गुन्हेगाराचा शोध

एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला 30-40 फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.

''काय साहेब ... कुणाला शोधताय?'' सरदारजीने विचारले.

पोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,

'' हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे... मी त्यालाच शोधत आहे... तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही? '' पोलिसाने विचारले.

सरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, '' नाही ... मी नाही बघितलं ''

पोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, '' साहेब एक मिनिट''

पोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.

'' जरा तो फोटो तर दाखवा ''

पोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.

सरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,

'' मला एक गोष्ट कळत नाही ... जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही ?''

सरदारजीची डायरी

बुधवार - एका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले. एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले. ( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती. दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )

गुरवार - औषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.

शुक्रवार - रात्री खुप हसलो, पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.

शनिवार - पाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.

रविवार - वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही

आठवण

संता - अरे माहीत आहे मी लहानपणी दहाव्या मजल्यावरुन खाली पडलो होतो.

बंता - मग? ... मग काय झालं साल्या वाचला की मेला?

संता - आता आठवत नाही यार ... खुप जुनी गोष्ट आहे.

देव हरवला आहे

दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.

त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.

मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.

झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.

साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''

तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.

पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''

पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.

आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''

तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''

'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.

लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''

सरदारजी आणि जिन

एकदा सरदारजीने आपल्या घरी अडगळीत पडलेला दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला आणि काय आश्चर्य त्यातून एक जिन अवतरीत झाला.

'' सरदारजी माग तुला जे पाहिजे ते माग... पण लक्षात ठेव तू फक्त तिन गोष्टी मागू शकतोस... '' तो जिन म्हणाला.

सरदारजीने पहली गोष्ट मागीतली - '' मला खुप श्रीमंत व्हायचे आहे''

एका क्षणात सरदारजी गडगंज श्रीमंत झाला.

सरदारजीने दूसरी गोष्ट मागितली '' मला या सरदारजी नावाची फार चिड आहे मी अमेरीकन बनू इच्छीतो ''

एका क्षणात सरदारचा अमेरीकन झाला.

अमेरीकन झालेल्या सरदारजीने आता तिसरी आणि शेवटची गोष्ट मागितली, '' मी पुढेही असंच डोकं न लावता पैसे कमावू इच्छीतो''

एका झटक्यात अमेरीकनचा पुन्हा सरदारजी झाला.

सरदारजीच्या इथे चोरी.

एक रेल्वेत काम करणारा सरदारजी पोलिस स्टेशनला गेला.

" इन्सपेक्टर साहेब माझ्या इथे चोरी झालेली आहे... जरा रिपोर्ट तर लिहा'

इन्सपेक्टरने विचारले, "केव्हा झाली चोरी.?''

सरदारजीने उत्तर दिले "1945 ला'

इन्स्पेक्टरने त्याची टिंगल उडवित म्हटले , ' फार लवकर रिपोर्ट करता आहात महाशय '

' मग आपलं कामच फार फास्ट आहे... 1945 ला चोरी झाली आणि बघा आता 2030 झालेत ... 45 मिनटात इथे पोहोचलो''

सरदारजीचं गाढव

एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''

'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''