प्रेमाची भजी

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भजी खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"

बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.

बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडी भजी !!

फॅशन

प्रेम करुन लग्न करणं
आज जुनं झालंय
लग्नापूर्वी पोर काढ्णं
आज फॅशन झालंय

झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं
आज जुनं झालंय
कपड्यासाठी अंग उगड ठेवणं
आज फॅशन झालंय

बापापुढं पोरानं नम्र राहणं
आज जुनं झालंय
पोरासंगे बापानं बिअर पिणं
आज फॅशन झालंय

पोरीसंगे आईनं देवळात जाणं
आज जुनं झालंय
आईसंगे पोरीनं डिस्कोत जाणं
आज फॅशन झालंय

डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं
आज जुनं झालंय
कंबरेच सोडुन डोक्याला बांधणं
आज फॅशन झालंय

जपप्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं
आज जुनं झालंय
विरोधात संस्कृतीच्या बबाळ करणं
आज फॅशन झालंय


कवी - निलेश दत्ताराम बामणे

देता यावे...

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतुक आश्वासक
स्वत:ला स्वत:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान निःसंशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार


कवियत्री - अरुणा ढेरे

इतक्यातच

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकुन उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधुर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ऒंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी ही सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली


कवियत्री - अरुणा ढेरे

यशाची गुरुकिल्ली (जुनी आणि गंजलेली)

एक वार्ताहर एका यशस्वी उद्योगपतीची मुलाखत घेत होता.
” आपल्या यशाचे रहस्य काय?”
” दोन शब्द”
” कोणते?”
” चांगले निर्णय”
“ते कसे घेतलेत ?”
” एक शब्द”
” कोणता?”
” अनुभव”
” तो कसा मिळाला?”
” दोन शब्द”
“कोणते ?”
” चुकीचे निर्णय” 

जाणीव

अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

— पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा
समुद्र केव्हा वादळतात;
काळेकुट्ट ढग येतात;
वादळवारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात –
असे… असे बरसतात की
खुजेपणा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !

– त्या क्षणाच्या आठवणींवर
खुजा जीव जगू पहातो;
क्षणभर थोड उंच होऊन
पाऊल थोडं पुढं टाकतो !




कवियत्री - पद्मा गोळे

नजर हटी दुर्घटना घटी

एका मुलीच्या टी-शर्ट वरचा मेसेज .
..
..
..
..
.. ..
..
तुम्ही आता रस्ता सोडून भलतीकडेच
पाहत आहात
अपघात होण्याचा संभव
आहे...
काळजी घ्या.