मौसम हा आशिकाना, पाउस दाटलेला
माझ्या उरी
ढगांनी, संसार थाटलेला...
बेधुंद होत तुही, म्हटले सूरेल गाणे
तुझिया स्वरांत भिजण्या, पाउस थांबलेला...
मौसम हा
आशिकाना...
ओठांत गीत होते, डोईवरी सरी या
मल्हार सांडला
होता, दोन्हीच अंतरी या
कळलेच ना कधी ते, हातात हात आला
क्षण तोच
सांगण्याला, पाउस लांबलेला...
मौसम हा आशिकाना...
ओलावल्यात येथे, भिंती अता मनाच्या
भांबावल्यात आणि, जाणिवा इथे
तनाच्या
प्रत्येक पावलाशी, जणू ओल पावसाची
ओलावल्या उराशी, पाउस
साठलेला...
मौसम हा आशिकाना...
हातात हात आहे अन साथ ही
युगाची
पाउस साक्ष आहे अन बात ही सुखाची
जेव्हा मला दिलेली, तू
वचने सखे गुलाबी
तेव्हा हवाहवासा, पाउस वाटलेला...
मौसम हा
आशिकाना...
कवी - महेश घाटपांडे