? "

चित्रगुप्त - सगळी छान आहेत.
"आंधळा" कायदा बनला आहे.
"बहिरा" सरकार बनला आहे.
आणि
"मुका" तर सगळ्यात मजेत आहे.
आजकाल "पंतप्रधान" आहे.
एका विवाहित बायकांनी भरलेल्या बसचा अपघात होतो..
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो...
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते..
बंड्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.....
..
..
कारण
.
.
.
.
.
 त्याच्या बायकोची बस चुकली होती.
एकदा बॉस लवकर ऑफिसमध्ये येतो
आणि पाहतो की
त्याचा मॅनेजर सेक्रेटरीशी गुलुगुलु गप्पा मारत बसलाय…..
बॉसः (संतापाने) याच्यासाठी पगार देतो मी तुला ?
मॅनेजरः नाही सर ,
हे तर मी फुकटात करतो……
मास्तरीण गण्याला: “रिकाम्या जागा भरा,
.
९०० उंदिर खाऊन माँजर ________ चालली”
.
.
गण्या: “९०० उंदिर खाऊन माँजर हळुहळु चालली” .
.
मास्तरीण रागात:“ ऊभा रहा बेँचवर,
मजाक करतो का माझ्यासोबत ”
.
.
गण्या: “मॅडम हे तर मी तुमच मन राखण्याकरता लिहल
नायतर ९०० उंदिर खाऊन मांजर काय तिचा बाप पण चालु शकणार नाय“..
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.

मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.

तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि …… तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....
कंजूस मालक : जा २ होटल मधून ३-३ तंदूरी घेवुन ये.....
नोकर : साहेब ६ एकाच होटलमधून का नको....
.
.
.
.
.
कंजूस मालक : माकडा वेगले वेगले आणलेस तर चटनी आणि कांदा जास्त भेटेल..

थंड - गरम

एक भन्नाट जादू.....
एका ग्लास मध्ये थंड पाणी घ्या
...............
.....................
............................
...................................
..........................................
ते
आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर
ओता तो माणूस लगेच गरम होईल
नवरा टी व्ही वर …आय पी एल क्रिकेट बघत असतो …
बायको :- अहो , हा ब्रेट ली आहे का….?
नवरा (हसून) :- नाही ग , हा ख्रिस गेल आहे ...ब्रेट ली बॉलर आहे
बायको :- अरे वा …. दोन विकेट एका पाठोपाठ एक …. !!!
नवरा :- नाही ग …. पहिलीच रिप्ले दाखवत आहेत ….
बायको :- काय आळशी प्लेयर आहे हा…
नुसता बघतोय बॉल कडे ….
नवरा (कपाळावर आठ्या) :- अग तो प्लेयर नाही , अंपायर आहे…
बायको :- मग आज तरी जिंकतो का तुमचा इंडिया
नवरा (वैतागून) :- अगं दिल्ली मुंबई आहे सामना …
बायको :- एका बॉल पाठी दोघे दोघे पळताहेत वेडे कुठले …
नवरा चिडून टी व्ही … बंद करतो ….
बायको पुन्हा लाऊन रडक्या डेली सिरियल पाहत बसते …
नवरा :- अग ती रडणारी मुलगी कोण ग….
बायको :- हे बघा गप बसा , मला शांत पणाने पाहू द्या …
१ मुलगी : आज कालच्या मुलावर विश्वासच करायला नको ,
मी तर आता त्याच थोबड़ पण बघणार नाही.

२ मुलगी : का ग ? काय झाले? दुसऱ्या कुठल्या मुली सोबत फिरत होता काय तो ???

१ मुलगी :नाही ग तो नाही फिरत होता , मी फिरत होते अणि त्याने मला पाहिले ..

मला बोलला होता मी कामा साठी कोल्हापुर ला जातोय ३ - ४ दिवसानी येणार .…..आणि गेलाच नाही...
.
.
.
साला हलकट , धोकेबाज , नालायक, खोटारडा.
एकदा दिनू चिंगीच्या फोटोर कमेँट देता.
.
WoW काय तुझो तो सुंदर आणि गोरो चेहरो..
.
काय तुझा ता सुबक नाक आणि ते तुझे सुंदर ओठं..
.
आणि काय तुझी ही परफेक्ट फिगर..
.
घायाळच जातलो कोणय..
.
काय वापरतस तू....??
.
.
.
.
.
चिंगीचो रिप्लाय :- Adobe Photoshop.
नर्स  बंड्याला :
दीर्घ श्वास घे... !!
आता श्वास सोड..!
असा तीन येळा कर बघू ..,
.
बंड्या : बर
.
नर्स : "हा, आता कसा वाटता तुका ??
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या: "तुमचो बॉडी स्प्रे खराच एकदम भारी आसा ओ ..!!

खानदानी गुंडगीरी

बंड्या: ओ अण्णानु, जशे तुम्ही माका झोडतास,
तशे तुमचे बाबा पण तुमका झोडीत होते काय...????
.
.
.
अण्णा: "होय रे, येताच्या काठीन माका बरे झोडीत होते..!
.
.
.
बंड्या: " तर मग ही, खानदानी गुंडगीरी कधी परयत सुरु रवतली...??
वराडकरांच्या बंटीन गरमीच्या येळी सुट्टीये पडल्यार,हापुस आंब्याचा दुकान घातल्यान...!
...
शाळेतले तुळसकर मास्तर तेच्या दुकानार आंबे घेउक म्हणान येतत,

मास्तर: काय रे बंटी, आंबे कशे दिलस..???

बंटी:  ३०० चे १२  आंबे..
..
मास्तर: अरे, मी मास्तर तुझो, माझ्यासाठी काय तरी कमी कर मरे..!!!

बंटी: ठिक आसा..!
तुम्ही माझे मास्तर आसास म्हणान कमी करतय..!
चला, 200 चे 8 आंबे घेवा..!!