*अति महत्वाच्या डायटिंग टिप्स-*


अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्यामुळे तुम्ही जाड दिसता..🫣


*१. वजन काटा*


*२. आरसा*


*३.जुने फोटो*


आणि..


*४.हडकुळे मित्र..*

 एक जण पुण्यात हिंडताना जाम वैतागला होता.


त्याला एकाने विचारले "काय झालं?" 


तर म्हणतो 


"पुण्यातल्या लोकांचं एक काही धड नसतं"...


टिळक कर्वे रोडवर राहतात


कर्वे फडके रस्त्यावर राहतात


फडके लेले आळीत राहतात 


लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात


बापट दांडेकर पुलाजवळ राहतात


दांडेकर गोखले नगरला राहतात 


गोखले भांडारकर रोड वर राहतात


भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात


रानडे केळकर रस्त्यावर राहतात


आणि केळकर टिळक रस्त्यावर राहतात.


अरे, आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी..!

 नवाबी तहजीब विरुद्ध कानपुरी स्वभाव 


एक नवाब साहेब आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लखनौहून कानपूरला आले.


गेल्या दोन दिवसांपासून नवाब साहेबांच्या लक्षात येत होते की रोज मेजवानीत त्यांना खायला फक्त अंडीच दिली जात होती… म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी आपल्या मेहुण्याला विचारले –


.. साहेब, ही अंडी  त्यांच्या जागी ठीक आहेत, पण त्यांचे आई-वडील कुठे आहेत…?! … कृपया त्यांचीही ओळख करून द्या…!! ही लखनवी संस्कृती आहे.


मेहुणासुद्धा खरा कानपुरी होता. तो म्हणाला, "साहेब... तो अनाथ आहे."

 एक मुलगा आणि मुलगी बीएमडब्ल्यू गाडीतून डेटवर गेले...!


मुलगा - मी आजपर्यंत तुझ्यापासून एक गोष्ट लपवत आले आहे.


मुलगी - काय?


मुलगा - मी विवाहित आहे 


मुलगी, तू मला घाबरवलेस.मला वाटलं ही बीएमडब्ल्यू गाडी तुझी नाहीये...!!! 

 एका सुंदर मुलीचं आणि गुप्ताजींचं अफेअर होतं…!


गोष्टी लग्नाच्या दिशेने जात होत्या, पण त्याआधी…???


एके दिवशी, ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते… 🤣🤣🤣


मुलीने विचारलं:


तुमच्याकडे मारुती कार आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी म्हणाले: नाही.


मुलगी: तुमच्याकडे फ्लॅट आहे का? 🤣🤣😃


गुप्ताजी: नाही…!


मुलगी: तुमच्याकडे नोकरी आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी: नाही…!


_आणि मग…_


*ब्रेकअप…!!*


या काळात, गर्लफ्रेंड निघून गेल्यामुळे गुप्ताजी दुःखी झाले.


आणि मग ते विचार करू लागले…


माझ्याकडे BMW असताना… मला मारुतीची काय गरज आहे?


 जेव्हा माझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे, तेव्हा मला फ्लॅटची काय गरज आहे?


आणि…


जेव्हा माझा स्वतःचा ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे आणि ४०० लोक माझ्यासाठी काम करतात,


तेव्हा मला नोकरीची काय गरज आहे?


मग माझ्या गर्लफ्रेंडने मला का सोडले?

 डॉक्टर : उत्तम स्वास्थ्यासाठी रोज व्यायाम करत जा. 

तेव्हाच तू फिट राहशील. 

मन्या : मी रोज क्रिकेट आणि फूटबॉल खेळतो. 

डॉक्टर : किती वेळ खेळतोस? 

मन्या : जोपर्यंत मोबाइलची बॅटरी संपत नाही. 

अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

कधी कधी एखाद्या पुस्तकातलं एखादं वाक्य आपलं लक्ष वेधून घेतं. वाक्य तसं साधंच असतं पण विचार केला तर त्यात खूप अर्थ भरलेला जाणवतो. असंच एक वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि त्या वाक्यापाशी मी थांबलो. बऱ्याच वेळा आपण वाचून पुढे पुढे जात असतो. परंतु कधी कधी एखाद्या वाक्यापाशी थांबावं आणि त्यावर विचार करावा असं ते वाक्य असतं. पुढचं काही वाचलं नाही तरी चालू शकतं.


