नासा मंगळावर पाठवण्यासाठी सर्व उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेत होते
त्यात ३ देशाचे लोक इंटरव्यू साठी आलेले
फक्त एकाच व्यक्ती मंगळावर जाऊन पुन्हा पृथ्वी वर येणार असते
पहिला उमेदवार एक रशिया चा इंजिनिअर असतो,त्याला विचारले जाते कि मंगळावर जाण्यासाठी त्याला किती रुपये हवे
रशियन इंजिनिअर: एक करोड रुपये,कारण मी ते सर्व पैसे संशोधनासाठी दान करेल

दुसरा उमेदवार होता अमेरिकेचा इंजीनिअर
त्याला पण हाच प्रश्न विचारला गेला
त्याने दोन करोड रुपये मागितले
अमेरिकन इंजिनिअर : मी एक करोड रुपये माझ्या परिवाराला देईल तर उरलेले एक करोड रुपये समाजसेवेसाठी दान करेल

आणि सर्वात शेवटचा उमेदवार होता भारताचा "लालू प्रसाद यादव "
जेव्हा त्याना विचारले गेले कि त्याला मानधन म्हणून किती रुपये हवे तेव्हा तो हळूच इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या कानात बोलतो फक्त “तीन करोड रुपये”
इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आश्चर्य चकित होऊन विचारतो कि इतर सर्वांपेक्षा जास्ती का बरे
लालू प्रसाद यादव : साहेब एक करोड तुम्ही ठेवा, मी एक करोड ठेवतो आणि उरलेले एक करोड त्या इंजिनिअरला देऊ आणि देऊ कि पाठवून त्याला मंगळावर
चम्प्या आणि त्याचा मित्र
दुपारी जेंव्हा एका गाड्यावर पराठे
खायला गेलेले असतात ,

तिथे दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत
येतात ..!!!

त्यांनी ऑर्डर दिली आणि गप्पा मारत
राहिल्या,

बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर त्यांची ऑर्डर
आली...!!!

आणि जसे त्यांनी खायला स्कार्फ
काढला आणि एकमेकांकडे पहिले
...
...
...
....
....
...
...
...

पहिली: अय्या तू चिंगी नाहीस...!!!

दुसरी:अय्या तू पण मिनी नाहीस....!!!
चम्प्या डॉक्टर - काय झालाय तुम्हाला?

झंप्या - मला ताप आलाय..

चम्प्या डॉक्टर - एक काम करा..घरी जा..एकदम थंड पाण्याने आंघोळ करा..
आणि पंख्याखाली झोप बिना शर्टच..आणि उद्या ये..

झंप्या - ह्याने मी बरा होईल का?

चम्प्या डॉक्टर - नाही रे येड्या..तुला निमोनिया होईल..
आणि मी निमोनिया चा डॉक्टर आहे....
मैत्रीण आपल्या मित्रला
दारू पिऊन गाडी चालू नको आज काल खूप accidents होत आहेत
मित्र :थान्क्स डीअर तू खूप काळजी करतेस .
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
मित्र आपल्या मित्रला
दारू पिऊन गाडी चालू नको आज काल खूप accidents होत आहेत
मित्र:साल्या कुत्र्या बापाला जास्त अक्कल शिकाऊ नको .
बायको : "अहो एक सांगू का? पण मारणार.
तर नाही ना?"
नवरा : "हो सांग ना.
बायको : मी गरोदर आहे."
नवरा : "अग हि तर आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?"
बायको :
"कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं
होत

शिक्षण

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.

वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू
उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात
व म्हणतात-

वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय?

मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशास्त्रानुसार, ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत
आहेत कि आपला तंबू चोरीला गेला....
(शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''

नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.''

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.''

आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.''

नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''

आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ''माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता...'' ....!!