पहिल्या मिलनाचि रात्र

पूनवेची रात्र
त्याला चांदण्याची झालर
बहरलेला प्राजक्त
त्याला सुगंधाचा पाझर

जवळच कुठे तरी…
सजलेली एक परी
वाट बघते तिच्या रायाची
आज आहे रात्र पहिली
तिच्या अन् त्याच्या मिलनाचि

नजर खीळलेली पाऊलावर
चले कांकणाशि खेळ
क्षण किती सरले
भान नाही तिला
वाट पाहता रायाची
जाता जात नाही वेळ

मनी भावनांचा कल्लोळ
मुखी लाजेचा रक्तिमा
अर्धोन्मिलित डोळ्यात तरळे
मिळनाची आर्तता

राया, राया….. आता नको पाहूस
तू असा अंत
डोळे शिणले माझे
पाहुनिया वाट
तहानलेले मन माझे
आसुसलेला देह
ये, मिठीत घे मला
कर माझ्याशी संग

रायाने तिच्या जणू तिची साद ऐकलि
तो खोलीत आला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला

अन्…. शहारले शरीर
चेतले तिचे अंग
उष्ण झाले श्वास
धडधडले उरोज
घायाळ झाले दोघे
लागला मदन बाण
एक झाले दोन देह
पुनवेच्या रात्रीला चढला प्रणयाला बहर ...
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं, मला घटस्पोट हवाय." तिने शांतपणे विचारल,- "का?" तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे, हे तिल जाणून घ्यायचं होत; पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती. तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती. लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नित बघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय, असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता. आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही. जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

काही तरी मिसिंग आहे...

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी मिसिंग आहेच...

असून पैसे आज माझ्या कडे,
पण तो 'कुल्फीवाला मामा' मिसिंग आहे...

खूप मित्र आहेत माझे पण,
ती 'कंचे खेळायची जागा' आज मिसिंग आहे...

आज ही ती शाळा तिथेच आहे,
पण माझा तो 'बाक' आज मिसिंग आहे...

सकाळी तर दर रोज उठतो मी,
पण ती झोप मोडणारी 'चिमण्यांची जोडी' आज मिसिंग आहे...

आईच्या हातची आंघोळ,
ती आजीच्या गप्पांनी रंगलेली रात्र,
आज कुठे तरी मिसिंग आहे..

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी खरच आज मिसिंग आहेच...

भेट आपली शेवटची

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील |
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील |

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल |
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल |

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही |
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही |

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही |
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही |

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल |
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल |

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील |
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील |

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही |
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही |

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......!!!!!

पोरी म्हणजे पोरीच असतात

या पोरी म्हणजे पोरीच असतात,
कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...

जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...

ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...

नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन असतात...

सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम मनात बसतात....
झंप्या नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी झंप्याला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही.

झंप्याची आई : काय रे मास्तरड्या, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाक पोराला पास.