ते वाक्य होतं टी हार्व एकर या अमेरिकन विचारवंताचं. तो म्हणतो,"Successful people have fear, doubt and worry too. They just don't let it stop them." यशस्वी लोकांना सुद्धा भीती, शंका आणि चिंता असतात. फक्त ते या भावनांना स्वतःच्या मार्गात अडथळा बनवू देत नाहीत. 


मला हे वाक्य फार आवडलं. यशस्वी माणसांचं जीवन पाहिलं की आपल्याला वाटतं की किती भाग्यवान आहेत ही मंडळी ! यांना सगळं कसं भरभरून मिळालं आहे ! आणि मग अशावेळी आपण नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू पाहतो. मग आपल्याला आपण किती दुर्दैवी आहोत असे वाटते. आपण म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, माझ्याच वाट्याला संकटे आणि अडचणी येतात. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सहजपणे होतच नाही. अगदी हातातोंडाशी आलेले यश मला नेहमी हुलकावणी देते. 


दूरवरून दिसणारे पर्वत आपल्याला खूप सुंदर वाटतात. पण जवळ जाऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अरे, दुरून हा डोंगर दिसत होता तेवढा सुंदर खचितच नाही ! दगडधोंडे, दऱ्या, तीव्र चढ-उतार या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. फक्त आपल्याला त्या लांबून दिसल्या नव्हत्या.


असंच यशस्वी माणसांचंही असतं त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्या यशाचं मर्म लक्षात येत नाही. ही माणसं सुद्धा अनेकदा अपयशाचे धनी झालेले आढळतात. त्यांच्या जीवनातही संकटे येतात. ते देखील कधी कधी निराश होतात. कारण ती देखील तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत. या मातीतूनच त्यांचा देखील जन्म झाला आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का ? होय, नक्कीच ! या ठिकाणी पुन्हा मला एक सुंदर वाक्य आठवतं आहे. "Great men don't do different things. They do things differently." ( महान माणसे वेगळं काम करत नाही फक्त ते आपली कामं वेगळ्या पद्धतीने करतात.)


आपण मात्र संकटे आली, अडचणी आल्या की गांगरतो आणि ती गोष्ट तशीच सोडून देतो. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांसोबतच चिकाटीची सुद्धा आवश्यकता असते. संयम आणि धैर्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. संकटे आपली एक प्रकारची परीक्षाच घेतात. आपण जे पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो, त्या शिक्षणातून खरंतर हे गुण आपल्या अंगी यायला हवेत. परंतु तसं होताना फार कमी आढळतं.


काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. एका तरुण आयटी इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. कारणही तसेच होते. त्याची अचानक नोकरी गेली. त्याच्या लॅपटॉप वर सकाळी सकाळी एक ई-मेल आला. त्यात कंपनीने म्हटले होते, " कंपनीत आता तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे तुमची नोकरी उद्यापासून संपुष्टात आली आहे. आता तुमची गरज नाही." त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या डोळ्यासमोर सारा अंधार पसरला. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरासाठी गाडीसाठी त्याने बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आता काय होणार ? कर्जाचे हप्ते कसे भरणार? घर कसे चालणार ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांची काजळी त्याच्या मनावर एवढी दाटून आली की त्याला आपले जीवन संपवावे एवढा एकच मार्ग दिसला. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले आणि आपल्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती बिचारी सुद्धा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने गच्चीवरून उडी मारून स्वतःला संपवले. ही घटना वाचून कोणालाही हळहळ वाटणे सहाजिकच आहे. 


कोणी एखाद्या परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करतो तर कोणी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतो.


नंतर मनात एकच विचार आला की खरंच असं काही झालं म्हणजे सगळंच संपलं असे समजायचे का ? नाही. कधीही नाही. नोकरी जाणं म्हणजे एक दरवाजा बंद होणं. पण बंद दरवाजासमोर उभे राहून आत डोकावत राहणे म्हणजे मागे उघड्या असलेल्या खिडक्या न पाहणे. नोकरी गेलेल्या त्या तरुणाकडे कौशल्य होते, बुद्धी होती, अनुभव होता. त्याला फ्रीलान्सिंग करता आले असते. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता. सरकारी योजनांचा आधार घेता आला असता. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली असती. समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असते. पण... या सगळ्या शक्यतांचे दरवाजे त्याने स्वतःच बंद करून टाकले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे गृहीत धरून चालायला हवे की आपली नोकरी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कधीही जाऊ शकते. यासाठी प्लॅन बी तयार असायला हवा.


त्या तरुणावर आलेले हे संकट खरोखरीच अवघड होते त्यातून पार पडणे सोपे नाही, हेही मान्य. संकट आले की धीर सुटतो, हेही खरे. पण खरंच अशा प्रसंगी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे का ? अशावेळी थोडे शांत राहून विचार केला तर नक्कीच मार्ग सापडतो. 


"'आली जरी कष्ट दशा किती अपार। धैर्य न टाकीती तथापि थोर।

केला जरि पोत बळेचि खाले। ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।"


थोरांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकायला मिळते. आजूबाजूचा निसर्गही आपल्याला शिकवत असतो. पानगळ होते परंतु झाडाला नवीन पालवी फुटते. झाडाच्या फांद्या छाटल्या जातात पण त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. प्राणी, पक्षी देखील विपरीत परिस्थितीला तोंड देतात आणि प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात. आपण तर माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. आपण संकटांनी असे हाताश होऊन कसे चालेल ?


" घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी..."असं एक सुंदर गाणं आहे. सर्वत्र अंधार पसरलेला असताना हा शुक्रतारा आपल्या प्रकाशाने आजूबाजूच परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो असं म्हणत नाही की माझ्या एकट्याने काय होणार आहे ? स्वतःच्या जीवनाचा दीप विझवून अंधार करण्यापेक्षा इतरांसाठी प्रकाश देणारा दीप बना. जीवन असे सुखासुखी नष्ट करू नका. आज रात्र आहे पण उद्या पहाट होणारच आहे हे निश्चित ! हे जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे हे लक्षात ठेवून वागा.


- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

 बायको पोराची धुलाई करत होती....

पण मध्ये मध्ये.

.

.

.

माझ्याकडे बघायची काही गरज होती का?

CA ची पत्नी : काय हो?

महागाई दर म्हणजे काय असतं हो?


CA : पहिलं तुझं वय 21 वर्षे होतं,

कंबर 28 होती, आणि वजन 50 किलो होतं.


आता तुझं वय 36 वर्षे, कंबर 38

आणि वजन 80 किलो आहे !!


आता तुझ्याकडे पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे, *पण तुझी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा कमी आहे... यालाच महागाई दर म्हणतात!!


Moral of The Story :


अर्थशास्त्र तेवढं कठीण नाही, पण योग्य उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे.


_हा अर्थतज्ज्ञ नंतर महिनाभर उपाशी होता. त्याची कंबर 20 आणि वजन 45 किलो झालं!


मग त्याची बायको त्याला म्हणाली :

तुमचं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही.

महागाई अशी आटोक्यात आणायला हवी!!!

सकाळीच एक इसम फक्त “बीपी तपासावं” म्हणून ओपिडीत आला,”बीपीचं मशिन केवढ्याला मिळतं?” त्यानं  अचानक विचारलं.. 


“८००ते ३००० पण हे यंत्र नाही उपकरण आहे” मी हे उत्तर देतो न देतो तोच “शूगर तपासायची का?” सिस्टरनं त्याला विचारलं..


“नको..माझ्याकडं शूगर मशिन आहे” त्यानं माहिती दिली. 

“अहो ते ही उपकरण आहे यंत्र नाही” मी स्पष्टिकरण दिलं आणि “तेच ते” म्हणत इसम बाहेर पडला..


आपल्याकडं हे असं ढोबळ-पसरट बोललं जातं..


आमच्याकडं एक इंटरकॅाम आहे-एक लॅंडलाईन आहे. “कुठला फोन आणायचा?” हे स्टाफला शंभरदा सांगूनही इंटरकॅाम सांगितलं की लॅंडलाईन घेऊन येतात आणि लॅंडलाईन सांगितलं की इंटरकॅाम..


बरं वर यावर उपाय म्हणून शॅार्टकटमध्ये “काळा फोन आणू की पांढरा?” असंही विचारतात पण त्यांची कामं आणि त्यासाठी त्यांना दिली गेलेली नावं काही समजावून घेत नाहीत..


माझा एक मित्र प्रत्येक सरदारजीचा उल्लेख “तो नाही का तो हरभजन?” असा करतो किंवा कुठल्याही आफ्रिकन माणसाला ‘रिचर्ड’ म्हणतो,सगळे हसण्यावारी सोडून देतात पण खरं तर हे खटकायला हवं..


अर्थात ढोबळ संबोधन देणारे किंवा पसरट बोलणारे वेडे आहेत असं माझं बिल्कूल म्हणणं नाही पण ते मेंदूचा अत्यंत सामान्य अन् कधीकधी चुकीचा वापर करत आहेत असा माझा ठाम दावा आहे..


मेंदूला जग समजण्यासाठी गोष्टी गटात टाकायला आवडतात उदा. फोन म्हणजे फोनच मग तो इंटरकॉम असो मोबाईल असो की लँडलाईन..


प्रत्येक गोष्ट तपशीलात समजून घेणं हे मेंदूसाठी खर्चिक काम आहे म्हणून तो “सोपं नाव=सोपी ओळख” हा मार्ग निवडतो यालाच Heuristics अर्थात शॅार्टकट विचार असं म्हणतात..


मेख इथंच आहे-गोष्ट थोडी नाजूक होते.सगळे उत्तर भारतीय भैय्ये सगळे दाक्षिणात्य अण्णा हे फक्त शॉर्टकट नाही तर सामाजिक स्टीरिओटाईप आहे..


एक अनुभव सगळ्यांवर लागू होतो आणि गोष्टींचं अतिसामान्यीकरण सुरू होतं,हे लोक ठराविक संबोधनं विसरत नाही तर ते लक्ष्यात ठेवण्याची मेहनत टाळतात..


यात मानसशास्रीय दृष्टिकोनातून तीन गोष्टी दिसतात कॉग्निटिव्ह रिजिडिटी अर्थात विचारांची लवचिकता कमी असणं-नवीन माहिती स्वीकारण्याची अनिच्छा आणि लोकांविषयी अनाहूत स्टीरिओटायपिंग..


हा मानसिक विकार अजिबात नाही पण तो सवयीची विचारशैली (habitual cognition)-सामाजिक अज्ञान किंवा कमी संवेदनशीलतेचा आणि क्वचित प्रसंगी सौम्य obsessive traits किंवा rigid thinkingचा भाग असू शकतो..


तुम्ही म्हणाल हा भाऊ आता प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीला आजार म्हणू लागलाय पण तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर एक ‘प्रयोग’ करा..


“आजपासून प्रत्येक नवीन व्यक्तीचं खरं नाव दोनदा उच्चारायचं,आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचं नाव तिच्या मुळ स्वरुपात लिहायचं जसं लाईटचा बोर्ड ऐवजी एक्स्टेन्शन बॅाक्स-चार्जिंगचा गट्टू ऐवजी अडाप्टर वगैरे वगैरे..


पहिल्या काही दिवसांत अडखळाल-चुकाल पण हळूहळू जाणवेल नाव बदललं की नातं बदलतं-दैनंदिन कामात परफेक्शन येतं;फोन म्हणणं सोपं होतं पण ‘लँडलाईन’ म्हणणं अचूक होतं,आपल्याला मुंबईत कुणी ‘घाटी’ म्हटलं की राग येतो का नाही? कन्नडीगा म्हटलं तर कानडी माणसाला बरं वाटेल..


वस्तूंना किंवा व्यक्तींना ढोबळ नाव देणं हे हे कुठल्या आजाराचं वा वेडेपणाचं लक्षण अजिब्बात नाही पण मेंदूच्या आळशीपणाचं सूचक असू शकतं आणि जेव्हा ते लोकांच्या ओळखीवर परिणाम करतं तेव्हा ते फक्त ‘चूक’ नसतं तर संवेदनशीलतेचा अभाव बनतं..


आपला मेंदू आपल्याला शॉर्टकट देतो पण माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्या शॉर्टकटच्या पलीकडं जाऊन अचूकता आणि आदर यांची निवड करावी ! 


डॉ प्रज्ञावंत देवळेकर 

 मालकिण:मूर्ख माणूस! एक काम धड करत नाहीस कधीच, बावळट कुठचा 


नोकर: मॅडम जरा नीट बोलत जा, मी तुमचा नोकर आहे, नवरा नाही...

 बायको, ऐका , आज ऑफिसमधून लवकर परत या , आपण सिनेमा बघायला जाऊ.🥰


नवरा: मी आलो नाही तर!!!😉


पत्नी: तुम्ही वेळेवर आलात तर मी भाजपच्या निवडणूक चिन्हाने तुमचं स्वागत करेन.🪷


तुम्ही आणखी उशीर केल्यास, मग काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह...!👋


तुम्ही आणखी उशीर केल्यास... केजरीवाल यांचे निवडणूक चिन्ह 🧹 दारामागे ठेवले आहे... सावध रहा. 


