तो आणि ती दोघेही मनोरुग्ण…. एकाच इस्पीतळात ……
इस्पीतळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनचं
त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता…. सार्यांना त्याचे
अप्रूप वाटे…
सारा दिवस ते सोबतचं असायचे… एकमेकांशी कधीचं बोलत नसत…
निशब्द….. जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी….

असेचं रोज सारखे आजही ते इस्पीतळाच्या आवारात मूकपणे फिरत होते…
चालता चालता ते स्वीमींग पुल पाशी आले… काय झाले कुणास ठावूक…
त्याने तीचा हात झटकला आणि पळत जाउन पाण्यात उडी मारली…
ना बाहेर येण्यासाठी धडपड्ला….. ना तरंगण्यासाठी हात पाय मारले
त्या पाण्याच्या तळाशी जावून स्थिरावला …. आत्महत्या करत असावा तो बहुतेक…

हे पाहून क्षणातच ती ने सुध्दा पाण्यात उडी मारली….
त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली…
त्याचा जीव वाचवला…
दूसर्या दिवशी डॉक्टर आले…हे सगळे पाहून…ऐकून….
त्यांनी तीला त्वरीत हॉस्पीटल मधून सुटी देण्याचे फर्मावले….
कारण आता ती बरी झाली होती…. तीचे मन स्थीर झाले होते
ती विचार करु शकत होती…
डॉक्टरांनी तीला बोलावले आणि म्हणाल

” तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे”

तीच्या चेहर्यावर तसेचं शांत भाव होते… डोक्टर पुढे म्हणाल

” चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे
कारण
काल तु जे केले त्यावरुन तु आता जबाबदार झाली आहे आणि
तु आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकते.
तुझी कालची कृती वेड्या माणसाची असूच शकत नाही म्हणून तु आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहे…

वाईट बातमी अशी की….
तो काल तु ज्याला वाचवले… तो मेला
त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले…..”
हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ….. त्यांनी तीच्या कडे पाहीले…

ती अजूनही तशीच शांत होती……मग म्हणाली
” त्याने स्वतःला नाही टंगून घेतले… तो ओला झाला होता ना
म्हणून लवकर वाळावा यासाठी मी त्याला
पंख्याला टांगले………

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा