वर्हाडी ठसका

काय सांगू राजाभाऊ, जमाना नाही बरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || धृ ||

सूट बूट अत्तर लावून कालेजात जाते
आन् इडली-डोसा दोघांमंदी गुपूर गुपूर खाते
निकालात मात्र तिचा असते canvas कोरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || १ ||

"हम आपके है कौन" ला असते लाईन भारी
कालेजातल्या टपरीवर थकीत रायते उधारी
बिल देऊन बापाचा होते उजडा चमन सारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || २ ||

बाईकवाल्या पोट्ट्याची भारी असते मजा
पिंकी,रिंकी बसते माग,पुढं असती विज्या
अंगात असतो जवानीचा तुफान गरम वारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ३ ||

एका वर्षात कमीत कमी चार पाच तरी होते
इंटरव्हल मंदी शाहरुख बाद सलमान एन्ट्री घेते
एका डिग्रीत होते अश्या पाच पंचवीस येरझारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ४ ||

आलतू फालतू पोट्ट्यायची होते मजा मस्त
बाजार करून प्रेमाचा केल यायनं सस्त
चटके मात्र बसते याचे खर्या इमानदारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ५ ||
छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,

"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रिम आहे का ?"

दुकानदार -" हो आहे ना..."

मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"

मैत्रिण

स्वप्नातल्या माझ्या सखी
कोणते तुझे गाव?
कसे तुझे रंगरुप
काय तुझे नाव?

कशी तुझी रितभात?
कोणती तुझी वाणी?
कसे तुझ्या देशामधले
जमीन, आभाळ, पाणी?

लव्ह्याळ्याच्या मुळांतून
झिरपताना पाणी
त्यात पावले बुडवून तू ही
गुणगुणतेस का गाणी?

सुगंधित झुळका चार
केसांमध्ये खोवून
तू ही बसतेस ऊन कोवळे
अंगावर घेऊन?

काजळकाळ्या ढगांवर
अचल लावून दृष्टी
तू ही कधी आतल्याआत
खूप होतेस कष्टी?

कुठेतरी खचित खचित
आहे सारे खास,
कुठेतरी आहेस तू ही
नाही नुसता भास.


कवियत्री - शांता शेळके
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?

बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या...
पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती,
गळ्यात मोत्याची माळ होती..
आणि ...
तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?"
.
...
पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात .."
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ".
.
पप्या म्हणतो,
" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"
.

फुलासारख्या मुली

मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या
त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे
मुली म्हणजे relations
मुली म्हणजे emotions
छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसणार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या
मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या
मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य
मुली असतात softcorner
मुली असतात melting point
घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point
त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धांगवायू
मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा
आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या
कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत

विनाकारण

गंपूने पिंकीला 'आय लव्ह यू' म्हटलं.. पिंकीने त्याला एक थप्पड मारली आणि विचारलं,
' काय बोल्लास?'
गंपू : जर ऐकूच नाही आलं, तर थप्पड का मारलीस?