सत्ता नामक आगीमधले सरपण कॉमन मॅन असे 
त्यांना मेले जाळत जाणे एकमेव हा प्लॅन असे 

सजग नागरिक नको तयांना फक्त खुळेसे फॅन हवे

सुई विवेकाची न टोचता श्रवणभक्तीचे कान हवे

सत्य मांडता राष्ट्रद्रोह, प्रक्षोभ म्हणा ही रीत नवी
धर्म सांगता लोभ, मोह, अन कामोत्सुकही संतपदी
फक्त रचावे सुबक सापळे आणि गाळे ते घोटावे
रेषेवरचे गरीब सकाळ ते आणिक खाली लोटावे
पुस्तक केवळ बदला बाकी शिक्षण शिमगा घालावा नि दर्जावरती प्रश्न उठवता नुसत्या बोंबा ठोकाव्या
परंपरा नि वैविध्याची कवने जगभर मिरवावी 
झुंडी जमवून तीच विविधता वेशीबाहेर टांगावी
बडे थोरले बिजनेस बापे कर्जमुक्ती सुख ओरपती 
धरणे बांधून घर बुडलेले विस्थापित ते झोडपती
दरी ही ताणून वाढवती 
खुळी स्वप्नं ते दाखवती 
आपली भाकरी शेकवती
महागाईचा जाब मागता माना तितक्या वळविती
विकास कुजका विश्वगुरुपद फुटके सगळे स्तोम असे 
नेत्यावरती जीव जडवणे सिंड्रोम हा स्टॉकहोम असे
x

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा