पाखरु आणि गरुड

एकेकाळी मी अंड्यात होतो, मझ्यासारखीच अंडी आजूबाजूला होती
त्या अंड्यांना चीकटून रहाताना, जवळजवळ रहायची सवय जडली होती

रहायला छान घरट होतं, उबेला आईचे पंख होते
वडीलांचा आदर्श घेउन, माझ्या पंखात बळ येत होते

एक दीवस सुर्याची आस धरुन मी आकाशात झेपावलो
उडता उडता लक्षात आले की आता मी एकटाच रहीलो

राजासारखं उडता उडता मला खाली जग दिसलं
फाजील गर्व जागा झाला आणी इथेच मनं फसलं

इतर पाखरही जवळ आली , आम्हालाही शिकव म्हणाली
बळकट पाखर जवळ रहीली, अशक्त मत्र हीरमुसुन गेली

असेच कही दीवस उडत थव्याबरोबर उंच गेलो
अचानक एक गरुड आला व मी पुरता गोंधळलो

गरुडाला यापुर्वी मी कधी पाहीलच नव्हतं
आकाशात मझ्यावर कोणी राहीलच नव्हतं

गरुडाची उंची पाहुन मी बीचकलो तोराच बीथरला
मन सैरभैर झालं आणि सगळा माज उतरला

तो म्हणाला बरोबर चल तुला उंच आकाश दाखवतो
अथांग आकाशात तरंगायच कस ते मी तुला शिकवतो

पुढे कधीतरी चालुन तु ही एक गरुड होशील
पण एक वचन दे, इतर पाखरांनाही वर नेशील

आज राणी पूर्विची ती

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको



गीतकार     -    वा. रा. कांत
संगीत        -    यशवंत देव
स्वर          -    सुधीर फडके

हृदयाची मशाल

हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!
डोक्यावर मुळात माझ्या जगण्याची जोखम आहे!!

बेरीज, वजाबाक्यांची आकडेमोड ना केली.....
उरल्यासुरल्या श्वासांची मजपाशी रक्कम आहे!

टोळधाड पडते मजवर त्या अंबट शौकीनांची!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!!

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!

हातांची उशी,नभाचे पांघरूण करतो आम्ही!
अंथरण्यासाठी अवघ्या धरणीचे जाजम आहे!!


गझलकार - प्रा.सतीश देवपूरकर

गोऱ्या देहावरती कांति

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एक दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात


- ना. धों. महानोर
मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं