“एक अतिशय हुशार ग्राहक”
सकाळी 3 वाजता हॉटेलच्या क्लार्कला एका पिलेल्या ग्राहकाचा हॉटेलमधूनच इंटरकॉमवर फोन आला,
'' बार केव्हा उघडतो?'' त्याने विचारले.
'' दूपारी'' क्लार्कने उत्तर दिले.
जवळ जवळ एका तासाने पुन्हा त्याच ग्राहकाने अजुन पिल्यासारख्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,
'' बार किती वाजता उघडेल?''
'' मी आधी सांगितल्याप्रमाणे ... दूपारी '' क्लार्कने उत्तर दिले.
पुन्हा एका तासाने त्याच ग्राहकाने आता जरा जास्तच पिलेल्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,
'' बार किती वाजता उघडेल?''
क्लार्कने उत्तर दिले,
''सर... बार बरोबर दुपारी 1 वाजता उघडतो. पण तुम्ही जर बारमध्ये जाण्यासाठी एवढंही थांबू शकत नसाल तर मी रुम सर्विसद्वारे तुम्हाला काही मद्य लागल्यास पाठवू शकतो...'' क्लार्क म्हणाला.
'' मी बारमध्ये जाण्यासाठी नाही... बारमधून बाहेर येण्यासाठी विचारतोय'' तो पिलेला ग्राहक म्हणाला.