डोळ्यातील पाणी

सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी
अखेर, साक्षीला उरते
केवळ, डोळ्यातील पाणी !!
तो- काय खाऊ या?

ती- काहीही चालेल.

तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?

ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स
येतात.

तो- मग काहीतरी नॉन्-व्हेज?

ती- कालच खाल्लंय ना?

तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?

ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू

मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?

ती- काहीही चालेल..!!

तो- मग आता आपण काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव.

तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?

ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!

तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.

ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..

तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.

ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.

तो- मग तुच सांग, काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव..!! ..

तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.

ती- काहीही. तुच ठरव.

तो- बसनं जाऊ या?

ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये.

तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का?
एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?

तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.

ती- किती दुष्ट तु?
रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?

तो- ठीक. मग आधी जेवू या?

ती- व्हाटेव्हर!

तो- काय खाऊ या?

ती- तुच ठरव.
(या मुली पण ना खरच @!#$@#!)

श्री गजाननगौरवाष्टकम्‌



गजानन-महाराज ! भक्तवास्तल्य-वारिद्ये
त्वदंघ्रि-कमल-द्वन्द्र पराग: पातु न: सदा ॥१॥

दयाघन, प्रेममूर्ते! कल्पद्रुम्‌, महत्तम
विव्रुणोषि विपन्नाय मार्ग मुक्तिकरं मुदा ॥२॥

त्वं साक्षात्‌ देवतात्मा वै लोकोद्वाराय वर्तते
सामान्यजनवेषात्‌ तु गूढ-भावो न बुध्यते ॥३॥

अभीप्सिताथ्र-लाभाय प्राप्तस्य तव सन्निधो
साध्ययित्वऽपि तत्कांय्र प्रभु:कर्तेति भाषसे॥४॥
ब्रम्हचर्य-व्रतग्राही भक्तसंसारपालक:
निरपेक्षो निजानन्दो ध्यान-चिन्तनलालसा: ||५॥

गणेशो हनुमान्‌ देवी, यस्मे यदभिरोचते
तद्रूपेण महाराज पुरतर्स्त्व हिभाससे ॥६॥

देवस्थानानि पूज्यानि तीर्थानि विविधानिच
नित्यं ब्रजसि मुक्तात्मन्‌ लोक-शिक्षण-हेतुना ॥७॥

साधावो गणकाश्चैव, मार्गदर्शन हेतव:
प्रत्यक्षं सिध्दिदं नाम दर्शयन्तं नमाम्यहम्‌ ॥८॥
गजाननाष्टकं पुण्यं सर्वकार्यफलप्रदम्‌
आवर्तन-प्रभावेण सत्वरं सिध्दिदायकम्‌ ॥

माणूस पाण्यात विरघळतो

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून
काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.
.
.
... .
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवरफिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
.
.
.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारतो, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.
.
.
यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, .
.
.
.
.
"माणूस पाण्यात विरघळतो."

गजानन महाराज आरती



जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

सहस्त्रदलांचे सूर्यकमल ते आत्मतेज ते उधळीत येता
गुरुमायेला न्हाऊ घालता भाव भक्तिने उटी चर्चिता प्राण फुले वाहिली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

अष्टसिद्धि जमल्या भवती पंचत्वाचि पंचारतीही
घेऊनी हाती आदिशक्ति जय जय गर्जत गात आरती ओवाळीत राहिली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

रामप्रभु तो पंचवटीचा हाक मारता धावत येतो
गुरुमायेचा शब्द झेलतो भक्ताच्या त्या भालावरची विधीलिखिते पुसली
जय जय सद्‍गुरु श्रीमाउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

प्रेम चांदणे सदैव फुलते गुरुमायेचे घडता दर्शन
भक्तावरती अमृत सिंचन याच देहि याच नयनी मायप्रभु पाहिली
जय जय सद्‍गुरु श्री माउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥
एकदा एका रात्री सूर्यकांत दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर
तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने सूर्यकांतला काठीने
मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’

सूर्यकांत स्वत:लासावरत म्हणाला,‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद,
गेला एक
तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो.

डॉक्टरांची सही

डॉक्टर एका पेशंटला तपासून झाल्यावर एक चिठ्ठी देतात, औषधं घेण्याकरिता.

पेशंट मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि औषधे मागतो. अनेक मेडिकल स्टोअर धुंडाळूनसुद्धा त्याला काही औषधं मिळत नाहीत.

शेवटी तो पुन्हा दवाखान्यात येतो.

पेशंट : डॉक्टर, तुम्ही लिहून दिलेली औषधं कुठेही मिळाली नाहीत.

डॉक्टर चिठ्ठी वाचतात आणि...

डॉक्टर : माफ करा हं. चुकून मी माझी केवळ सही असलेलीच चिठ्ठी तुम्हाला दिली. औषधं लिहायची राहिलीत.