जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
देवाचे घर कितीसे दूर होते?
फुलाफुलांचा झगा घालून छानसा
सगळ्यांच्या बाबांना भेटणार होती,
बाबांचाच संमेलन शाळेत होता
लगबगीनं ती निघाली होती
शाळेत आज नको जाउस
आईनं किती समजावलं होतं,
बाबा नसताना तिनं जाण
आईला प्रशस्त वाटत नव्हतं.
कुणी नावं ठेवेल, कुणी हसेलही
पण तिला बिलकुल परवा नव्हती;
बाबांच्या नं येण्याच्या कारणासहित
सगळ्या उत्तरांना ती सज्जच होती.
बाबा कधीच येत नाहीत
त्यांचा फोनही कधी येत नाही;
त्यांच्याविषयी सांगायला उत्सुक होऊन
शाळेत कधी आली कळलंच नाही.
एकेक करून बाई सगळ्यांना
समोर यायला सांगत होत्या,
बाबांची ओळख मैत्रिणी सगळ्या
शाळेला करून देत होत्या.
बाईंनी जेव्हा तिचा नाव घेतला,
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या
जे नव्हते कुठंच तिथं
'त्या' बाबांना शोधात होत्या.
"अरे! हिचे बाबा कुठायत?" एक मुलगा जोरात म्हणाला,
"बहुतेक नाहीतच तिला वडिल", दुसरयानही तोच सूर धरला
"मुलीसाठी वेळ नाही हिच्या बाबांना!", कुणाच्यातरी बाबांनी मागून म्हटलं
"फारच कामंचं दिसतोय हिचा बाप", दुसरयांदा तिला ऐकू आलं...
हाताची घडी व्यवस्थित घालून
तिनं बोलायला सुरुवात केली,
अद्वितीयच होतं ते सगळं
चिमुरडी आपली जे जे बोलली.
"माझे बाबा राहतात खूप दूर
म्हणून ते आज इथ नाहीत.
पण त्यांना यायची खूप इच्छा होती,
मला आहे पक्कं माहीत.
खूपच छान होते बाबा माझे
त्यांना जगात तोडच नाही,
तुम्हाला ते दिसत नसले तरी
मी इथं एकटी नाही.
बाबा नेहमीच माझ्याबरोबर आहेत
अहो, बाबांनीच हे सांगितलंय मला"
म्हणाली हृदयावर हात ठेवून
"इथंच आहेत खात्रीय मला."
मग दोन्ही हातांनी जणू तिनं
बाबांना आपल्या मिठीत घेतलं,
कीतीतरी वेळ जणू त्यांच्याच
हृदयाचं ठकठक संगीत ऐकला.
ओघळणारे अश्रू पुसत रूमलानं
आई गर्दीत उभी होती
अकालीच खूप विचार करणाऱ्या
आपल्या चिमणीकडं पाहत होती.
मग हातांची मिठी सोडून
तिनं गर्दीच्या डोळ्यात पाहिलं,
गोड, मृदू पण स्पष्ट आवाजात
गर्दीन तिच्याकडून पुढं ऐकलं!
"शक्य असतं तर बाबा आलेच असते,
त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे.
पण तुम्हा सगळ्यांना माहीत आहे नं,
देवाचं घर इथून खूप लांब आहे.
अग्निशामक दलात जवान होते बाबा
गेल्याच वर्षी देवाघरी गेले,
काही अतिरेक्यांचा बॉम्ब्धरी हल्ल्यात
ज्या दिवशी आपले स्वातंत्र्याच मेले.
ते माझ्या जवळ आहेतसं वाटतं
जेव्हा कधी मी डोळे मिटते."
आणि लगेच तिनं डोळे मिटून पाहिलं,
अरे! बाबा तर समोरच उभे होते.
मुलांच्या आणि वडलांच्या गर्दीकडे
आश्चर्यानं आई पाहत होती,
हळूहळू डोळे मिटून घ्यायला
सगळ्यांनी सुरुवात केली होती.
"मला माहितीय बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहेत"
निव्वळ शांततेत चिमुरडीनं म्हटलं.
तिचे बाबा आलेच आहेत,
हे शहारलेल्या गर्दीला कळून चुकला.
तिच्या बाजूला सुंदर गुलाबी
गुलाबाचं फुल ठेवल्याचं दिसलं
कधी घडला असं, कसं घडला हे
कुणालाच आजिबात नाही कळलं.
'ज्यांना जगात तोडच नाही',
असे तिचे बाबा जणू आलेच होते,
कुठेही असेनाका आता
देवाचे घर कितीसे दूर होते?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)