तेव्हापासून नवरा सारखं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चिन्ह पहातोय ⌚

 रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, ''मला कमी ऐकू येतं एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगापासुन बोलत आहात त्यातील एक अक्षरही मला ऐकू आले नाही''. 

.

.

.

सहप्रवासी गणपतराव म्हणाले, ''आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!'' 

 फक्त बोलून समोरच्याला गार करणारी माणसं असतील तर पाठवा इकडे

.

.

.

लय उकडत आहे. 

 "कसला कार्यक्रम आहे इथे..!?"🤔


"सुप्रसिद्ध बासरी वादक *श्रीहरी* यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम आहे....."


"मग अजून सुरू का झाला नाही...?.."

.

.

.

*"पहिलीच फर्माईश - _*नको वाजवू श्रीहरी मुरली*_  अशी आली आहे...!!!??.."


स्थळ : अर्थातच......!😀

 मन्या : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.


आंबेवाला : खराब ?


मन्या : हो! हो! खराब, नासके आणि सडके.


आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या!


मन्या : हं! ठेवा बाजूला! आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या.

प्रामाणिकपणा

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?


नरू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.


बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 


नरू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.

इतके सोपे असते तर मग हसलो नसतो का ?

रोज सुखाच्या पारावरती दिसलो नसतो का ?


सात पिढ्या श्रीमंतच होत्या आठवी पिढी मी

नाहीतर मग नोटा मोजत बसलो नसतो का ? 


वैभव जोशी

 सूर्य नेहमी पूर्वेकडून उगवतो.


पण चंद्रावर विश्वास ठेवता येत नाही.


कोण कोणत्या 'ब्युटी पार्लर'मधून केव्हा बाहेर येईल काय सांगता येत नाही? 

 युद्ध नाही प्रेम करा 


आणि जर तुम्हाला दोन्ही करायचे असेल, 

.

.

.

तर लग्न करा.

एक धर्मगुरू आणि पाद्री रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यांच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, "शेवट जवळ आला आहे! खूप उशीर होण्यापूर्वी आताच मागे फिरा!"

एक जाणारा ड्रायव्हर ओरडतो, "तुम्ही लोक वेडे आहात!"  आणि त्यांना मागे टाकून वेगाने निघून जातो. वळणाच्या पलीकडून त्यांना टायरच्या कर्कश आवाजासह, मग गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकू येतो.

धर्मगुरू पाद्रीकडे वळून म्हणतो, "आपण त्याऐवजी 'पूल बंद आहे' अशी पाटी लावली तर कसं राहील?" 

पायाखालची वाळू सरकली

एकदा, बायकोबरोबर घ्यायला गेलो भाजी ! पिशव्या उचलून उचलून, जिरली होती माझी !

पिशव्या उचलणे म्हणजे, समजू नका थट्टा ! इकडे, चालू होता बायकोच्या तोंडाचा पट्टा !

इतक्यात मैत्रीण, छानश्या बाळाला आली हो घेऊन ! अले वा, खेळवू लागलो, त्याच्या गालावर हात ठेऊन !

हे घ्या तुमचे बाळ, मैत्रीण ओरडू लागली रागात ! तुमच्याशिवाय, कोण आहे आम्हाला या जगात !

ओरडलो, कोणाचं बाळ, तुझ डोकं बिकं फिरलंय का? बायको त्वेषाने, तरी वाटलंच, पाणी कुठं मुरलंय का?

बायको लाल झाली रागाने, जाऊ लागला तिचा तोल ! मैत्रिणीला म्हणालो, अगं ये बाई, आता तरी खरं बोल !

मैत्रीण हसतच, सॉरी सॉरी हे माझंच आहे मुल ! मला या वेड्याला, करायचं होतं हो एप्रिल फुल !

मैत्रिणीचं झालं एप्रिल फुल, पण माझी जाम टरकली ! बायकोकडे बघताना, पायाखालची वाळूच सरकली !


कवी - उमेश शां. श. ओवाळ

एका माणसाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की त्याला नोकर हवा आहे. तुम्हाला कोणताही पगार मिळणार नाही, फक्त जेवण मिळेल.

नशिबाने साथ दिलेला एक गरीब माणूस आला आणि त्याने विचारले,"साहेब, मला काय काम करायचं आहे?" 

तो काहीच बोलला नाही, फक्त दोन लोकांसाठी रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जवळच्या गुरुद्वाराच्या लंगरमधून आणावे लागते.


एक तुझं, एक माझं..!!!