एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,'' आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का???????

मुलगा थोडा वेळ विचार करतो.......तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,




" हे बघ,बोअर करु नकोस."!!!!!!!!
संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.
शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"जमिनीवर!!"
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....

पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
पलीकडचा आवाज - मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे.
पलीकडचा आवाज - आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे.
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
पलीकडचा आवाज - जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे.
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.
पलीकडचा आवाज - जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग...

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?

पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????

प्रश्न की आमंत्रण?

वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय.

बंडू: होय.

वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स वगैरे घेता का?

बंडू : अम्मं... एक विचारू?

वरपिता : बेशक!

बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण?

कॉफी

बंड्या : एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
बंड्या : गप ये............ समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे!!!
.
.
.
.
.
.
वेटर: ते xerox च दुकान आहे!!!
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
.
.
.
.
.
.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.... !!