ती फ़क्त आईच..!

सकाळी दोन धपाटे घालुन उठवते..ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते..ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच.

... म्हणजे प्रेम!

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडेही न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का असे विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असला तरी दिवाळी भाऊबीजेला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!

गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.

२. झोप चांगली लागते.

३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.

४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.

५. मध्यरात्री,उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.

६.महिन्यातून 100दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.

७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.

८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.

नशाबंदी

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........

"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............

त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......

"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"

सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भंग पितो तेव्हा असाच बोलतो.
एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले,
मि तिच्या घरी गेलो आणि बेल वाजवली..
तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले, ति पण खूप सुंदर होती.
ति हसून बोलली"तुम्ही खूप स्मार्ट आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही.
मि एकटीच आहे, आत या ना."
मि हसलो आणि माझ्या बाईक कडे परत निघालो..तेव्हा तिचा पूर्ण परिवार बाहेर आला
अन् ते माझ्या चांगले पणावर खुश झाले अन् म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे. . . . . . ..
आता मी काय सांगू त्यांना, की, मी माझी बाईक लॉक करायला चाललो होतो म्हणून...

मास्टर की

एक पोरगी झंप्याला बोलली
मला एक सांग

एखादी पोरगी चार मुलांबरोबर फिरली तर लोकं
तिला चालू समजतात ..बिघडलेली समजतात

पण तेच जर का एखाद्या मुलाने चार मुली फिरवल्या तर
त्या मुलाला सर्वे जण हीरो समजतात..

असं का ?

झंप्या शांतपणे उत्तरला...
जर एखादे कुलप वेगवेगळ्या चाव्यांनी उघडल तर ते कुलप
बिघडलय असे समजतात......

पण

जर का एखादी चावी अनेक कुलपं उघडत असेल तर
त्या चावीला 'MASTER KEY'म्हणतात....

टेलिफोन बिल

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता,
.
.
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
... ..
.
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस? ??