ब्लँक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
“तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू …(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय…(६)

माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही”
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे…. काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात…(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही”
फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन….

-संदीप खरे
कॉलेजच्या मुलांमध्ये आणि वाऱ्यामध्ये काय साम्य आहे ?
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
दोघेही पुस्तक न वाचता त्याची पाने पलटतात......
एक पुणेरी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली आणि म्हणाली, तू बस इथे मी चहा घेऊन येते.. .. .. ...

... थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली,

.. चल निघू आता, मी घेतला चहा....
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )
चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
मम्मी : काय झाले? चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.
मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )
बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता का पिताय????

नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ????
डॉक्टर : तुम्ही रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पीत जा.
पेशंट : कमाल आहे. मी तर ते रोजच पितो. फकत माझी बायको त्याला "चहा" म्हणते.

शेअर बाजार !!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले... माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा. ... काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत. काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केले कारण गावकर्यांना माकडे सापडेनात. आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."

माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल. गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.

असा चालतो शेअर बाजार !!