लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता.
पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये -".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा