मरवा

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.


कवियत्री - इंदिरा संत

भाषा

अर्थ शब्दांचे कसे "नाही" म्हणावे
जे तुझे आहे कसे "नाही" म्हणावे
मी तुझ्यापाशी न आलो मागण्याला
लाभले जे ते कसे "नाही" म्हणावे
संपुनी गेला जरी सहवास अपुला
श्वास दरवळते कसे "नाही" म्हणावे
कोवळीशी भेट त्या कवळ्या क्षणांची
तन कवळले ते कसे "नाही" म्हणावे

कालची भाषा जरी वरवर समजली
खोलवर घुसले कसे "नाही" म्हणावे
गात आहे मी मनोमन गीत नामा
दाटले सारे कसे "नाही" म्हणावे

आता माझ standard वाढु लागलय..

आता माझ standard वाढु लागलय...
एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald's चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

"वन रूम kitchen"मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं...
म्हनुणच ....
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय....
कारण .....
आता माझ standard वाढु लागलय.

स्मशानयात्रा

येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे

दे जीवना मला तू आता नवी निराशा
हे दुःख नेहमीचे झाले जुनेपुराणे!

तेव्हा मला फ़ुलांचा कोठे निरोप आला?
माझे वसंत होते सारे उदासवाणे

सांगू नकोस की, मी तेव्हा जिवंत होतो
तेव्हा जिवंत होते माझे मरुन जाणे

साधीसुधी न होती माझी स्मशानयात्रा..
आली तुझी निमित्ते! आले तुझे बहाणे!


गज़लकार - सुरेश भट

त्याचं-तिचं आज break-up झालंय...

त्याचं-तिचं आज break-up झालंय... काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...

सोबतीला चंद्र देते

सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते

चांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले
या निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले
मीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते

संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू
घाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू
जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते

तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
तृप्तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते


गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?
आई : पंढरपुरलां
मुलगा : बाबांचां?
आई : नागपुरला .
मुलगा : माझा आणि ताईचा ?
आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .
मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?